औंढा नागनाथ तालुका

औंढा नागनाथ तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक तालुका आहे.

येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी औंढा-नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली. 'आमर्दक सन्तान' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागांतही झाला होता.

टोपणनाव: नागनाथ / नागेश्वर
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य

१९° ३२′ ०४.३९″ N, ७७° ०२′ २२.४४″ E

भाषा मराठी
तहसील
पंचायत समिती

भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात एकेकाळी आमर्दक सरोवर होते. हे मंदिर एका विस्तीर्ण २९०X१९० फुटी आवारात असून त्याभोवती एक मोठा परकोट आहे. परकोटाला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तेच मुख्य प्रवेशद्वार होय. आवारातच एक पायविहीर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला जातो. सासू-सुनेची बारव असेही तिला म्हणतात. मुख्य मंदिराची लांबी १२६ फूट, रुंदी ११८ फूट आणि उंची ९६ फूट आहे. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरू विसोबा खेचर यांचेही गाव आहे. त्यांची समाधी या परिसरातच आहे.

येथे नागनाथ या नावाने महाविद्यालय आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील काहीं गांवे

औंढा नागनाथ तालुका
या तालुक्यातील गावांचा नकाशा

अंजनवाडा अंजनवाडी अनखळी असोंदा असोला असोला आजरसोंडा आमदरी उंडेगाव उखळी उमरा औंढा नागनाथ कंजारा काकडदाभा काठोडा तांडा कुंडकर पिंपरी केळी कोंडशी बुद्रूक गढाळा गांगलवाडी गोजेगाव गोळेगाव चिंचोली चिमेगाव चोंडी शहापूर जडगाव जलालदाभा जलालपूर जवळा जामगव्हाण जोडपिंपरी टाकळगाव ढेगज तपोवन दुघाळा तामटी तांडा दरेगाव दुरचुना देवाळा देवाळा दौडगाव धार नांदखेडा नांदगाव नागझरी नागेशवाडी नालेगाव निशाणा पांगरा पार्डी सावळी पिंपळदरी पिंपळा पुरजळ पूर पोटा पोटा खुर्द फुलदाभा बेरुळा बोरजा ब्राह्मणवाडा भोसी माथा मार्डी मूर्तीजापूर सावंगी मेथा येडूत येळी येहळेगाव रांजाळा राजदरी राजापूर रामेश्वर रूपूर लक्ष्मणनाईक तांडा लांडाळा लाख लोहरा खुर्द लोहरा बुद्रूक वगरवाडी वगरवाडी तांडा वडचुना वडद वसई वाळकी शिरड शहापूर शिरला संमगानाईक तांडा सारंगवाडी साळणा सावरखेडा सावळी खूर्द सावळी बुद्रूक सिद्धेश्‍वर सुकापूर सुरेगाव सूरवाडी सेंदूरसना सोनवाडी हिवरखेडा हिवराजाटू ........ई.

संदर्भ


Tags:

औंढा नागनाथ मंदिरगुजराथभारतमध्य प्रदेशमहाराष्ट्रराजस्थानहिंगोली जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिराळा विधानसभा मतदारसंघनवग्रह स्तोत्रशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकअष्टविनायकभाषावार प्रांतरचनाचाफायकृतकावीळवंचित बहुजन आघाडीयुरोपकेंद्रीय वक्फ परिषदमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेलातूर लोकसभा मतदारसंघवसंतराव दादा पाटीलकुंभ राससंभाजी भोसलेथोरले बाजीराव पेशवेसंगणक विज्ञानकोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)बुद्ध पौर्णिमाभारतातील जिल्ह्यांची यादीहडप्पा संस्कृतीदिंडोरी लोकसभा मतदारसंघयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठराज्य निवडणूक आयोगजैवविविधतामहिलांसाठीचे कायदेकालभैरवाष्टकसिंहअश्वत्थामालता मंगेशकरमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीतुतारीदिशादत्तात्रेयरमाबाई आंबेडकर२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाताराबाईअंगणवाडीभारतातील शासकीय योजनांची यादीदक्षिण दिशाहस्तमैथुनजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)संयुक्त महाराष्ट्र समितीकोविड-१९ लसजवाहरलाल नेहरूइ.स.चे १३ वे शतकवेरूळ लेणीछावा (कादंबरी)मिश्र अर्थव्यवस्थाशेतीअर्थसंकल्पसिक्कीमबाळ ठाकरेमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमेंदूकर्करोगभारती पवारनामसुभाषचंद्र बोसविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीराम गणेश गडकरीमुंबई शहर जिल्हासावित्रीबाई फुलेहक्कमानवी विकास निर्देशांकमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीसातारा लोकसभा मतदारसंघसुशीलकुमार शिंदेनातीएकविरा२०१९ लोकसभा निवडणुकामराठा घराणी व राज्येधनगरभारतीय स्टेट बँकसरपंचविमारशियाचा इतिहासमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादी🡆 More