बॉम्बे प्रांत

बॉम्बे प्रांत किंवा बॉंबे प्रेसिडेन्सी (इंग्रजी: Bombay Presidency) हा ब्रिटिश भारताच्या प्रांतीय स्वरूपाचा राजकीय विभाग होता.

वर्तमान भारतीय प्रजासत्ताकाच्या पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक हे भूप्रदेश, वर्तमान पाकिस्तानातील सिंध प्रांत, तसेच वर्तमान येमेनमधील एडन या प्रदेशांचा मुंबई प्रांतामध्ये समावेश होता. मुंबई प्रांताची राजधानी मुंबई ही होती.

Bombay presidency
बॉम्बे प्रांत
ब्रिटीश भारताच्या प्रांत
बॉम्बे प्रांत
ध्वज
बॉम्बे प्रांत
चिन्ह

Bombay presidencyचे ब्रिटीश भारत देशाच्या नकाशातील स्थान
Bombay presidencyचे ब्रिटीश भारत देशामधील स्थान
देश साचा:देश माहिती ब्रिटीश भारत
स्थापना इ.स.१६१८
राजधानी मुंबई (बॉम्बे)
राजकीय भाषा मराठी, कन्नड, गुजराती, सिंधी, उर्दू, इंग्रजी, हिंदी.
क्षेत्रफळ ४,८८,८५० चौ. किमी (१,८८,७५० चौ. मैल)
लोकसंख्या २,५४,६८,२०९(१९०१)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०

प्रशासन

मुंबई प्रदेशाचे चार भाग असून त्या प्रत्येकावर एकेक कमिशनर नेमलेला होता. त्यांची मुख्यालये कराची, अहमदाबाद, पुणे आणि बेळगाव येथे होती. प्रत्येक जिल्ह्या प्रमुख अधिकारी हा कलेक्टर असून त्याच्या जोडीला असिस्टंट कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर असत. प्रत्येक जिल्ह्यात सुमारे आठ तालुके असत आणि प्रत्येक तालुक्यात १००-२०० गावे असत. प्रत्येक गावात पाटील, कुलकर्णी, खोत, तलाठी आणि महार इ. कारभारी असत.

ब्रिटिश काळात मुंबई प्रांताचा प्रमुख हा गव्हर्नर असे. या मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर होते. त्यांनी १९३७ ते ऑक्टोबर १९३९ पर्यंत कारभार पहिला. त्यानंतर सुमारे ७ वर्ष गव्हर्नरचे शासन होते. परत ३० मार्च १९४६ ते १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत बाळ गंगाधर खेर हेच होते.

प्रशासकीय विभाग

बॉम्बे प्रांत 
मुंबई इलाख्याचे मानचित्र

मुंबई प्रांताचे प्रशासकीय विभाग:- १. उत्तर किंवा गुजरात २. मध्य किंवा डेक्कन (दख्खन) ३. दक्षिण किंवा कर्नाटक ४. सिंध

मुंबई प्रांतातील जिल्हे:-

अ] गुजरात विभाग

१. मुंबई शहर २. अहमदाबाद ३. भरूच ४. खेडा ५. पंच महाल ६. सुरत ७. ठाणे ८. कुलाबा ९. रत्‍नागिरी

आ] दख्खन विभाग

१०. अहमदनगर ११. खान्देश (१९०६ मध्ये दोन जिल्ह्यांत विभाजन) १२. नाशिक १३. पुणे १४. सातारा १५. सोलापूर

इ] कर्नाटक विभाग

१६. बेळगाव १७. विजापूर १८. धारवाड १९. उत्तर कानडा

ई] सिंध विभाग

२०. कराची २१. हैदराबाद २२. शिकारपूर २३. थर आणि पारकर २४. उत्तर सिंध सीमान्त

संस्थाने

मुंबई इलाख्यातील संस्थाने -

अ] डेक्कन स्टेट एजन्सी - १. कोल्हापूर २. अक्कलकोट ३. औंध ४. जमखिंडी ५. जंजिरा ६. कुरुंदवाड (थोरले) ७. कुरुंदवाड (धाकटे) ८. मिरज (थोरले) ९. मिरज (धाकटे) १०. मुधोळ ११. फलटण १२. रामदुर्ग १३. सांगली १४. डफळापूर १५. जत १६. सावंतवाडी १७. सावनूर १८. भोर

समाजव्यवस्था

बॉम्बे प्रांत 
मुंबईतील एलफिस्टन महाविद्यालय
बॉम्बे प्रांत 
मुंबईतील विक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आत्ताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस

मुंबई प्रांतात प्रामुख्याने सिंधी, मराठी, गुजराती आणि कन्नड या चार भाषा आणि त्यांच्या उपभाषा बोलल्या जायच्या. मुंबई प्रदेशात एकूण लोकसंख्येत हिंदूंचे प्रमाण अधिक आहे. कानडी भागात बहुतांशी लिंगायत पंथाचे लोक होते. सिंधमध्ये सिंधी व मुसलमान आणि गुजरातमध्ये गुजराती व जैन समाजाचे लोक होते.

स्वातंत्र्योत्तर कालखंड

भारत स्वतंत्र झाल्यावर १९६० सालापर्यंत अनुक्रमे बाळ गंगाधर खेर आणि मोरारजी देसाई हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर मुंबई प्रांताचे विभाजन झाले आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली.

स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांतातील सिंध प्रदेश हा पाकिस्तानात समाविष्ट झाला. गुजरात प्रदेश भारताचे एक घटक राज्य बनले. कर्नाटक प्रदेश हा तत्कालीन म्हैसूर राज्याला जोडला गेला. कोकण, खानदेश आणि देश हे प्रदेश आणि मध्य प्रांतातील विदर्भ व वऱ्हाड आणि हैदराबाद संस्थानातील मराठवाडा यांचे मिळून महाराष्ट्र राज्य निर्माण झाले.

हे सुद्धा पहा

Tags:

बॉम्बे प्रांत प्रशासनबॉम्बे प्रांत प्रशासकीय विभागबॉम्बे प्रांत संस्थानेबॉम्बे प्रांत समाजव्यवस्थाबॉम्बे प्रांत स्वातंत्र्योत्तर कालखंडबॉम्बे प्रांत हे सुद्धा पहाबॉम्बे प्रांतइंग्लिश भाषाएडनकर्नाटकगुजरातपाकिस्तानभारतीय प्रजासत्ताकमहाराष्ट्रयेमेनसिंध

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राज्य निवडणूक आयोगसाडीपोक्सो कायदाराष्ट्रीय महिला आयोगमुक्ताबाईआवळागृह विभाग, महाराष्ट्र शासनपुरस्कारस्वतंत्र मजूर पक्षमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाहनुमानमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गसत्यशोधक समाजमराठी भाषारत्‍नेनारायण मेघाजी लोखंडेगुळवेलसज्जनगडसप्त चिरंजीवजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)बौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रमारुती चितमपल्लीव्यवस्थापनमुंबई–पुणे द्रुतगती मार्गउत्पादन (अर्थशास्त्र)सूरज एंगडेफुटबॉलमहाराष्ट्र विधान परिषदविरामचिन्हेजिजाबाई शहाजी भोसलेसापसंगीतातील रागवसंतराव नाईकब्रिक्सभारतातील राजकीय पक्षबाळशास्त्री जांभेकरदर्पण (वृत्तपत्र)जिल्हाधिकारीभारताचे सर्वोच्च न्यायालयवामन कर्डकनालंदा विद्यापीठभूगोलअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीवायू प्रदूषणमहाबळेश्वरभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यामधुमेहअतिसारसातारा जिल्हाराष्ट्रीय सभेची स्थापनाहोमिओपॅथीभारतीय रिझर्व बँकगंगाराम गवाणकरचंद्रकर्जसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभाषा विकासमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीचोळ साम्राज्यनदीअकबरअंकुश चौधरीकर्कवृत्तज्योतिषक्रियापदअक्षय्य तृतीयानेपाळतापी नदीउंबरघारापुरी लेणीकोल्हापूरभारत सरकार कायदा १९१९सूर्यनमस्कारमोह (वृक्ष)रक्तकालभैरवाष्टकभारतीय नौदल🡆 More