मेलोड्रामा अतिनाट्य

एकोणिसाव्या शतकात गाणी असलेल्या नाटकांना मेलोड्रामा म्हणत असत, हळूहळू त्याच्यातील संगीत बाजूला पडले आणि आश्चर्यचकित करणारे प्रसंग व थरारक किंवा रोमांचक शेवट असणाऱ्या सर्वच नाटकांना मेलोड्रामा किंवा अतिनाट्य म्हटले जाते.

नेपथ्य, रंगमंच सजावट, पात्रांचे पोषाख, पात्रांचा शैलीदार अभिनय तसेच अत्यंत आदर्श किंवा अत्यंत वाईट अशी ठोकळेबाज पात्रे, लक्षवेधी घटना, नाट्यपूर्ण प्रसंग, क्रौर्य, दुःख आणि विनोद यांची सरमिसळ, सत्प्रवृत्त पात्रांचा दुष्ट स्वभावाच्या पात्रांनी केलेला छळ ही अतिनाट्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. नाटकांत नायक सर्व पातळ्यांवर पराभूत होऊन खलनायकाचा विजय होणार असे वाटत असतानाच घटना प्रसंगांना कलाटणी मिळते आणि शेवटी नायक विजयी होतो. याकरिता अतिनाट्यांमध्ये योगायोग आणि पात्रांचे स्वभाव परिवर्तन ही सामग्री वापरली जाते. पल्लेदार संवाद, चेहऱ्याच्या हालचाली आणि संवादातून साधणारा उत्कट भावभिनय, थरारक पार्श्वसंगीत व प्रकाशयोजना ही अतिनाट्याच्या सादरीकरणाची काही प्रमुख वैशिष्ट्ये होत. मराठीत राम गणेश गडकरी लिखित भावबंधन, बाळ कोल्हटकर लिखित वाहतो ही दूर्वांची जुडी, वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले, इ. काही गाजलेली अतिनाट्ये आहेत.[ संदर्भ हवा ]

Tags:

विकिपीडिया:संदर्भ द्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विधानसभा आणि विधान परिषदमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीलोकशाही२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाभारताची जनगणना २०११पाणीजिजाबाई शहाजी भोसलेकवितावासुदेव बळवंत फडकेधोंडो केशव कर्वेगोपाळ कृष्ण गोखलेदिनकरराव गोविंदराव पवारमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीकायदामहाराष्ट्रातील पर्यटनमांजररोहित पवारभारताची अर्थव्यवस्थाआणीबाणी (भारत)स्थानिक स्वराज्य संस्थाअंदमान आणि निकोबारचीनमराठी भाषेमधील वृत्तपत्रेमहात्मा फुलेमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गपोलियोशाश्वत विकास ध्येयेगणपती स्तोत्रेसहकारी संस्थाशीत युद्धविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीलोणार सरोवरमेष रासभारतातील जिल्ह्यांची यादीक्षय रोगमहाराष्ट्र भूषण पुरस्कारजांभूळभाषामेळघाट व्याघ्र प्रकल्पत्र्यंबकेश्वरअशोक सराफमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीनरसोबाची वाडीअहमदनगर जिल्हाराष्ट्रीय सुरक्षाविठ्ठल रामजी शिंदेजगातील देशांची यादीशमीहृदयमुक्ताबाईमानवी हक्कग्रामपंचायतखो-खोयवतमाळ जिल्हाजैविक कीड नियंत्रणकबड्डीनदीतापी नदीसिंहगडभारताच्या पंतप्रधानांची यादीसुदानभारताचा महान्यायवादीऋतुराज गायकवाडकरवंदभारतीय प्रजासत्ताक दिनमहाराष्ट्रामधील जिल्हेतुळजापूरमहाराजा सयाजीराव गायकवाडमधमाशीरमाबाई रानडेजागतिक लोकसंख्याचिपको आंदोलनहस्तमैथुनअजिंठा-वेरुळची लेणीभगतसिंगरेणुकापसायदानमहाराष्ट्र लोकसेवा आयोगशिव🡆 More