४चान

४चान ही एक इंग्रजी सोशल संकेतस्थळ आहे.

वापरकर्ते सामान्यतः अनामिकपणे पोस्ट करतात. ४चान स्वतःच्या विशिष्ट सामग्री आणि मार्गदर्शक तत्त्वांसह विविध बोर्डमध्ये विभाजित केलेले आहे. 1 ऑक्टोबर 2003 रोजी सुरू करण्यात आलेली ही साइट जपानी इमेजबोर्डवर, विशेषतः Futaba Channel चॅनलवर आधारित आहे. ही साइट पटकन लोकप्रिय झाली, विस्तारित झाली आणि आता व्हिडिओगेम्स, संगीत, साहित्य, फिटनेस, राजकारण आणि क्रीडा यांसारख्या विविध विषयांवर समर्पित बोर्ड येथे उपलब्ध आहेत.

४चान
प्रकार खाजगी कंपनी
उद्योग क्षेत्र इंटरनेट
संस्थापक ख्रिस्तोफर पोले
मालक हिरोयोकी निशिमुरा
संकेतस्थळ www.4chan.org/

हे संकेतस्थळ विविध अशा इंटरनेट गटांशी निगडित आहे, विशेषतः Anonymous, the alt-right आणि Project Chanology. ४चान वापरकर्त्यांनी बनवलेले अनेक इंटरनेट मेमे जसे की lolcats, Rickrolling, Chocolate Rai, Pedobear फारच लोकप्रिय झाले आहेत. "Random" हा या संकेतस्थळावरचा सर्वात प्रथम बनवण्यात आलेला बोर्ड आहे. "/b/" या नावानेही ओळखला जाणारा हा बोर्ड, ४चान वरील सर्वात जास्त भेट दिला जाणारा बोर्ड आहे. नावाप्रमाणेच, Random बोर्डवर पोस्ट केल्या जाणाऱ्या सामग्रीवर फारच कमी बंधने आहेत. म्हणजेच वापरकर्ता यावर संवेदनशील माहितीही पोस्ट करू शकतो. ह्या संकेतस्थळाने अनेक वेळा प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले आहे. त्याचप्रमाणे ४चानला अनेकदा इंटरनेट हल्लेखोरांचाही सामना करावा लागला आहे. उदाहरणार्थ, २०१० मध्ये DOS हल्ल्यांमुळे ४चानसह काही इतर संकेतस्थळेही काही कालावधीसाठी बंद पडली होती.

Alexa Ranking मध्ये ४चानचा क्रमांक साधारणता ७०० च्या आसपास असतो, तर 56 हा ४चानचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट क्रमांक आहे. आपली ओळख उघड न करता विचारांची देवाणघेवाण करता येत असल्यामुळे जगभरातील अनेक लोक विविध कारणांनी याचा उपयोग मोठ्या प्रमाणात करत असल्याचे दिसून येते. लोक आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार येथे उपलब्ध असलेल्या विविध समर्पित अशा बोर्डांचा वापर करू शकतात.

४चान वर अन्य संकेतस्थळ्स आणि इंटरनेट वापरकर्त्यांवर होणारे हल्ले समन्वयित करणे, आणि वैयक्तिक आणि सार्वजनिक प्रतिक्रिया उमटविण्यासाठी, हिंसाचाराची धमकी पोस्ट करणे यांसारख्या गंभीर प्रकार घडले आहेत. त्याचमुळे The Guardian या प्रसिद्ध वृत्तसंस्थेने आपल्या एका लेखामध्ये ४चानचा "वेडसर, तरुण ... उत्कृष्ट, हास्यास्पद आणि भयानक" असा उल्लेख केला आहे.

४चान ही वेबसाईट 2003 मध्ये न्यू यॉर्क शहरामध्ये राहणाऱ्या 15 वर्षीय ख्रिस्तोफर पोलेने सुरू केली. ४चान सुरू करण्याआधी, पोले Something Awful या फोरमवर कार्यरत होता. 'Moot' या नावाने कार्यरत असलेल्या पोलेला 21 जानेवारी 2015 रोजी विविध वादग्रस्त कारणांमुळे पायउतार व्हावे लागले. 21 सप्टेंबर 2015 रोजी Moot ने घोषणा केली की हिरोयोकी निशिमुराने ४चानचे मालकीहक्क विकत घेतले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये 9 जुलै 2008 रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखामधून पूलेची वास्तविक ओळख सर्वांसमोर आली. त्यापूर्वी तो "Moot" या नावानेच ओळखला जात होता आणि कोणालाच त्याचे खरे नाव व इतर माहिती माहीत नव्हती.

एप्रिल 2009 मध्ये, टाईम नियतकालिकाने केलेल्या 'ओपन इंटरनेट सर्वेक्षण 2008' मध्ये पोलेने बाजी मारून जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून स्थान प्राप्त केले होते.

या संकेतस्थळाचा एकूणएक इतिहास पाहता हे संकेतस्थळ अनेकदा विवादित मुद्यांमुळे सतत चर्चेत असल्याचे दिसून येते. बालकांची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती प्रसिद्ध करणे, ख्यातनाम व्यक्तींची खाजगी माहिती प्रसिद्ध करणे, खून, इंटरनेट हल्ले असे अनेक गुन्हेगारी प्रकार बऱ्याचदा घडल्यामुळे हे संकेतस्थळ अशा गोष्टींसाठी कुविख्यात झाले आहे. प्रस्तुत करता येणाऱ्या माहितीवर फारसे बंधन नसल्याने अनेकदा लोक याचा चुकीच्या पद्धतीने वापर असे दिसून येते. याचाच फायदा घेऊन अनेक समाजविघातक प्रवृत्ती आपला हेतू साध्य करताना दिसतात, मात्र असे असले तरी यामध्ये असे अनेक बोर्ड आहेत जेथे उपयुक्त अशी चर्चा सतत सुरू असते.

बाह्य दुवे

Tags:

राजकारण

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गृह विभाग, महाराष्ट्र शासनमनुस्मृतीप्रार्थना समाजमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गसई पल्लवीयवतमाळ जिल्हाभीमराव यशवंत आंबेडकरमधुमेहनवग्रह स्तोत्रहडप्पा संस्कृतीपानिपतची तिसरी लढाईभारतातील शासकीय योजनांची यादीहॉकीवर्णनात्मक भाषाशास्त्रमहादेव गोविंद रानडेमासिक पाळीसंत जनाबाईमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीऔद्योगिक क्रांतीजागतिक महिला दिनभारताचे उपराष्ट्रपतीविधान परिषदऋषी सुनकमहाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीतोरणाजगन्नाथ मंदिरअक्षय्य तृतीयाएकांकिकाकर्कवृत्तअर्थशास्त्रतलाठी कोतवालपन्हाळापाऊसब्रिज भूषण शरण सिंगप्रल्हाद केशव अत्रेमुंबई विद्यापीठसंयुक्त महाराष्ट्र चळवळसप्त चिरंजीवनामदेव ढसाळजैन धर्ममहात्मा फुलेक्षत्रियगोदावरी नदीकळंब वृक्षभोकरराष्ट्रवादी काँग्रेस पक्षभौगोलिक माहिती प्रणालीपाणीमांगभारतीय संविधानाची उद्देशिकाज्ञानपीठ पुरस्काररत्‍नागिरीमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागगगनगिरी महाराजभोपळाजागतिक दिवसज्वालामुखीतानाजी मालुसरेकृष्णजगातील देशांची यादीभीमा नदीगौतम बुद्धजिया शंकरबैलगाडा शर्यतबाळ ठाकरेसुजात आंबेडकरमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमुंबई–पुणे द्रुतगती मार्गनर्मदा नदीबखरमहाबळेश्वरहंबीरराव मोहितेकेदारनाथ मंदिरकाळाराम मंदिर सत्याग्रहग्रामीण साहित्यआडनाव🡆 More