पहिला सुलेमान

पहिला सुलैमान (अन्य मराठी लेखनभेद: पहिला सुलेमान, सुलैमान १ ; ओस्मानी तुर्की: سليمان ; आधुनिक तुर्की: I.

Süleyman ;) (नोव्हेंबर ६, इ.स. १४९४ - सप्टेंबर ६, इ.स. १५६६) हा ओस्मानी साम्राज्याचा १०वा व सर्वाधिक काळ सिंहासनस्थ राहिलेला सुलतान होता. सुलतानपदावरील त्याची कारकीर्द इ.स. १५२० ते इ.स. १५६६, म्हणजे ४६ वर्षांची होती. पहिल्या सुलेमानाच्या कारकिर्दीत युरोपात व पश्चिम आशियात ओस्मानी साम्राज्याचे सैनिकी, नाविक व आर्थिक वर्चस्व वाढत गेले. सुलेमानाने स्वतःच्या नेतृत्वाखाली बेलग्रेड, हंगेरी या युरोपातील मुलुखांवर यशस्वी चढाया केल्या. इ.स. १५२९ सालातील व्हिएन्नाचा वेढा अपयशी ठरण्यामुळे सुलेमानाची युरोपातील आगेकूच रोखली गेली, तरीही बाल्कन व भूमध्यसागरी प्रदेशांवर त्याने ओस्मानी साम्राज्याची पकड घट्ट केली. इराणातल्या सफवी साम्राज्याशी चाललेल्या संघर्षात त्याने मध्यपूर्वेतील बराचसा भूभाग ओस्मानी साम्राज्यास जोडला. उत्तर आफ्रिकेतही मुसंडी मारत त्याने आजच्या अल्जीरियापर्यंतचा मुलूख काबीज केला. या काळात ओस्मानी आरमाराचा दबदबा भूमध्य समुद्रापासून तांबडा समुद्रइराणच्या आखातापर्यंत पसरला. सुलेमानाने सैनिकी व आरमारी यशासोबतच ओस्मानी साम्राज्यातील कायदेव्यवस्था व प्रशासकीय व्यवस्था सुधारली. त्याच्या मृत्यूनंतरही अनेक शतके ओस्मानी साम्राज्यातील न्यायव्यवस्था त्याच्या कारकिर्दीत अमलात आलेल्या कायद्यांवर आधारलेली होती.

पहिला सुलेमान
पहिल्या सुलैमानाचे चित्र (चित्रनिर्मिती: इ.स. १५३० अंदाजे)

बाह्य दुवे

Tags:

अल्जीरियाइ.स. १४९४इ.स. १५६६इराणइराणचे आखातउत्तर आफ्रिकाओस्मानी साम्राज्यतांबडा समुद्रतुर्की भाषानोव्हेंबर ६बाल्कनबेलग्रेडभूमध्य समुद्रमध्यपूर्वव्हिएन्नासप्टेंबर ६सफवी साम्राज्यहंगेरी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाटलीमहात्मा फुलेसौंदर्याफुटबॉलतिरुपती बालाजीहिंदू धर्ममहाराष्ट्राची अर्थव्यवस्थासिंहगडभारतीय रिझर्व बँकमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीमिरज विधानसभा मतदारसंघहिंगोली लोकसभा मतदारसंघनक्षलवादबाळयेसूबाई भोसलेमुंबईउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघविशेषणजायकवाडी धरणलक्ष्मीओशोवृत्तबाबरतिवसा विधानसभा मतदारसंघमाहितीवर्धा लोकसभा मतदारसंघकृष्णसुप्रिया सुळेइंग्लंडन्यूटनचे गतीचे नियमलोणार सरोवरसिंधुदुर्गहनुमाननृत्यजन गण मनमहालक्ष्मीमहाराष्ट्राचा इतिहासजोडाक्षरेफिरोज गांधीकुर्ला विधानसभा मतदारसंघपर्यटनटरबूजरयत शिक्षण संस्थासुजात आंबेडकरऋग्वेदगर्भाशयमराठी संतसंवादएप्रिल २५महाराष्ट्राचे प्रशासकीय विभागछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसरत्‍नागिरी जिल्हाकुष्ठरोगऊसछत्रपती संभाजीनगरधोंडो केशव कर्वेकेंद्रशासित प्रदेशपुन्हा कर्तव्य आहेगौतम बुद्धएकांकिकामांगसंगणक विज्ञानभारतीय रेल्वेभारताची अर्थव्यवस्थाभारतातील राजकीय पक्षआईसॅम पित्रोदामहाराष्ट्र नवनिर्माण सेनाकासारथोरले बाजीराव पेशवेश्रीपाद वल्लभभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघताम्हणभारताचे राष्ट्रपतीतुळजापूरकोकण रेल्वेताराबाई शिंदे🡆 More