अरविंद व्यंकटेश गोखले

अरविंद व्यंकटेश गोखले हे ’दैनिक केसरी'चे बारावे संपादक.

तेथे ते दहा वर्षे सलग संपादकपदी होते. त्यानंतर ते दैनिक ’लोकसत्ता’चे साहाय्यक संपादक झाले. गोखल्यांची संपादकीय कारकीर्द ३६ वर्षांहून अधिक आहे.

शिक्षण

अरविंद व्यं गोखले हे आधी इतिहास हा विषय घेऊन एम.ए. झाले. लंडनच्या 'कॉमनवेल्थ प्रेस युनियन'ची 'हॅरी ब्रिटन मेमोरिअल फेलोशिप' (१९७९) आणि वॉशिंग्टनच्या 'द हेन्री एल स्टिम्सन सेंटर'ची फेलोशिप (१९९८) मिळवून त्यांनी अनुक्रमे पत्रकारिता आणि भारत-पाकिस्तान संबंध यावर संशोधन केले. आंतरराष्ट्रीय संबंध आणि विशेषतः भारत-पाकिस्तान संबंध हे अरविंद व्यं गोखले यांचे अभ्यासाचे खास विषय होत. आपल्या लेखनासाठी त्यांनी अमेरिका, पाकिस्तान, इंग्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया यांसह अनेक देशांचे अभ्यासदौरे केले. भारताच्या पंतप्रधानांसमवेतही त्यांनी पाच देशांना भेटी दिल्या.

अरविंद व्यं गोखले हे पत्रकारिता अभ्यासक्रमांचे मानद व्याख्याते आहेत.

अरविंद व्यं. गोखले यांनी लिहिलेली पुस्तके

  • अमेरिकेत शिकायचंय? (सहलेखिका सुनिता लोहोकरे)
  • अल काईदा ते तालिबान (‘इनसाइड अल काईदा ॲन्ड तालिबान बियॉंड नाईन इलेव्हन’ या सईद सलीम शाहजाद यांच्या पुस्तकाचा अनुवाद)
  • असाही पाकिस्तान
  • अक्षरांजली
  • आय.सी.८१४ (कादंबरी)
  • कारगिल ते कंदाहार
  • परदेशात शिकायचंय? (सहलेखक विजय लोणकर)
  • पाकिस्ताननामा
  • पाकिस्तानात साठ वर्षे (बियाथिल मोईद्दिन ऊर्फ बी.एम. कुट्टी यांनी लिहिलेल्या ’सिक्स्टी इयर्स इन सेल्फ एक्झाईल : नो रिग्रेट्स' या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद. सह‍अनुवादक विजय लोणकर)
  • मंडालेचा राजबंदी
  • संघर्ष बलुचिस्तानचा (प्रकाशन दिनांक ४ जून, इ.स. २०१७)

अरविंद व्यं गोखले यांना मिळालेले पुरस्कार

  • आचार्य अत्रे पारितोषिक
  • साहित्यसम्राट न. चिं. केळकर पारितोषिक
  • कै. बाबूराव ठाकूर पत्रकारिता पुरस्कार
  • मराठी भाषासंवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेला मराठी भाषाविषयक माध्यमरत्‍न पुरस्कार
  • महाराष्ट्र संपादक परिषदेतर्फे आदर्श पत्रकारितेसाठीचा लोकमान्य टिळक स्मृति पुरस्कार (२०१२)
  • पत्रकार कै. वरुणराज भिडे पुरस्कार
  • कै. सुशीलादेवी देशमुख उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
  • मुंबई मराठी साहित्य संघाचा कै. रा. भि. जोशी पुरस्कार


पहा : गोखले

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळधुंडिराज गोविंद फाळकेशेतीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीचित्ताआनंद दिघेक्षत्रियआंबेडकर कुटुंबमहाराष्ट्राचा भूगोलमहाराष्ट्र शाहीर (चित्रपट)ऋग्वेदअर्जुन वृक्षकुष्ठरोगविंचूअण्णा भाऊ साठेमहापरिनिर्वाण दिनमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थारोहित शर्माप्रदूषणसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठस्टॅचू ऑफ युनिटीताराबाईलोकसभादिनकरराव गोविंदराव पवारविठ्ठलभारतीय जनता पक्षपुरंदर किल्लाकार्ल मार्क्सझेंडा सत्याग्रहशिव जयंतीमहाराष्ट्र केसरीभारतीय संस्कृतीताम्हणसिंधुदुर्गऔरंगाबादसाडेतीन शुभ मुहूर्तस्त्री सक्षमीकरणशिवाजी महाराजांची राजमुद्रासचिन तेंडुलकरत्र्यंबकेश्वरसिंधुदुर्ग जिल्हाअजय-अतुलनाटोसप्तशृंगी देवीमराठा साम्राज्यभारताच्या पंतप्रधानांची यादीअर्थव्यवस्थाॲडॉल्फ हिटलरशनि शिंगणापूरकुंभ रासगोपाळ हरी देशमुखवित्त आयोगगणपतीसेंद्रिय शेतीबीबी का मकबरातापी नदीबिबट्याछगन भुजबळदौलताबादनरसोबाची वाडीसायली संजीवभारतातील जातिव्यवस्थाभारतीय रिझर्व बँकसविनय कायदेभंग चळवळमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गभारतीय प्रजासत्ताक दिनराज्य निवडणूक आयोगसातव्या मुलीची सातवी मुलगीमुखपृष्ठमिठाचा सत्याग्रहबावीस प्रतिज्ञागुळवेलभारत सरकार कायदा १९१९सिंहदर्पण (वृत्तपत्र)व.पु. काळेअजिंठा-वेरुळची लेणी🡆 More