शिरपूर

महाराष्ट्र राज्यात अगदी उत्तरेस असलेल्या धुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागात शिरपूर हा एक तालुका आहे.शिरपूर तालुक्यातून मुंबई ते आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग जातो.

शिरपूर तालुका आदिवासी बहुल तालुका आहे. शिरपूर शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. शिरपूर तालुका हा संपूर्ण खान्देशात एक विकसित तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील प्रत्येक गावात रस्ते व पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. या शहरात राहणाऱ्या जनतेच्या सर्व मूलभूत गरजा भागतात आणि त्यांना जरूर त्या सोईसुविधा प्राप्त होतात.

शिरपूर
जिल्हा धुळे जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या १,०५,६९६
२०२२
क्षेत्रफळ १५१०.६७ कि.मी²
दूरध्वनी संकेतांक ०२५६३
टपाल संकेतांक ४२५-४०५
वाहन संकेतांक MH-18
निर्वाचित प्रमुख नगराध्यक्ष
(जयश्री अमरीश पटेल, भाजप)
प्रशासकीय प्रमुख उप नगराध्यक्ष
(भूपेश पटेल,भाजप)

शिरपूर तालुक्यात बोराडी, थाळनेर, सांगवी, अर्थे, दहिवद ही जास्त लोकसंख्येची गावे आहेत. या तालुक्याने पाणी व्यवस्थापन क्षेत्रात फार छान कामगिरी केली आहे. शिरपूर पॅटर्न म्हणून हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. शिरपूर शहरात शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या अनेक संस्था आहेत त्यात आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षण क्षेत्रात शिरपूर शहर बऱ्यापैकी आघाडीवर असून गावात चांगल्या शिक्षणसंस्था आहेत.

शिरपूर गावात औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणाच्या सोयीदेखील आहेत. शिरपूर गावात दोन प्रसिद्ध बालाजी (प्रतितिरुपती) मंदिरे असून खालच्या गावातील व वरच्या गावातील अशा नावाने ती ओळखली जातात, श्री तिरुपती बालाजी नावाने व दरवर्षी खंडेराव देवाच्या नावाने यात्रा भरते. शहरांत प्रभु व्यंकटेश बालाजी मंदिर, पाताळेश्वर मंदिर, खंडेराव मंदिर, माताभवानी मंदिर, अशी मंदिरे असून तीन मशिदी आहेत. शिरपूर तालुक्यातील थाळनेर हे लता मंगेशकर यांचं आजोळ आहे,येथे एक ऐतिहासिक किल्ला आहे.

शिरपूर तालुक्यातील दहिवद हे गाव प्रसिद्ध हिंदी व मराठी अभिनेत्री स्मिता पाटील हिचे जन्मगाव आहे.

शिरपूर हे प्रसिद्ध आहे ते येथे सुरू असलेल्या पाणी अडवा पाणी जिरवा ह्या कामांमुळे. ह्या कामांना मुळे "शिरपूर पँटर्न" म्हणून सर्वत्र ओळख मिळाली आहे.

तसेच शिरपूर तालुक्यातील गुगल नामांकन आठ प्राप्त उत्तर महाराष्ट्रातील एकमेव गुगल गाईड मनाेहर पांडुरंग वाघ यांचे जन्मस्थान आहे. मनोहर वाघ हे तंत्रस्नेही विषय साधनव्यक्ती आहेत यांनी अनेक स्थळे गुगल नकाशात जोडली आहेत त्या स्थळांना आजपर्यंत पंचवीस लाख लोकांनी भेटी दिल्या आहेत व त्यांचे यू ट्यूब चॅनल आहे.अधुनिक अध्यापन पद्धती वर ते शिक्षकांना मोफत मार्गदर्शन करतात व त्यांच्या सेमिनार ला आजपर्यंत बावीस हजार शिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे.

प्रशासन

खासदार- हिना गावित, नंदूरबार लोकसभा, भाजप

वि.स. आमदार- काशिराम पावरा,शिरपूर विधानसभा, भाजप

वि.प.आमदार-अमरीश पटेल,धुळे- नंदूरबार विधानपरिषद,भाजप

नगराध्यक्ष- जयश्री पटेल, शिरपूर- वरवाडे नगरपालिका, भाजप

उप नगराध्यक्ष- भूपेश पटेल, शिरपूर- वरवाडे नगरपालिका,भाजप

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आंबेडकर जयंतीमूलभूत हक्कस्थानिक स्वराज्य संस्थामिठाचा सत्याग्रहकोल्हापूर जिल्हामराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादीखासदारगुप्त साम्राज्यआवळानिबंधविनोबा भावेखान्देशत्रिपिटकभारताचे नियंत्रक व महालेखापालगोपाळ कृष्ण गोखलेभीमाशंकरभारताचे अर्थमंत्रीमराठी भाषाकृष्णा नदीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीसईबाई भोसलेविठ्ठल रामजी शिंदेलोकशाहीॲरिस्टॉटलशिर्डीवातावरणराजकारणस्वामी रामानंद तीर्थराजगडआर्थिक विकासविराट कोहलीभारतीय प्रजासत्ताक दिनसिंधुदुर्ग जिल्हारेबीजलोकसभाकार्ल मार्क्समहानुभाव पंथमराठी संतन्यूझ१८ लोकमतमहाभारतधनादेशमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहादेव गोविंद रानडेशेळी पालन१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धसायली संजीवलक्ष्मीकांत बेर्डेअर्जुन पुरस्कारबृहन्मुंबई महानगरपालिकाजॉन स्टुअर्ट मिलनामदेवशास्त्री सानपभारतातील मूलभूत हक्कबालविवाहरत्‍नागिरीजागतिक कामगार दिनमहाराष्ट्रप्रकाश आंबेडकरभारतीय आडनावेमहाराष्ट्रातील आरक्षणशेतकरीगुळवेलमहाराष्ट्राचा इतिहासगंगाराम गवाणकरयशवंतराव चव्हाणसंगणकाचा इतिहासप्रदूषणखो-खोभारतातील शासकीय योजनांची यादीकाळभैरवसिंधुदुर्गतोरणाइडन गार्डन्समहाराष्ट्र भूषण पुरस्कारश्यामची आईग्रामीण साहित्यजिया शंकरभारताच्या राष्ट्रपतींची यादीकेंद्रशासित प्रदेशसूर्यनमस्कार🡆 More