नारायण आठवले: भारतीय राजकारणी

नारायण आठवले (जन्म : १६ ऑगस्ट १९३२; - २८ एप्रिल २०११) हे मराठी भाषेतील पत्रकार, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि भारतातील शिवसेना या राजकीय पक्षाचे माजी खासदार होते.

ते त्या पक्षाच्या तिकिटावर इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, महाराष्ट्र राज्यातील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांची खासदारकीची कारकीर्द जेमतेम अठरा महिन्यांची होती.

त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा, गोवा मुक्ति चळवळ आदी आंदोलनांत सक्रिय भाग घेतला होता. ४०हून अधिक वर्षे त्यांनी राजकारणावर आणि सामाजिक विषयांवर लेखन केले. लोकाभिमुख पत्रकार म्हणून त्यांनी महाराष्ट्रात व गोव्यात गोमंतक, जनवाणी, लोकमित्र, लोकसत्ता, नवशक्ती ह्या वर्तमानपत्रांत, आणि प्रभंजन, चित्रलेखा आदी साप्ताहिकांमधून लिखाण केले. त्यांची लोकसत्तेतील भारूड आणि फटकळ गाथा ही सदरे गाजली होती. सोबत या साप्ताहिकात त्यांचे लिखाण ’बॉम्बे कॉलिंग’ या, आणि चित्रलेखामध्ये ’महाराष्ट्र माझा’ आणि ’सख्या हरी’ या शीर्षकांखाली होत असे.

नारायण आठवले यांनी गोव्यात ‘लोकविश्वास प्रतिष्ठान‘ या नावाच्या मूकबधिर मुलांसाठीच्या संस्थेच्या स्थापनेसाठी मोलाचे काम केले.[ संदर्भ हवा ] ही संस्था मूकबधिर मुलांसाठी निवासी शाळा चालवते.

‘गोमंतक मराठी अकादमी‘च्या उभारणीतही त्यांचे योगदान होते.[ संदर्भ हवा ]

अनिरुद्ध पुनर्वसू यांचे साहित्य

त्यांनी त्यांचे ललित व अन्य साहित्य अनिरुद्ध पुनर्वसु, नाना वांद्रेकर, नारायण महाराज, पूर्वा नगरकर, फकीरदास फटकळ आणि सख्याहरी या टोपण नांवांनी लिहिले. नारायण महाराज या नावाने त्यांनी विडंबनकाव्य लिहिले. त्यांच्या नांवावर एकूण १८ कादंबऱ्या, दोन कथासंग्रह आणि सुमारे ५ लेखसंग्रह एवढे साहित्य प्रकाशित झाले आहे.

कादंबऱ्या, लेखसंग्रह वगैरे

  • घाव घाली निशाणी (लेखसंग्रह)
  • थोरला हो (कादंबरी)
  • नाही प्रीत पंतंगाची खरी (कादंबरी)
  • रेसचा घोडा (कादंबरी)
  • लटिके बोलेल तो अधम
  • सहस्रेषु (कादंबरी)
  • सुखरूप (कादंबरी)

नारायण आठवले यांना मिळालेले पुरस्कार

  • आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार १९९२मध्ये
  • पुढारीकार डॉ.ग.गो. जाधव स्मृति पुरस्कार २००७ मध्ये..
  • गोमंतक मराठी अकादमीचा कै.गो.पु. हेगडे पुरस्कार नारायण आठवले यांना १९९४ साली मिळाला.
  • भ्रमंती पुरस्कार १९९५मध्ये.
  • मुंबई पत्रकार संघाचा जयहिंद प्रकाशन पुरस्कार १९८५मध्ये.
  • समतानंद अनंत हरि गद्रे पुरस्कार १९९४मध्ये

बाह्य दुवे

http://www.navprabha.com/index.php?option=com_content&view=article&id=8586:2011-04-29-05-24-30&catid=34:2008-08-14-05-58-38&Itemid=58

Tags:

नारायण आठवले अनिरुद्ध पुनर्वसू यांचे साहित्यनारायण आठवले कादंबऱ्या, लेखसंग्रह वगैरेनारायण आठवले यांना मिळालेले पुरस्कारनारायण आठवले बाह्य दुवेनारायण आठवलेइ.स. १९९६उत्तर मध्य मुंबई(लोकसभा मतदारसंघ)महाराष्ट्रशिवसेना

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बुद्धिमत्ताअर्थव्यवस्थारयत शिक्षण संस्थाकांजिण्याशिवनेरीपंढरपूरप्राजक्ता माळीघोरपडमुख्यमंत्रीआनंद शिंदेअप्पासाहेब धर्माधिकारीभालचंद्र वनाजी नेमाडेसह्याद्रीघनकचराझाडहोमरुल चळवळभारतरत्‍ननारायण विष्णु धर्माधिकारीभारतीय अणुऊर्जा आयोगलता मंगेशकरभौगोलिक माहिती प्रणालीसातवाहन साम्राज्यभारताची अर्थव्यवस्थाउंबरफकिरागर्भारपणश्यामची आईगायहिंदू धर्मगुळवेलक्लिओपात्रासमाजशास्त्रधनादेशदहशतवादशमीभरती व ओहोटीगणपती स्तोत्रेबाबासाहेब आंबेडकरमराठीतील बोलीभाषामहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीगौर गोपाल दासअमृता फडणवीसभीम जन्मभूमीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीधोंडो केशव कर्वेयोगजय श्री रामराजा राममोहन रॉयलावणीखान्देशलिंग गुणोत्तरवर्णमालानर्मदा नदीभारतीय आयुर्विमा महामंडळसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानआंब्यांच्या जातींची यादीएकनाथ शिंदेहवामानमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमानवी भूगोलआर्थिक विकासमलेरियाभारताचा भूगोलराष्ट्रीय महिला आयोगराज्यसभाभारतातील जागतिक वारसा स्थानेकेवडापंचशीलउमाजी नाईकगणपतीपुळेआवर्त सारणीसंभाजी राजांची राजमुद्राभारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादीजांभूळअभंगभारत सरकार कायदा १९३५पंचांगगोलमेज परिषदतुळजाभवानी मंदिर🡆 More