शरभ

शरभ हा हिंदू पुराणांमध्ये वर्णिलेला, अंशतः सिंह व अंशतः पक्षी अशा रूपातला एक काल्पनिक प्राणी आहे.

संस्कृत साहित्यातल्या वर्णनांनुसार आठ पाय असणारा हा प्राणी हत्तीसिंह यांपेक्षा सामर्थ्यवान असून सिंहास मारू शकतो.

शरभ
श्रीलंकेतील मुनीश्वरम् मंदिरातले नरसिंहाचे दमन करणाऱ्या शरभाचे चित्र

शैव ग्रंथांनुसार विष्णूच्या उग्र नृसिंहावतारास काबूत आणण्यासाठी व त्याला नृसिंहावतारातून मूळ सौम्य रूपात परत आणण्यासाठी शंकराने शरभाचा अवतार घेतला. शंकराचा हा अवतार शरभेश्वर अथवा शरभेश्वरमूर्ती या नावाने उल्लेखला जातो. बौद्ध जातककथांनुसार शरभ हा बुद्धाच्या पूर्वावतारांपैकी एक आहे.

सांस्कृतिक संदर्भ

प्रतीक म्हणून

शरभ 
कर्नाटकाचे राज्यचिन्ह : मध्ये गंडभेरुंड आणि त्याच्या दोन बाजूंस सोंड व तांबडी आयाळ असलेले दोन शरभ.

भारतातील कर्नाटक राज्याच्या राजचिन्हात शरभाची आकृती आढळते. या राज्यचिन्हात मध्यभागी गंडभेरुंड (दोन तोंडांचा एक मिथक् पक्षी) असून त्याच्या दोन बाजूंना तांबडी आयाळ असलेले दोन शरभ उभे आहेत. या चिन्हातील विशेष गोष्ट अशी, की यातल्या शरभांचे रूप अंशतः सिंहाचे व अंशतः हत्तीचे दिसते.

महाराष्ट्रातील शरभ चिन्हे

शरभ हे यादवकालीन चिन्ह असल्याने ते महाराष्ट्रातही अनेक ऐतिहासिक इमारतींवर दिसते. उदा० विचित्रगड नावाच्या किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी तर दुसऱ्या दरवाज्यावर दोन्ही बाजूंस दोन सिंह आणि शरभ कोरलेले आहेत. (तिसऱ्या दरवाज्याच्या माथ्यावर हत्ती कोरले आहेत.)

शरभ 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

संस्कृत भाषासिंहहत्तीहिंदू धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय अणुऊर्जा आयोगमाहिती अधिकारभारतीय संविधानाचे कलम ३७०भारतीय संविधानाची उद्देशिकानवग्रह स्तोत्रखासदारश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठघोणसकोल्हापूररावणट्विटरज्योतिबायशवंतराव चव्हाणकार्ल मार्क्सखो-खोचारुशीला साबळेमहाराष्ट्र राज्य महिला आयोगजहाल मतवादी चळवळमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गमुरूड-जंजिरासंजय गांधी राष्ट्रीय उद्यानमोहन गोखलेसाम्यवादसूर्यभारताच्या राष्ट्रपतींची यादीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)तलाठीपृथ्वीयशोमती चंद्रकांत ठाकूरसिंधुदुर्ग जिल्हामहाराष्ट्रातील पर्यटनतुळजापूरविवाहभारतीय प्रशासकीय सेवाराष्ट्रीय महामार्गअब्देल फताह एल-सिसीमानवी भूगोलवेरूळ लेणीभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीराष्ट्रकुल खेळकोपेश्वर मंदिर, खिद्रापूरक्रियापदजागतिकीकरणशनिवार वाडाकोरफडबसवेश्वरसाडेतीन शुभ मुहूर्तभगवद्‌गीताराजगडमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीझाडमहाधिवक्तामुंबईमहारनाटोमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीअप्पासाहेब धर्माधिकारीजेजुरीभारतीय आडनावेसंयुक्त राष्ट्रेक्रियाविशेषणलिंगभावखंडोबाझेंडा सत्याग्रहराष्ट्रीय स्वयंसेवक संघलिंग गुणोत्तरहिंदुस्तानमहाराष्ट्र विधान परिषदमराठीतील बोलीभाषापानिपतभीम जन्मभूमीदादोबा पांडुरंग तर्खडकरमहाराष्ट्रातील राजकारणभारताचा स्वातंत्र्यलढाआकाशवाणीहत्तीरोगॲलन रिकमन🡆 More