केशवस्वामी

त्यांचे संपूर्ण नाव केशव आत्माराम कुलकर्णी.

आईचे नाव गंगाबाई. गंगाबाईंना म्हातारपणी हे अपत्य झाले. ते लातूरच्या दक्षिणेस असलेल्या कल्याणी नावाच्या इतिहासप्रसिद्ध गावचे. केशवस्वामी पाच वर्षाचे असेपर्यंत बोलत नव्हते. त्यावेळी जे कोणी शंकराचार्य पीठावर होते, त्यांचे एकदा कल्याणी गावी आगमन झाले. त्यांनी छोट्या केशवला कृपाप्रसाद दिला आणि त्याला वाचा आली, असे सांगितले जाते.

केशवस्वामी
श्री केशवस्वामींची उंब्रज येथील समाधी

केशवस्वामी विवाहित होते, प्रापंचिक होते. ते आध्यात्मिक विचाराचे होते, पण विषयोपभोगाचे त्यांना वावडे नव्हते. अध्यात्मपर विचार शृंगारिक काव्यात ते अशा बेमालूमपणे मिसळून देत के त्यांच्या काव्याने लोक थक्क होत.

आख्यायिका

केशवस्वामींना लोक गीतगोविंदकर्त्या जयदेवाचा अवतार मानीत. त्यांच्या कीर्तनाने प्रत्यक्ष श्रीकृष्ण प्रसन्‍न होई. त्यांच्या कीर्तनादरम्यान एकदा भिंतीवरील कृष्णाच्या चित्रातील राधेने दिलेला विडा चित्रातीलच श्रीकृष्णाने स्वीकारला आणि भक्षण केला, अशी आख्यायिका आहे. केशवस्वामींनी दाखवलेल्या चमत्कारांमुळे अनेक यवन अधिकारी आश्चर्यचकित होत असत. एकदा केशवस्वामींच्या कीर्तनात सुंठवड्यात चुकून बचनाग मिसळला गेला, पण कुणालाही विषबाधा झाली नाही. श्रीकृष्णाची मूर्ती मात्र काळवंडली. समर्थांच्या भेटीसाठी केशवस्वामी एकदा फार व्याकुळ झाले; पत्‍नीसह सज्जनगडाला निघाले. पति-पत्‍नी दोघांचेही वय झाले होते. ्डोंगर चहताना दोघेही थकून गेले. एका अनोळखी माणसाने त्यांचे सामा्न तर उचललेच, पण केशवस्वामींच्या पत्‍नीलाही खांद्यावर बसवून गडावर नेण्याची तयारी दाखवली. बाई संकोचाने नाही म्हणाल्या, पण केशवस्वामी म्हणाले, ‘संकोचू नकोस, तो आपला बाळच आहे’. गडावर पोहोचल्यावर बाई त्याला शोधू लागल्या, पण तो कोठे दिसे ना. तेव्हा केशवस्वामी म्हणाले, ‘तोआपला बाळ नव्हता, अंजनीचा बाळ होता.’

भागानगर

पुढे केशवस्वामी भागानगरला गेले आणि त्यांनी तेथे स्वतःचा मठ स्थापन केला. समर्थ संप्रदाय्वाढवला. त्या मठात समर्थ पंचायतनातले इतर सत्पुरुष जात-येत असत. केशवस्वामींना समर्थ रामदासांच्या वागण्याचे मोठे कौतुक असे. समर्थांवर त्यांनी अनेक पदे रचली आहेत. ते म्हणतात :-

                    सच्चिद्‌सुखघन वरद प्रतापी |
                    शांतीची साउली |
                    रामदास माउली ||


या केशवस्वामींची समाधी हैदराबाद येथे आहे. हे केशवस्वामी समर्थ पंचायतनातले एक आहेत.

दुसरे केशव स्वामी?

उंब्रज मठपती केशवस्वामी हे कल्याण स्वामींचे शिष्य होते.

ते इ.सन १६८२ ते १७१४ पर्यंत चाफळ येथे समर्थांच्या अस्थी असलेल्या वृंदावनाची व्यवस्था पाहत होते. त्यांनीच समर्थ रामदासकल्याण स्वामी यांच्या अस्थींचे विसर्जन गंगेमध्ये केले. त्यांचा हस्तलिखित सोनेरी रंगाचा दासबोध आजही डोमगाव मठात पहाण्यास मिळतो. त्यांनी चाफळ येथील नदीला घाट बांधल्याचा उल्लेख समर्थप्रताप ग्रंथामध्ये आहे .

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वाक्यसंयुक्त महाराष्ट्र चळवळसोनम वांगचुकयशवंत आंबेडकरशिक्षणनाटकाचे घटकए.पी.जे. अब्दुल कलामविनयभंगॐ नमः शिवायशेतीक्रिकेटमराठी व्याकरणऑलिंपिकबडनेरा विधानसभा मतदारसंघपरभणी लोकसभा मतदारसंघकांजिण्याअकोला लोकसभा मतदारसंघपवन ऊर्जारत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघमराठा घराणी व राज्येहिरडामहाराष्ट्र केसरीकेंद्रशासित प्रदेशशिव जयंतीकर्नाटकगंगा नदीमहाराष्ट्रभिवंडी लोकसभा मतदारसंघहॉकीफ्रेंच राज्यक्रांतीमोरनकाशामुंबईमुक्ताबाईसुप्रिया सुळेराम सातपुतेमहाराष्ट्रातील आरक्षणअहमदनगर किल्लावडअर्थशास्त्रबँकराजा गोसावीचंद्रगुप्त मौर्यहिंगोली लोकसभा मतदारसंघतुळजाभवानी मंदिरभारतातील सण व उत्सवतिरुपती बालाजीदिल्लीक्रिकेटचा इतिहासरामदास आठवलेलिंग गुणोत्तरवृषणयुरोपातील देश व प्रदेशचिमणीजागतिक महिला दिनन्यूझ१८ लोकमतययाति (कादंबरी)भारतातील समाजसुधारकसांगली लोकसभा मतदारसंघमधमाशीवर्धा लोकसभा मतदारसंघदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघशुभेच्छानितीन गडकरीकवठजळगाव जिल्हापारू (मालिका)मेंढीमहाराष्ट्रातील नद्यांची यादीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमांजरइंग्लंड क्रिकेट संघकोरेगावची लढाईमहाराष्ट्रामधील जिल्हेआर्थिक विकासचंद्रभारताची अर्थव्यवस्थाबिबट्या🡆 More