पाणपोई

फार पूर्वीपासुन,कडक उन्हाळ्यात, जाण्याऱ्या येणाऱ्या पांथस्थांना 'पिण्याचे पाणी' मिळावे म्हणुन करण्यात आलेली धर्मार्थ(निःशुल्क) व्यवस्था म्हणजे पाणपोई होय.

या प्रकारची व्यवस्था पूर्वीच्या काळात, देवळात,धर्मशाळेत करण्यात येत असे.तेथे मातीचे रांजण वा मोठे माठ आदल्या दिवशी रात्रीपासुन विहिरीच्या पाण्याने भरून ठेविल्या जात असे.दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यातुन थंड पाणी मिळे.कोणास चांगले पिण्याचे पाणी पाजणे हे हिंदू धर्मानुसार पुण्याचे काम समजल्या जाते.[ संदर्भ हवा ]

पाणपोई

आधुनिक व्यवस्था

जल-शितक (वॉटर कुलर) वापरून आजकाल ही व्यवस्था केल्या जाते. अद्यापही, जुन्या प्रकारानेपण पाणपोया लावण्यात येतात.झाडाची वा ईमारतीची गर्द सावली बघून शक्यतोवर तेथे, रस्त्याचे कडेला पाणपोई लावल्या जाते.तहानलेले तेथे पाणी पितात.विदर्भात अत्यंत कडक उन्हाळ्यामुळे पाणपोया लावण्याचे हे प्रमाण जास्त आहे.[ संदर्भ हवा ]

पाळीव प्राण्यांसाठी

मानवांसाठीच्या पाणपोईसारखीच प्राण्यांसाठीही दगडाचे वा सिमेंटचे आयताकृती टाके बांधून व त्यात पाणी टाकून ही पाणपोई करण्यात येते.[ चित्र हवे ] एखादा आर्थिकदृष्ट्या संपन्न शेतकरी आपल्या शेताच्या रस्त्याचे बाजूस हे टाके बांधतो. रानात चरावयास जातांना व परत येतांना पाळीव प्राणी हे पाणी पितात.

पक्ष्यांसाठी

कोणी व्यक्ति मातीचा माठ अर्धा कापुन व तो शिंकाळ्यासारखा मोठ्या झाडास टांगुन उन्हाळ्यात पक्षांसाठीही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात.

जंगली जनावरांसाठी

जंगलातील पाणवठे उन्हाळ्यात कोरडे पडतात.जंगलातील वन्य प्राणी पाणीटंचाईमुळे पाण्याचे शोधार्थ गावाकडे येत आहेत.[ संदर्भ हवा ] त्यामुळे काही संस्थांनी व व्यक्तिंनी मिळुन जंगलात कृत्रिम टाके जमिनीत खोदुन, पाणी जमिनीत जिरु नये म्हणुन त्यात पॉलीथिन टाकून त्या जनावरांचे पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली आहे. Kk

Tags:

पाणपोई आधुनिक व्यवस्थापाणपोई पाळीव प्राण्यांसाठीपाणपोई पक्ष्यांसाठीपाणपोई जंगली जनावरांसाठीपाणपोईधर्मशाळामंदिरमाठरांजणविकिपीडिया:संदर्भ द्याविहिरहिंदू धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कन्या रासमहाराष्ट्रातील पर्यटनशुभेच्छाचैत्रगौरीभारताच्या पंतप्रधानांची यादीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळप्रदूषणशाश्वत विकासभारतीय संसददूरदर्शनमराठी व्याकरणअमोल कोल्हेगुणसूत्रअजित पवारधनगररत्‍नागिरी जिल्हातुळजाभवानी मंदिरहोमरुल चळवळविष्णुतरसमांजरहिंदू धर्मरायगड (किल्ला)३३ कोटी देवनवनीत राणाआणीबाणी (भारत)महारलोकसभा सदस्यनाटकभीमराव यशवंत आंबेडकररतन टाटाऋतुराज गायकवाडहवामान बदलव्यापार चक्रधुळे लोकसभा मतदारसंघलक्ष्मीनामदेवनवग्रह स्तोत्रब्राझीलची राज्येराम सातपुतेजैवविविधताभारताच्या राष्ट्रपतींची यादीचंद्रमृत्युंजय (कादंबरी)जगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)रावणवर्धा विधानसभा मतदारसंघपहिले महायुद्धश्रीया पिळगांवकरकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघबाळमहाभारतशिक्षणशेकरूहनुमान चालीसामानसशास्त्ररामआंब्यांच्या जातींची यादीमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीबुलढाणा विधानसभा मतदारसंघगोंदवलेकर महाराजजवाहरलाल नेहरूसूर्यसम्राट अशोकसेवालाल महाराजपंचायत समितीमहाराष्ट्राचा इतिहासदशरथबिरजू महाराजछगन भुजबळप्रीतम गोपीनाथ मुंडेमहाराष्ट्र भूषण पुरस्कारक्रियापदसर्वनाममहादेव जानकरसमाज माध्यमेज्यां-जाक रूसोऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघखाजगीकरण🡆 More