खडक

लाव्हापासून बनलेल्या कठीण रूपातील निसर्गजन्य वस्तूला दगड किंवा खडक किंवा पाषाण म्हणतात.

लाव्हा रस घट्ट झाला की त्यापासून डोंगर बनतात. खडक हा डोंगराचा तुकडा असतो.

खडक

द्रवरूपातील पृ्थ्वी थंड होताना खडक तयार झाले. भूपृष्ठावर व त्याखाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाऱ्या व नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या खनिजाच्या मिश्रणालाही खडक म्हणतात. खडकाचे गुणधर्म हे त्यातील खनिजे व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. बहुतांशी खडकांत सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नशिअम व लोह यांचे प्रमाण जास्त असते.

१.दगडापासून मातीपर्यंत सर्व पदार्थांचा समावेश खडकामध्ये होतो.

२.

३.खडकात अनेक मूलद्रव्ये खनिजे-मिश्र स्वरूपांत असतात.

प्रकार

निर्मितीनुसार खडकाचे तीन प्रमुख प्रकार पडतात .

अग्निजन्य खडक

भूगर्भातील तप्त लाव्हा थंड झाल्यावर त्याला अतिशय कठीण असे स्वरूप येते, त्यालाच अग्निजन्य खडक (बेसाल्ट) असे म्हणतात. महाराष्ट्रात बेसाल्ट या काळ्या पाषाणाचे पठार आहे.

लाव्हा रस घट्ट झाला की त्यापासून डोंगर बनतात. खडक हा डोंगराचा तुकडा असतो. इतर प्रकारचेही खडक असू शकतात.

हे खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना प्राथमिक खडक असेही म्हणतात. या खडकांत जीवाश्म आढळत नाहीत.

द्रवरूपातील पृ्थ्वी थंड होताना खडक तयार झाले. भूपृष्ठावर व त्याखाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाऱ्या व नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या खनिजाच्या मिश्रणालाही खडक म्हणतात. खडकाचे गुणधर्म हे त्यातील खनिजे व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. बहुतांशी खडकांत सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम व लोह यांचे प्रमाण जास्त असते.

अग्निजन्य खडकाचे दोन प्रकार केले जातात.

१) अंतर्निर्मित अग्निजन्य खडक - ज्यालामुखी प्रक्रियेदरम्यान ज्या वेळेला शिलारसाचे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली घनीभवन होते, त्यावेळेस तेथे निर्माण होणाऱ्या खडकांना अंतर्निर्मित अग्निजन्य खडक असे म्हणतात. उदा. ग्रेनाइट, गब्रो. या प्रक्रियेत शिलारस सावकाश थंड होत असल्याने त्यातील स्फटिकीकरणाची क्रियाही सावकाश होते. त्यामुळे स्फटिक सुस्पष्ट व मोठे असतात.

२) बहिनिर्मित अग्निजन्य खडक - या प्रक्रियेत लाव्यारस भूपृष्ठावर पसरल्यानंतर त्याचे घनीभवन होते. त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकांना बहिनिर्मित अग्निजन्य खडक. उदा., महाराष्ट्र पठारावरील बेसॉल्ट खडक. भूपृष्ठाभागावर आल्यावर लाव्हारस लवकर थंड होतो. त्यामुळे त्यातील स्फटिकीकरणाची क्रिया जलद होते. परिणामी यातील स्फटिक सुस्पष्ट नसतात.

रूपांतरित खडक

तप्त लाव्हारसाचा परिणाम होऊन, तसेच भू- हालचाली होत असताना पडलेल्या दाबामुळे मूळ खडकांतील अग्निज किंवा गाळाच्या स्फटिकांचे पुन्हा एकदा स्फटिकीकरण घडून येते. त्याचे स्वरूप व गुणधर्म बदलून रूपांतरित खडकांची निर्मिती होते. खडकांचा रंग व स्फटिकांचा आकार बदलतो. उदा. नीस, संगमरवर, स्लेट, फरशीचा दगड इत्यादी.

ग्रॅनाईट नायसेस, रायोलाईट, अँडेसाईट, सेडिमेंटरी, गुलाबी वालुकाश्म हे खडकांचे आणखी प्रकार आहेत.

गाळाचे खडक

नदी, हिमनदी, वारा इत्यादी कारकामुळे खडकाचे अपक्षरण होते, व त्यापासून तयार झालेल्या गाळ वाहत जातो. सखल भागात या गाळाचे थारावर थर साचतात. त्यामुळे वरच्या थरांचा खालच्या थारावर प्रचंड दाब पडतो व गाळाच्या खडकांची निर्मिती होते. उदा. वाळूचा खडक, चुनखडी, शेल

तापमानात सतत होणाऱ्या फरकांमुळे खडक तुटतात. खडकांमध्ये पाणी झीरपल्यामुळे खडकांमधील खनिजे विरघळतात. अशा प्रकारे खडकांचा अपक्षय होऊन त्यांचा भुगा तयार होतो, नदी वारा हांच्या साहायाने सकल प्रदेशाकडे हे कां वाहत जातात, त्यांचे एकावर एक थर तयार होतात, या संचयनामुळे थरावर प्रचंड प्रमाणात दाब तयार होतो त्यामुळे हे थर एकसंघ होतात व त्यातून गाळाचे खडक तयार होतात.

गुणधर्म

रासायनिक रचना, अकार्बनिक प्रक्रियेची अंतर्गत परमाणु संरचना म्हणजे "खनिजे" होय.

सर्व खनिज (खडक) खालील गुणधर्म दाखवतात-

१.रंग=खनिज पदार्थ वेगवेगळ्या रंगात रंगवल्या जातात. ते एखाद्या पदार्थाचा रंग आहे हे प्रकाशात एकपरार आहे आणि पदार्थाच्या रचना आणि आण्विक संरचनावर अवलंबून आहे.

२.श्रेक=खनिजांच्या पावडरचा रंगाला "श्रेक" म्हणतात.

३.चमक=खनिजाचे चकाकी म्हणजेच "चमक'"होय.

४.फ्रक्चर=खनिजाचा तुटलेला पृष्ठभाग म्हणजेच "फ्रॅक्चर" होय.

५.कडकपना=ओरखड्याच्या दिशेने खनिजाने केलेल्या प्रतिकाराला कडकपणा म्हणतात.

६.फुट=खनिजाच्या विशेष दिशेने मोडण्याच्या(फुट पडण्यच्या) गुणधर्मास 'फुट्" असे म्हणतात.

७.दिखावा=खनिजाच्या बह्यरूपाला "दिखवा" असे म्हणतात.

८.रासायनिक रचना.=खनिजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या रसायनास त्या खनिजाची "रासायनिकन रचना" असे म्हणतात.

Tags:

खडक प्रकारखडक गुणधर्मखडक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवाजी महाराजांची राजमुद्रान्यूटनचे गतीचे नियमसीताबौद्ध धर्मबीड लोकसभा मतदारसंघनेतृत्वभरती व ओहोटीकुलदैवतमानसशास्त्रकार्ल मार्क्समौर्य साम्राज्यसविनय कायदेभंग चळवळमराठी भाषाईशान्य दिशागर्भाशयडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेहनुमान मंदिरेमहाराष्ट्राचा भूगोलराज ठाकरेमराठी भाषेमधील वृत्तपत्रेमहाराष्ट्र शासनपश्चिम दिशापुणे लोकसभा मतदारसंघव्हॉट्सॲपव्यंजननामदेवबुलढाणा जिल्हाकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघआंबेडकर जयंतीअन्नप्राशनवसंतराव नाईकभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हसेवालाल महाराजशिवनेरीयवतमाळ जिल्हातुकडोजी महाराजप्रणिती शिंदेमुंबईकोल्हापूर जिल्हारतन टाटाअहमदनगर लोकसभा मतदारसंघभारतीय लोकशाहीसर्वनामदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघपसायदानलोकसभामहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळआईगोवाआयुर्वेदताराबाईलालन सारंगवाळाकरवंजारीभाऊराव पाटीलरमाबाई आंबेडकरओवायवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघलता मंगेशकरपारनेर विधानसभा मतदारसंघगोपाळ गणेश आगरकरविद्यमान भारतीय राज्यपालांची यादीगुप्त साम्राज्यआलेकुणबीगजानन दिगंबर माडगूळकरभारतातील राजकीय पक्षआर्थिक विकासभारतातील समाजसुधारकअश्वत्थामामाढा लोकसभा मतदारसंघजिल्हा परिषदमिठाचा सत्याग्रहमुंबई उच्च न्यायालयठाणे लोकसभा मतदारसंघवेदफुटबॉल🡆 More