जांभई

तोंड पूर्ण उघडून जोराने हवा आत घेणे व त्यानंतर ती लगेच बाहेर सोडणे या मानवी क्रियेस जांभई असे म्हणतात.

आळस आल्यावर, दुसरे कोणी जांभई देत असल्यास किंवा झोप येऊ घातली असल्यास ही क्रिया घडते. यात कानाचा पडदाही ताणला जातो. जांभई देतांना क्वचित कोणी शरीरही ताणतात. माणसांप्रमणे इतरही काही प्राणी जांभया देतात.

विस्तृत कारणे  : मेंदुला प्राणवायुचा पुरवठा कमी झाल्यामुळे जांभई येते

दररोजच्या जीवनात आपण 'जांभई' देतांना इतरांना पाहतो. तसेच 'जांभई'चा अनुभव आपण स्वतःही घेतलेला आहेच म्हणा. 'जांभई' येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. झोपी जाण्यापूर्वी अथवा झोपेतून उठल्या- उठल्या आपण तोंड व शरीर वेडेवाकडे करून जांभई देतो. मात्र ही जांभई येण्‍याचे कारण काय? हा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना!

एखाद्या वेळी अधिक थकतो. तेव्हा आपल्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. तेव्हा या प्राणवायूची कमी ही 'जांभई' भरून काढत असते, असे मानले जाते. तर जांभई' ही आपला मेंदू थंड ठेवण्यासाठी येते, असा दावा बरमिंघटन विद्यापीठातील अभ्यासकांनी केलाय.

' जांभई' का येते? याचे मागील कारण शोधून काढण्यासाठी अभ्यासकांनी पोपटांवर परीक्षण केले होते. त्यांनी परिक्षणासाठी अतिशय उष्ण, कमी उष्ण व सामान्य वातावरण, अशा स्थळांची निवड करून प्रत्येक वातावरणात पोपटांना काही तास ठेवले.

कमी व सामान्य वातावरणातील पोपटांना जांभई आली नाही. मा‍त्र उष्ण वातावरणातील पोपटांना वारंवार जांभई येत असल्याचे त्यांच्या निदर्शणास आले.

त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जेव्हा सामान्य तापमानात असतो तेव्हा आपल्या मेंदू शांत राहतो. त्यामुळे आपल्याला जांभई येत नाही. त्याचप्रमाणे थंड वातावरणातही आपल्याला जांभई येत नाही.

मात्र उष्ण वातावरणमध्ये आपला मेंदू तापत असल्याने आपल्याला जांभई येते. झोप येण्याआधी व झोपेतून उठल्या- उठल्या मेंदूला योग्य तापमानात आणण्यासाठी आपल्या जांभई येत असते.

प्राण्यांच्या जांभया

Tags:

कानझोपतोंडहवा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रामधील जिल्हेमेरी आँत्वानेतवर्धा लोकसभा मतदारसंघऊसऋतुराज गायकवाडगुकेश डीसप्तशृंगी देवीसम्राट अशोक जयंतीपांडुरंग सदाशिव सानेमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाजिल्हाधिकारीसातारा जिल्हावि.वा. शिरवाडकरबिरजू महाराजमहाराष्ट्रातील पर्यटनपृथ्वीप्राजक्ता माळीगोंदवलेकर महाराजऋग्वेदसिंधु नदीखडकनियतकालिकनातीरत्‍नागिरीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघरमाबाई आंबेडकरमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लभारताची जनगणना २०११सोलापूर जिल्हाभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीबसवेश्वरप्रतिभा पाटीलधनु रासव्यापार चक्रअर्थशास्त्रमहाराष्ट्रातील आदिवासी समाजसौंदर्याकोल्हापूरसात बाराचा उताराचातकसैराटसूर्यनमस्कारमधुमेहसंयुक्त महाराष्ट्र चळवळशाहू महाराजश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघवातावरणकुर्ला विधानसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनलोकगीतबचत गटमानवी शरीरकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाचे कलम ३७०रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघखासदारभारतीय संसदअमरावती लोकसभा मतदारसंघवस्तू व सेवा कर (भारत)केंद्रशासित प्रदेशधुळे लोकसभा मतदारसंघपरभणी लोकसभा मतदारसंघबीड विधानसभा मतदारसंघभारताचे पंतप्रधानराजकीय पक्षवर्णमालासंदिपान भुमरेनाटकपरभणी विधानसभा मतदारसंघअजिंठा लेणीबँकयेसूबाई भोसलेमांजरज्योतिबा मंदिरचंद्रशिवाजी महाराजांची राजमुद्रा🡆 More