गुरमुखी

गुरमुखी (ਗੁਰਮੁਖੀ) ही पंजाबी भाषा लिहीण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे.

ही लिपी ब्राह्मी कुटुंबातल्या शारदा लिपीपासून विकसित झाली. ह्या लिपीचे प्रमाणीकरण शीखांचे दुसरे गुरू गुरू अंगददेव यांनी १६व्या शतकात केले. गुरू ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ गुरमुखी वापरून लिहिला गेला आहे.

गुरमुखी
गुरमुखी अक्षरे


आधुनिक भारतीय भाषांतील पंजाबी भाषेची ही लिपी आहे. गुरुमुखातून निघालेल्या धर्माज्ञा लिहिण्यासाठी या लिपीचा उपयोग करीत असल्यामुळे या लिपीला ‘गुरुमुखी’ वा ‘गुरमुखी’ हे नाव पडले. शीख लोकांचे धर्मग्रंथ याच लिपीत लिहिले जात. पंजाबमध्ये महाजन (व्यापारी) लोकांमध्ये ‘लंडा’ नावाची महाजनी लिपी प्रचलित होती. या लिपीत स्वरचिन्हे नव्हती. त्यामुळे धर्मग्रंथ शुद्ध रीतीने लिहिता-वाचता येत नसत. ही अडचण दूर करण्यासाठी आणि ते धर्मग्रंथ शुद्ध रीतीने लिहिले-वाचले जावेत, म्हणून शीख गुरू अंगद यांनी नागरीप्रमाणे एक स्वरचिन्हयुक्त लिपी तयार केली. या लिपीचे काश्मीरमधील त्यावेळच्या ⇨ शारदा लिपीशी बरेच साम्य आहे. ‘उ, ऋ, ओ, घ, च, छ, ट, ड, ढ, त, थ, द, ध, प, फ, भ, म, य, श, ष, स’ हे वर्ण वर्तमान शारदा लिपीतील वर्णांशी मिळतेजुळते आहेत, तर ‘ट, ठ, प, म’ या वर्णांचे वर्तमान देवनागरी लिपीतील वर्णांशी साम्य आहे. ‘आ’ काराचा काना उजवीकडे उभा दंड काढून दाखवितात. ऱ्हस्व ‘इ’ व दीर्घ ‘ई’ देवनागरीप्रमाणेच व्यंजनाला अनुक्रमे डावीकडे व उजवीकडे लावीत असून ऱ्हस्व ‘उ’ आणि दीर्घ ‘ऊ’ देवनागरीपेक्षा भिन्न आहेत. ऱ्हस्व ‘उ’ अक्षराच्या खाली एका आडव्या लहान रेघेने, तर दीर्घ ‘ऊ’ अक्षराच्या खाली दोन आडव्या रेघांनी दाखवितात. हाच नियम व्यंजनांतर्गत ‘उ’ आणि ‘ऊ’ लाही लागू आहे. गुरुमुखीतील अंक नागरीवरूनच घेतलेले आहेत. एक ते पाच अंक गुरुमुखी आणि नागरीमधील एकच आहेत; पुढील अंकांत मात्र थोडासा फरक आहे.

संदर्भ

ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपिमाला, दिल्ली, १९५९.

Tags:

गुरू अंगददेवगुरू ग्रंथ साहिबपंजाबी भाषाब्राह्मी लिपीलिपीशारदा लिपीशीख धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

२०१९ लोकसभा निवडणुकापद्मसिंह बाजीराव पाटीलज्ञानपीठ पुरस्कारव्यंजनगणपती स्तोत्रेकबूतरदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाकन्या रासदशक्रियासायबर गुन्हामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रआंतरराष्ट्रीय नाणेनिधीलोकसभासिंधुदुर्गजालियनवाला बाग हत्याकांडज्योतिर्लिंगमांगमासिक पाळीभारताचा स्वातंत्र्यलढाजेराल्ड कोएत्झीवायू प्रदूषणकोल्हापूरस्वामी विवेकानंदसांगली लोकसभा मतदारसंघभारताची जनगणना २०११पश्चिम महाराष्ट्रअमित शाहजळगाव लोकसभा मतदारसंघभारतातील समाजसुधारकबारामती विधानसभा मतदारसंघबुलढाणा लोकसभा मतदारसंघअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीभारतीय रिपब्लिकन पक्षनामदेवध्वनिप्रदूषणप्रियंका गांधीनाटकअहिराणी बोलीभाषालिंगायत धर्मराज्यपालकानिफनाथ समाधी स्थळ मढीमहाराष्ट्रातील नद्यांची यादीकुत्रामतदानरक्षा खडसेशिवाजी महाराजमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४तापमानमृत्युंजय (कादंबरी)संभाजी राजांची राजमुद्राटोपणनावानुसार मराठी लेखकनृत्यपाणीबाळशास्त्री जांभेकरसुधीर फडकेभारतवडहिंगोली लोकसभा मतदारसंघहिरडामहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळभारताच्या पंतप्रधानांची यादीभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीग्राहक संरक्षण कायदाविष्णुसहस्रनामबसवेश्वरसुषमा अंधारेरत्‍नागिरी जिल्हावातावरणशिर्डी लोकसभा मतदारसंघरावसाहेब दानवेअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघपी.एच. मूल्यवंचित बहुजन आघाडीलातूर लोकसभा मतदारसंघपन्हाळाछत्रपती संभाजीनगर जिल्हा🡆 More