आशा बगे

आशा बगे या मराठी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार व लेखिका आहेत. त्यांच्या भूमी या कादंबरीला २००६चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

आशा बगे

आशा बगे यांचे बालपण नागपूर येथे गेले. त्यांचे वडील वकील होते. बगे यांचे मराठी साहित्य व संगीतात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. नोकरी न करता घरसंसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासला. आशा बगे यांच्या लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’पासून झाली. त्यांची गाजलेली कथा ‘रुक्मिणी’ १९८० साली प्रसिद्ध झाली. मौजचे श्री.पु. भागवत व राम पटवर्धन यांनी मग आशा बगेंच्या लेखनशैलीला आकार दिला व नंतर मौज व बगे असे समीकरण जुळून गेले. मौजच्या दिवाळी अंकात नेमाने लेखन करणाऱ्या आशा बगे यांचा २०१८ सालापर्यंतचा प्रकाशित ग्रंथसंभार १३ लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या, ललितलेखांची दोन पुस्तके असा व्यापक आहे.

आशा बगे यांचा ‘मारवा’ हा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे, तर ‘भूमी’ व ‘त्रिदल’ या कादंबऱ्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. ‘भूमी’ला २००७चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यात त्यांनी प्रथमच एका तमिळ मुलीचे भावविश्व रेखाटले आहे. ‘दर्पण’ हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह. या पुस्तकासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार त्यांना मिळाला.

आशाताईंना संगीताची खूप आवड आहे. संगीतावर त्यांनी अनेकदा लिहिलेही आहे. त्यांच्या लेखनातसुद्धा संगीताचा संदर्भ हमखास येतोच. त्यांचे आयुष्य मोठय़ा व एकत्रित कुटुंबात गेले. त्याहीमुळे असेल, पण अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे.

आशा बगे यांचे प्रकाशित साहित्य

  • अनंत (कथासंग्रह)
  • अनुवाद (माहितीपर)
  • ऑर्गन (कथासंग्रह)
  • आशा बगे यांच्या निवडक कथा (संपादित, संपादक - प्रभा गणोरकर)
  • ऋतूवेगळे (कथासंग्रह)
  • चक्रवर्ती (धार्मिक)
  • चंदन (कथासंग्रह)
  • जलसाघर (कथासंग्रह)
  • त्रिदल (ललित)
  • दर्पण (कथासंग्रह)
  • धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे (ललित कथा)
  • निसटलेले (कथासंग्रह)
  • पाऊलवाटेवरले गाव (कथासंग्रह)
  • पिंपळपान भाग १, २, ३ (कथासंग्रह; सहलेखक - शं.ना. नवरे, हमीद दलवाई)
  • पूजा (कथासंग्रह)
  • प्रतिद्वंद्वी (कादंबरी)
  • भूमिला आणि उत्सव (कथासंग्रह)
  • भूमी (कादंबरी)
  • मांडव
  • मारवा (कथासंग्रह)
  • मुद्रा (कादंबरी)
  • वाटा आणि मुक्काम (अनुभव कथन; सहलेखक - भारत सासणे, मिलिंद बोकील, सानिया)
  • वामन चोरघडे यांच्या निवडक कथा भाग १, २ (संपादित)
  • श्रावणसरी
  • सेतू (कादंबरी)

पुरस्कार आणि सन्मान

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

Tags:

आशा बगे यांचे प्रकाशित साहित्यआशा बगे पुरस्कार आणि सन्मानआशा बगे संदर्भ आणि नोंदीआशा बगे बाह्य दुवेआशा बगे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीसंगीत नाटकत्सुनामीशिवाजी महाराजांची राजमुद्रामतदानभगवद्‌गीतासाईबाबास्थानिक स्वराज्य संस्थापुन्हा कर्तव्य आहेमहाराष्ट्राचे राज्यपालकोकणकुटुंबश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपद्मसिंह बाजीराव पाटीलशिवछत्रपती पुरस्कारज्योतिर्लिंगमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेअरुण जेटली स्टेडियमनिवडणूकमेंदूराष्ट्रवादव्हॉट्सॲपडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाकलालोकमतस्मिता शेवाळेहडप्पाजागतिकीकरणसंगीतशुभेच्छातत्त्वज्ञाननितंबहार्दिक पंड्यावस्त्रोद्योगवित्त आयोगकुलदैवतगर्भाशयकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघजॉन स्टुअर्ट मिलभारतातील जागतिक वारसा स्थानेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९तुकडोजी महाराजपोक्सो कायदाभारतप्राथमिक शिक्षणगौतमीपुत्र सातकर्णीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीकासारवसंतराव दादा पाटीलसोलापूर लोकसभा मतदारसंघभारतातील जातिव्यवस्थासूत्रसंचालनबहिष्कृत भारतनितीन गडकरीराजाराम भोसलेहिंगोली विधानसभा मतदारसंघआकाशवाणीनिबंधगणपतीवसाहतवादभूकंपताराबाई शिंदेनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघबुलढाणा लोकसभा मतदारसंघशनिवार वाडाजन गण मनदारिद्र्यरेषागोदावरी नदीरावेर लोकसभा मतदारसंघभूकंपाच्या लहरीजुने भारतीय चलननाणेसामाजिक कार्यभारताचे संविधानशरद पवारराजकारणतेजस ठाकरेखडकवासला विधानसभा मतदारसंघतापमान🡆 More