विक्रमशिला विद्यापीठ

विक्रमशिला विद्यापीठ हे प्राचीन भारतातील पाल साम्राज्यात असलेले एक बौद्ध शिक्षणकेंद्र होते.

नालंदा विद्यापीठाप्रमाणेच येथेही अनेक देशांतून विद्यार्थी अध्ययनासाठी येत असत. विक्रमशिला विद्यापीठ हे रसायनशास्त्र, रसशास्त्र आणि आयुर्वेद याचे फार मोठे केंद्र होते विक्रमशिला विद्यापीठ हे आजच्या बिहारमधील भागलपूरजवळ येथे होते धर्मपालन नावाच्या राजाने या विद्यापीठाची स्थापना इसवी सनाच्या आठव्या शतकामध्ये केली या ठिकाणी सहा विहार होते प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते.

विक्रमशिला विद्यापीठ
विक्रमशिला विद्यापीठाचे भग्नावशेष
विक्रमशिला विद्यापीठ is located in बिहार
विक्रमशिला विद्यापीठ
विक्रमशिला विद्यापीठ
विक्रमशिला विद्यापीठाचे बिहारच्या नकाशावरील स्थान

पार्श्वभूमी

विक्रमशिला विद्यापीठ हे सध्याच्या बिहार राज्याच्या भागलपूर जिल्ह्यात भागलपूरपासून पूर्वेला ५० कि.मी. अंतरावर असणाऱ्या अंतीचक येथे होते. पाल घराण्यातील राजा धर्मपाल याने नवव्या शतकाच्या सुरुवातीला विक्रमशिला विहाराची स्थापना केली. हाच विहार पुढे ‘विक्रमशिला विद्यापीठ’ या नावाने प्रसिद्ध झाला. धर्मपालाचे दुसरे नाव विक्रमशील असल्यामुळे या विद्यापीठाचे नाव विक्रमशीला ठेवण्यात आले. रत्नाकरशांती, वागीश्वरकीर्ती, भट्टारक नरोत्पल, प्रज्ञाकरमती, रत्नवज्र, ज्ञानश्रीमित्र हे विद्वान पंडित या विद्यापीठात अध्यापनकार्य करीत होते. विक्रमशिला विद्यापीठाच्या मध्यभागी महाबोधीची कलाकृती असलेले देवालयहोते. येथे एक विशाल सभाभवन होते. त्यात एका वेळी आठ हजार व्यक्तींची बसण्याची सोय होती. प्रवेशद्वारात उजव्या बाजूस नालंदा विद्यापीठाचे प्रमुख आचार्य नागार्जुनाचे चित्र होते, तर डाव्या बाजूस याच विद्यापीठाचे प्रमुख अतीश दीपंकराचे चित्र होते. विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद झाल्यावर येणाऱ्यांसाठी या प्रवेशद्वाराबाहेर एक धर्मशाळा होती. विद्यार्थ्यांची येथे विनामुल्य निवासभोजनाची व्यवस्था असे.

अस्त

इ.स. ११९३ साली बख्तियार खिलजी या तुर्की आक्रमकाने विक्रमशिला विद्यापीठ पूर्णपणे उध्वस्त केले..

उत्खनन

विक्रमशिला विद्यापीठ ज्या ठिकाणी होते तिथे सर्वप्रथम पाटणा विद्यापीठातर्फे इ.स. १९६० ते इ.स. १९६९पर्यंत आणि त्यानंतर भारतीय पुरातत्त्व खात्याच्या वतीने इ.स. १९७२ ते इ.स. १९८२पर्यंत उत्खनन केले गेल्यामुळे विक्रमशिला विद्यापीठाबाबतच्या अनेक गोष्टी उजेडात आल्या. या विद्यापीठाभोवती नऊ फूट उंचीची भिंत होती.

चित्रदालन

संदर्भ व नोंदी

Tags:

विक्रमशिला विद्यापीठ पार्श्वभूमीविक्रमशिला विद्यापीठ अस्तविक्रमशिला विद्यापीठ उत्खननविक्रमशिला विद्यापीठ चित्रदालनविक्रमशिला विद्यापीठ संदर्भ व नोंदीविक्रमशिला विद्यापीठआयुर्वेदनालंदा विद्यापीठपाल साम्राज्यबिहारबौद्धभागलपूरभारतरसायनशास्त्रविहार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाळ ठाकरेमहाराष्ट्र शासनविधानसभा आणि विधान परिषदचिपको आंदोलनताम्हणमनुस्मृतीमानवी हक्कशिवनेरीसत्यनारायण पूजाभारतातील महानगरपालिकाभारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादीभारताचा स्वातंत्र्यलढामहाराष्ट्र विधान परिषदसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानशांता शेळकेभंडारा जिल्हामहेंद्रसिंह धोनीनीती आयोगविठ्ठलदादोबा पांडुरंग तर्खडकरसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठभारद्वाज (पक्षी)काळभैरवपर्यावरणशास्त्रलीळाचरित्रइडन गार्डन्सकायदासातव्या मुलीची सातवी मुलगीजेजुरीमेळघाट व्याघ्र प्रकल्पविठ्ठल रामजी शिंदेनाटोमोह (वृक्ष)मोडीभाऊराव पाटीललोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीपुणे जिल्हाभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तजागरण गोंधळबाबासाहेब आंबेडकरलोकशाहीतलाठी कोतवालतुकडोजी महाराजमासानामदेव ढसाळमहाराष्ट्राचे राज्यपालराष्ट्रीय महामार्गपुरंदर किल्लाभारतातील समाजसुधारककोपेश्वर मंदिर, खिद्रापूरबाळाजी विश्वनाथबैलगाडा शर्यतअश्वत्थामामानवी भूगोलशमीआंबाविंचूव्यंजनराशीकावीळकुंभ रासगेटवे ऑफ इंडियासमर्थ रामदास स्वामीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)महाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीशिवछत्रपती पुरस्कारमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीमुघल साम्राज्यअप्पासाहेब धर्माधिकारीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीकापूसॲरिस्टॉटलमराठा साम्राज्यबाजार समितीसईबाई भोसलेविष्णुलोणार सरोवरधनादेश🡆 More