शेतकऱ्याचा असूड: एक पुस्तक

शेतकऱ्याचा असूड हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८ जुलै, १८८३ रोजी लिहिले आहे.

परंतु तत्कालीन सामाजिक परिस्थितीत आणि काही कारणाने हा ग्रंथ ताबडतोब प्रकाशित होऊ शकला नाही. विशेष म्हणजे या पुस्तकाचे लेखनही सलग झालेले नाही. जसजसे फुले या पुस्तकाचे भाग लिहीत तसतसे ते त्यांचे जाहीर वाचन करीत असत. या पुस्तकाचा चौथा भाग १८८३ च्या एप्रिल महिन्यात मुंबई शहरात वाचला अशी जोतीरावांनी एका तळटीपेत नोंद केली असल्याचे दिसून येते. फुले यांनी पुणे, ठाणे, जुन्नर, ओतूर, हडपसर, वंगणी, माळ्याचे कुरुल या गावीही त्यांनी या ग्रंथाचे वाचन केले होते. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यासमोर फुल्यांनी जेव्हा या ग्रंथाचे वाचन केले तेव्हा त्यांनी ते लक्षपूर्वक ऐकून फुले याचा सत्कार केला होता. या पुस्तकाच्या हस्तलिखिताची एक प्रत भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल तसेच मुंबईचे गव्हर्नर यांनाही पाठवल्या गेली होती. या ग्रंथाचे पहिले दोन भाग नारायण मेघाजी लोखंडे यांनी “दीनबंधू” पत्रांत छापले होते. परंतु नंतर त्यांनी पुढचे भाग छापण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या फुल्यांनी लोखंडयाना “भेकड छापखानेवाले” म्हटले होते. फुल्यांच्या निधना नंतर १८९३ साली त्यांचे निकटचे सहकारी लोखंडे आणि कृ. पां. भालेकर यांच्यामध्ये वाद सुरू झाला. तेव्हा “शेतकऱ्याचा कैवारी” या पत्रात भालेकरांनी २८ ऑक्टोबर, १८८३ च्या दीनबंधूच्या संपादकीयातील काही मजकूर उदधृत केला होता. त्यात लोखंडे यांनी असे म्हटले होते की, सदरील ग्रंथाची भाषा अत्यंत कठोर असल्याने मोठी टीका तसेच कार्यवाही देखील होऊ शकते.

संदर्भ

बाह्य दुवे

शेतकऱ्याचा असूड: एक पुस्तक 
विकिस्रोत
शेतकऱ्याचा असूड हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

Tags:

महात्मा फुले

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुखपृष्ठमहिलांचा मताधिकारसावता माळीभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीमहाराष्ट्रातील नद्यांची यादीप्राथमिक शिक्षणमातीमुळाक्षरकोरेगावची लढाईमेंदूस्त्रीवादकन्या रासदेवेंद्र फडणवीसपृथ्वीचे वातावरणव्हॉट्सॲपअर्थ (भाषा)भारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशखडकवासला विधानसभा मतदारसंघसंस्कृतीमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनसम्राट हर्षवर्धन२०१४ लोकसभा निवडणुकामिया खलिफाआंबाविमाछावा (कादंबरी)अचलपूर विधानसभा मतदारसंघविठ्ठलएकनाथ शिंदेइंदिरा गांधीमहाराष्ट्रातील राजकारणबाळशास्त्री जांभेकरभगतसिंगकल्की अवतारमहात्मा गांधीनंदुरबार लोकसभा मतदारसंघआज्ञापत्रभारूडउच्च रक्तदाबसाखरब्राझीलसॅम पित्रोदादारिद्र्यरेषाजॉन स्टुअर्ट मिलयकृतपंचायत समितीबाजरीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीसम्राट अशोक जयंतीरावणपरभणी लोकसभा मतदारसंघआंबेडकर जयंतीहडप्पा संस्कृतीअभिनययशवंतराव चव्हाणअर्जुन वृक्षभारतीय आडनावेघनकचरानगर परिषदगुरू ग्रहजालियनवाला बाग हत्याकांडहिंदू धर्मातील अंतिम विधीसंशोधनसोळा संस्कारतिरुपती बालाजीपुणेवातावरणशिवछत्रपती पुरस्कारशहाजीराजे भोसलेन्यूझ१८ लोकमतढोलकीभारतीय लष्करप्रेरणाअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमकोकणवर्धमान महावीर🡆 More