निष्क्रिय वायू

हे रासायनिक प्रकियेमध्ये भाग घेत नाही म्हणून त्यांना निष्क्रीय वायू किंवा उदासीन वायू असे म्हणतात.

हेलियम, निऑन, आरगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे सर्व निष्क्रीय वायू किंवा उदासीन वायू आहेत. हे सर्व मुलद्रव्यें आवर्तसारणीमध्ये शेवटच्या म्हणजे १८  व्या गणात आहेत.

अरगॉन हा निष्क्रिय वायू असल्याने अन्य मूलद्रव्यांशी त्याची संयुगे होत नाहीत. यामुळे एखाद्या रासायनिकदृष्टय़ा अस्थिर पदार्थाभोवती अन्य कोणत्याही गोष्टींचा संपर्क टाळण्यासाठी अरगॉन वायूचे आच्छादन घालण्याची म्हणजेच निष्क्रिय वातावरण तयार करण्याची पद्धत वापरली जाते. महत्त्वाची कागदपत्रे, ऐतिहासिक वस्तूंवर वातावरणाचा परिणाम होऊन त्यांचा ऱ्हास होऊ नये म्हणून ती अरगॉनच्या वातावरणात ठेवतात. खरंतर पूर्वी यासाठी हेलिअमचा वापर केला जात असे, पण ज्या वस्तूमध्ये हे वातावरण तयार केले असेल त्यामधून हेलिअम हळूहळू निसटत असे आणि त्यात पुन्हा हेलिअम भरायला लागत असे. हेलिअमप्रमाणे अरगॉन मात्र पटकन निसटत नाही.

अरगॉन कमी दाबाखाली हलका लालसर आणि उच्च दाबाखाली गडद निळा प्रकाश देतो. जाहिरातीसाठी वापरण्यात येण्याऱ्या हिरव्या, निळ्या रंगछटांचा प्रकाश देणाऱ्या नळ्यांमध्ये निऑनबरोबर अरगॉन भरलेला असतो. आधुनिक फ्लुओरेसंट दिव्यात अरगॉन-क्रिप्टॉन किंवा अरगॉन-निऑन यांचे मिश्रण वापरतात. निष्किय वायूंच्या मिश्रणामुळे दिवा चटकन सुरू होण्यास व तो चालू असताना विद्युतप्रवाह वाहून नेण्यास मदत होते. नेहमीच्या वापरातील दिव्यांमधील टंगस्टन धातूची तार अतिशय पातळ असते. ती तापल्यानंतर तिचे ऑक्सिडीभवन होऊ नये, वितळू नये किंवा बाष्पीभवन होऊ नये यासाठी बल्बमध्ये अरगॉन भरतात; असे दिवे अधिक काळ टिकतात.

किरणोत्सारी कणांची संख्या मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘गायगर -म्यूलर’ गणकयंत्रात अरगॉनचा वापर करतात. ३९अ१ या समस्थानिकाचा अर्धआयुष्यकाल २६९ वर्षे असतो. भूजल आणि हीम गाभा यांचे कालनिर्धारण करण्यासाठी ते समस्थानिक वापरतात. तसेच स्तरीय-खडक, रूपांतरित-खडक, अग्निजन्य-खडक इत्यादींचे कालनिर्धारण करण्यासाठी अरगॉन वायूचा उपयोग करतात.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सायबर गुन्हामासिक पाळीवंजारीए.पी.जे. अब्दुल कलामसुजात आंबेडकरखडकशाश्वत विकासफुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्रमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीब्रह्मपुत्रा नदीराणी लक्ष्मीबाईआनंदराज आंबेडकरभीम जन्मभूमीआफ्रिकाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघचीनसप्तशृंगी देवीहोळीबाळाजी विश्वनाथडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादीविश्वास नांगरे पाटीलमाहिती तंत्रज्ञानशिर्डी लोकसभा मतदारसंघ३३ कोटी देवमहाराष्ट्र विधान परिषदजानवेउजनी धरणगुप्तहेर संघटनाचमारजय श्री रामसत्यशोधक समाजव्हॉट्सॲपसंत जनाबाईरमाबाई आंबेडकरप्रकाश आंबेडकरइतर मागास वर्गइंद्रप्रथमोपचारअजित पवारईशान्य दिशाविष्णुदास नामाडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठमनुस्मृती दहन दिनमिलिंद महाविद्यालयदीक्षाभूमीबखरन्यूटनचे गतीचे नियमकोणार्क सूर्य मंदिरसचिन तेंडुलकरवंचित बहुजन आघाडीजाहिरातलातूर लोकसभा मतदारसंघभारतातील शेती पद्धतीअमरावती विधानसभा मतदारसंघतानाजी मालुसरेकेरळरामायणगीतरामायणघनकचरामधमाशीज्योतिबाभारताची अर्थव्यवस्थाचंद्रपूरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कारमराठी भाषा गौरव दिनसंयुक्त महाराष्ट्र चळवळजलप्रदूषणसिंधुताई सपकाळरणजित नाईक-निंबाळकरआंबेडकर जयंतीबाबासाहेब आंबेडकरमाण विधानसभा मतदारसंघसातारा जिल्हामृत्युंजय (कादंबरी)पूर्व आफ्रिकाकादंबरीलॉरेन्स बिश्नोईसामाजिक कार्य🡆 More