वैजनाथ

वैजनाथ
वैजनाथ
नाव: वैद्यनाथ मंदिर
जीर्णोद्धारक: अहिल्याबाई होळकर
निर्माण काल : अति प्राचीन
देवता: शंकर
वास्तुकला: हिंदू
स्थान: महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामध्ये

परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते.तसेच ते परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे.

परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.

जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे.

आणखी एक वैजनाथ

भारताच्या झारखंड राज्यातल्या संथाल परगण्यामधील देवघर गावात आणखी एक वैजनाथ मंदिर आहे. यालाही बाबा बैजनाथ किंवा वैद्यनाथ म्हटले जाते. हेही बारा ज्योतिर्लिंगांतले एक आहे, अशी मान्यता आहे. रावण लंके जवळ जाताना दिशेप्रमाने प्रवास क्रमवारी नुसार महाराष्ट्र तील परळी हेच मुख्य व खरे बारा ज्योतिर्लिंगांतले एक आहे,

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पुरस्कारहुंडानर्मदा नदीतुतारीअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघराज ठाकरेदौलताबाद किल्लाअशोक चव्हाणभोवळलोकसंख्यादौलताबादअजित पवारमहेंद्र सिंह धोनीयशवंत आंबेडकरराजाराम भोसलेमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीभारताचे संविधानशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळदिशाग्रामपंचायतपारिजातकमहाराष्ट्राचा भूगोलनृत्यवातावरणकाळूबाईफेसबुकविधानसभापंढरपूरलावणीज्ञानेश्वरसात आसरापूर्व दिशाप्राणायामतापमानशिक्षणहिंगोली लोकसभा मतदारसंघभारतीय संसदगेटवे ऑफ इंडियाभगवद्‌गीताबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाकुंभ रासहस्तमैथुनसंयुक्त महाराष्ट्र चळवळमहाराष्ट्रातील राजकारणमहाराष्ट्रामधील जिल्हेकळसूबाई शिखरलॉर्ड डलहौसीजागतिक पुस्तक दिवसदीनबंधू (वृत्तपत्र)हनुमान जयंतीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीराजकारणभारतीय स्थापत्यकलाभारतीय नियोजन आयोगसंवादवेदधोंडो केशव कर्वेबुलढाणा विधानसभा मतदारसंघभारतीय रेल्वेबीड लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाची उद्देशिकागोपाळ हरी देशमुखउद्धव ठाकरेलता मंगेशकरभौगोलिक माहिती प्रणालीस्त्री सक्षमीकरणवसंतराव दादा पाटीलऋग्वेदभीमा नदीमौर्य साम्राज्यलहुजी राघोजी साळवेसोलापूरविशेषणडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनमानवी हक्ककुणबीराष्ट्रकूट राजघराणेमराठी लिपीतील वर्णमाला🡆 More