पंजाबराव देशमुख: भारतीय राजकारणी

पंजाबराव देशमुख (जन्म : पापळ-अमरावती जिल्हा, २७ डिसेंबर १८९८; - दिल्ली, १० एप्रिल १९६५) यांचा जन्म पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. १९३६च्या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत.

पंजाबराव देशमुख
पंजाबराव देशमुख: भारतीय राजकारणी
जन्म २७ डिसेंबर इ.स. १८९८
पापळ, अमरावती
मृत्यू १० एप्रिल इ.स. १९६५
दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे भाऊसाहेब
नागरिकत्व भारतीय
शिक्षण डॉ.
प्रशिक्षणसंस्था श्री शिवाजी शिक्षण संस्था
पेशा समाज सेवक , राजकारण
मूळ गाव पापळ
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जोडीदार विमलाबाई

'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा' हे पंजाबराव देशमुखांचे ब्रीदवाक्य होते.

संक्षिप्त जीवन

डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) मूळ आडनाव - कदम

१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालविले.

वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.

१९३३ - शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारiत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.

१९२६ - मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.

१९२७ - शेतकरी संघाची स्थापना.

१९३२ - श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना.

? - ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.

१९५० - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर झाले.

१९५५ - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.

१९५६ - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.

१८ ऑगस्ट १९२८ - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .

१९३० - प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री

लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.

१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषिमंत्री.

देवस्थानची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देशाने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.

१९६० - दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.

पंजाबराव देशमुखांच्या जीवनावरील पुस्तके

  • सूर्यावर वादळे उठतात. (नाटक, लेखक बाळकृष्ण द. महात्मे)

सन्मान

  • विदर्भातील अकोला येथे असलेल्या कृषी विद्यापीठाला डाॅ. पंजाबराव देशमुखांचे नाव दिले आहे.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह लोकसभा मतदारसंघकार्ल मार्क्सउज्ज्वला जोगसह्याद्रीभारतीय संविधानाची उद्देशिकाहातकणंगले लोकसभा मतदारसंघबहिणाबाई पाठक (संत)मराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीहळदन्यूटनचे गतीचे नियमसंभाजी भोसलेओमराजे निंबाळकरनितंबगुलमोहर दिवसमार्कंडेय पुराणमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीएकच प्यालालहुजी राघोजी साळवेमहाराष्ट्र लोकसेवा आयोगजवसशिक्षणअलेक्झांडर द ग्रेटशिवाजी महाराजकवितामोसमी पाऊसकाळूबाईनाचणीजागतिक दिवसभारतीय राष्ट्रीय काँग्रेसरणजित नाईक-निंबाळकरआरोग्यमहाराष्ट्र गानफुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्रकोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)कोल्हापूर जिल्हाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकस्वतंत्र मजूर पक्षघनकचरामांगपुणे जिल्हामुंबईऋतूएबीपी माझाभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यापांडुरंग महादेव बापटसिंधुदुर्ग जिल्हानाशिक लोकसभा मतदारसंघज्योतिबाकोविड-१९लोकमतअमोल कोल्हेआंब्यांच्या जातींची यादीमहाराष्ट्रातील स्थानिक शासनभारत छोडो आंदोलनसाखरपुडापन्हाळात्र्यंबकेश्वरछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपंकजा मुंडेइंडियन प्रीमियर लीगदेवदत्त साबळेआगरीछावा (कादंबरी)संगणक विज्ञानअलिप्ततावादी चळवळजगातील देशांची यादीपालघर लोकसभा मतदारसंघमुरूड-जंजिराजागतिक बँकब्रिक्सशुभेच्छाएकविरावेदरायगड (किल्ला)महाराष्ट्रामधील जिल्हेप्रार्थना समाजराष्ट्रभाषा🡆 More