शशिकांत पुनर्वसू

शशिकांत पुनर्वसू तथा मोरेश्वर शंकर भडभडे (३० सप्टेंबर, इ.स.

१९१३">इ.स. १९१३:पुणे, भारत- ??) हे एक मराठी कथालेखक होते. त्यांनी काही प्रवासवर्णनेही लिहिली आहेत. ते जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलर होते व पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये अध्यापक होते. त्यांच्या पत्‍नी कमलाबाई भडभडे या पुण्यातील हुजूरपागा शाळेत शिक्षिका होत्या. शशिकांत पुनर्वसूंची बहीण लीला भडभडे या शांता शेळके यांच्या शाळामैत्रीण होत्या.

पुनर्वसूंच्या कथांमध्ये पुण्यातील पांढरपेशा ब्राह्मणी संस्कृतीचे चित्रण प्रामुख्याने होत असले, तरी त्यांच्या कथा तशाच संस्कृतीचेव चित्रण करणाऱ्या य.गो. जोशी किंवा श्री.ज. जोशी यांच्या कथांपेक्षा वेगळ्या असत. त्या कथांमध्ये शालेय विश्वातल्या घडामोडी असत तर कधी साम्यवादी विचारसरणी डोकावे. ते शनिवारवाड्यानजीकच्या फुटक्या बुरुजापाशी राहत असत आणि पुण्यातील सदाशिव पेठेचा उल्लेख त्यांच्या कथांत वारंवार येई. त्यांचे लेखन अत्यंत गंभीरपणे, मनःपूर्वक केलेले असे, त्यात सूक्ष्मता, सूचकता आणि संयम होता. काव्यात्म आर्ततेचा एक सूर त्यांच्या कथांतून तरळत असे. अनुराधा विप्रदास, बाबा राजहंस अशी जरा वेगळी नावे त्यांच्या कथांत येत. त्याछ्या कथाटून त्यांची संगीताची जाणकारी, चित्रकलेची आवड, लहान मुलाबद्दल त्यांना वाटणारे वात्सल्य जाणवत असे.

शशिकांत पुनर्वसू यांच्या कथा सत्यकथा मासिकात प्रकाशित होत. पुण्यात एक कथाकार मंडळ सुरू झाले होते. पंडित महादेवशास्त्री जोशी, श्री.ज. जोशी, दि.बा. मोकाशी, अरविंद गोखले, वसुंधरा पटवर्धन, मंगेश पदकी, सरिता पदकी, कमला फडके यांसारखे कथालेखक आठ पंधरा दिवसातून एकदा तिथे भेटत. शशिकांत पुनर्वसू त्या मंडळाचे सदस्य होते. या मंडळाने एकदा खंडाळ्याला सहल नेली. त्या सहलीचा पुनर्वसूंनी लिहिलेला प्रवासवृत्तान्त ’ऊब आणि गारठा’ या नावाखाली सत्यकथेत प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर काही दिवसांतच शाशिकांत पुनर्वसू यांचे झोपेत हृदयक्रिया बंद पडून निधान झाले. त्यांच्या निधनानंतर श्री.ज. जोशी, शं.ना. नवरे, सरिता पदकी यांचे पुनर्वसूंबद्दलचे लेख वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले होते.

पुस्तके

  • एका गिरणगावात (कथासंग्रह)
  • ऊब आणि गारठा (प्रवासवर्णन)
  • कुंडीतील फुले (कथासंग्रह)
  • गुलमोहर (कथासंग्रह)
  • पुष्करिणी (कथासंग्रह)
  • शांति (कथासंग्रह)
  • संधिप्रकाश (कथासंग्रह)
  • संध्याकाळच्या सावल्या (कथासंग्रह)

Tags:

इ.स. १९१३न्यू इंग्लिश स्कूलपुणेभारतशांता शेळके३० सप्टेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राष्ट्रकूट राजघराणेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)ग्रामीण साहित्यमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमहाराष्ट्र शाहीर (चित्रपट)अजिंठा लेणीनेपाळभीमा नदीखान्देशमूळव्याधप्रज्ञा विवर्धन स्तोत्रदादोबा पांडुरंग तर्खडकरवाघसज्जनगडगुप्त साम्राज्यए.पी.जे. अब्दुल कलामअतिसारसम्राट अशोकफेसबुकभीम जन्मभूमीउच्च रक्तदाबइजिप्तजंगली महाराजक्रियाविशेषणहिमालयश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठमुरूड-जंजिरापी.टी. उषापावनखिंडअर्थव्यवस्थामहाराष्ट्रातील किल्लेजीवाणूज्ञानेश्वरीविकासनरसोबाची वाडीसातारारोहित शर्माजैविक कीड नियंत्रणटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीशेतकरी कामगार पक्षमुंबई उच्च न्यायालयतुळजापूरसिंधुताई सपकाळमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतकेरळमानसशास्त्रकायदापाणलोट क्षेत्रमहाराष्ट्रातील आरक्षणक्रिकेटचा इतिहासभारतसंगणकाचा इतिहासहवामानपाणी व्यवस्थापनभारतीय नियोजन आयोगध्वनिप्रदूषणमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीपंचशीलसंभोगपवन ऊर्जागांडूळ खतलीळाचरित्रदेवेंद्र फडणवीसहिंदू लग्नऋषी सुनकचीनमटकाबाबासाहेब आंबेडकरथोरले बाजीराव पेशवेशाबरी विद्या व नवनांथपंचायत समितीशेतीसीतागायझाडपरकीय चलन विनिमय कायदाअप्पासाहेब धर्माधिकारी🡆 More