शिवराम एकनाथ भारदे

शिवराम एकनाथ भारदे ऊर्फ भारद्वाज हे संत साहित्यावर साधक बाधक टीका करणारे मराठीतले एक चिकित्सक लेखक होते.

त्यांचा जन्म ९ मे १८६२चा. ३ फेब्रुवारी १९२० रोजी ते निधन पावले. त्यांचे घराणे हरिदासाचे होते. स्वतः शिवरामबुवाही कीर्तनकार होते. बी.ए. झालेले भारदे अहमदनगरच्या विद्यालयात शिक्षक होते. मात्र, राजद्रोहाच्या संशयावरून त्यांना त्या शाळेतून काढून टाकले गेले. त्यानंतर ते अहमदनगरच्या मिशन स्कूलमध्ये संस्कृतचे शिक्षक म्हणून लागले.

लेखन

शिवराम एकनाथ भारदे यांनी ’सुधारक’ या वर्तमानपत्रात भारद्वाज या टोपणनावाने १८९८-९९मध्ये ’ज्ञानदेव व ज्ञानेश्वर’ या नावाची एक लेखमाला लिहिली. ज्ञानेश्वरीकर्ते संत ज्ञानेश्वर आणि अभंगकर्ते ’बापरखमादेवीवर ज्ञानदेव’ या दोन वेगळ्या व्यक्ती असल्याचे त्यांनी या लेखमालेद्वारा सिद्ध करायचा प्रयत्‍न केला. या लेखमालेमुळे मराठी साहित्यिकांत एकच खळबळ माजली. आणि या विषयाचा सांगोपांग अभ्यास सुरू झाला. असा चिकित्सक अभ्यास करून तत्कालीन विद्वान भिंगारकरबुवा, ल.रा. पांगारकर, प्राचार्य दांडेकर, डॉ. पेंडसे, रा.द. रानडे व गजेंद्रगडकर यांनी भारदे यांच्या मताचे खंडन केले आणि ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर हे दोन्ही एकच असे प्रतिस्थापित केले. अजूनही अधूनमधून हा वाद उसळतो, आणि या विषयावर काही लेखक आपापली मते मांडतात.

ज्ञानेश्वरीविषयक रूढ समजुतींना धक्का देणारे भारदे, हे चिकित्सक संशोधक आणि टीकाकार होते. त्यांची मते वादग्रस्त असली तरी त्यांमुळे ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर यांच्यावरील संशोधनाला चालना मिळाली आणि संशोधकांना नवी दृष्टी प्राप्त झाली.

प्रकाशित साहित्य

  • ज्ञानदेव व ज्ञानेश्वर (प्रकाशनवर्ष १९३१)

हे सुद्धा पहा

Tags:

अहमदनगरकीर्तनकारचिकित्सक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कडधान्यबचत गटनिर्मला सीतारामनसरोजिनी नायडूखंडोबाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षमुळाक्षरविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीसाहित्याची निर्मितिप्रक्रियासातारा जिल्हादूधरंगपंचमीकादंबरीआंबेडकर जयंतीचंद्रशेखर आझादमाहिती अधिकारयुक्रेनगोळाफेकघुबडकाझीरंगा राष्ट्रीय उद्यानतिरुपती बालाजीमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीखाशाबा जाधवउंटचाफाकोल्हापूररेडिओजॉकीसवाई मानसिंह स्टेडियमकापूसयेसाजी कंकतूळ रासदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघस्वामी समर्थसिंहगडशेळी पालनपावनखिंडीतील लढाईजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)महाराष्ट्र नवनिर्माण सेनाक्रियापदगडचिरोली जिल्हातिथीमहाराष्ट्रातील किल्लेशुभं करोतिमटकाभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताहोळीबीड लोकसभा मतदारसंघनागपुरी संत्रीभारताची जनगणना २०११मराठी भाषा गौरव दिनफणसपुणेबदकभारतीय प्रजासत्ताक दिनअर्जुन वृक्षआग्नेय दिशातापी नदीक्रिकेटचा इतिहासपाऊसरवींद्रनाथ टागोरसदानंद दातेदौलताबादऔद्योगिक क्रांतीहडप्पा संस्कृतीसंभाजी राजांची राजमुद्राश्यामची आईॐ नमः शिवाययुरोपभूकंपहिरडामृत्युंजय (कादंबरी)गणपतीटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीदादाभाई नौरोजीमहाराष्ट्र पोलीसगालफुगी🡆 More