हरनाज संधू

हरनाज कौर संधू (जन्म ३मार्च २०००) ही एक भारतीय मॉडेल असून इ.स.

२०२१ च्या विश्व सुंदरी पुरस्काराची मानकरी आहे. संधूने याआधी मिस दिवा युनिव्हर्स २०२१ची स्पर्धा देखील जिंकलेली आहे. विश्व सुंदरी स्पर्धा जिंकणारी ती भारतातील तिसरी स्पर्धक आहे.

हरनाज संधू
हरनाज संधू
जन्म हरनाज संधू
३ मार्च, २००० (2000-03-03) (वय: २४)
गुरूदासपूर, पंजाब , भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री मॉडेल
ख्याती

 •  फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९,
 •  मिस दिवा युनिव्हर्स २०२१,

 •  मिस युनिव्हर्स २०२१
पुरस्कार

 •  मिस दिवा युनिव्हर्स २०२१,

 •  मिस युनिव्हर्स २०२१

संधूने २०१९ मधील 'फेमिना मिस इंडिया पंजाब' स्पर्धेतील विजेती ठरली होती. तसेच फेमिना मिस इंडिया २०१९ मध्ये उपविजेता म्हणून स्थान पटकावले होते.

प्रारंभिक जीवन

हरनाज कौर संधूचा जन्म पंजाब मधील गुरदासपूर जिल्ह्यातील कोहली या गावी इस २००० मध्ये एका जाट शीख कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचे नाव प्रितमपाल सिंग संधू आणि रबिंदर कौर संधू आहे. तिच्या वडिलांचा व्यवसाय स्थावर मालमत्तेची खरेदी विक्री करण्याचा असून आई स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. संधूला हरनूर नावाचा मोठा भाऊ देखील आहे.

इस. २००६ मध्ये हे कुटुंब इंग्लंडला गेले होते परंतु अवघ्या दोन वर्षात ते भारतात परत आले आणि चंदीगढमध्ये स्थायिक झाले. संधुने चंदिगढ येथील शिवालिक पब्लिक स्कूल मधून आपले शालेय शिक्षण आणि गव्हर्नमेंट कॉलेज फॉर गर्ल्स मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मिस युनिव्हर्स होण्यापूर्वी संधू सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेत होती.

स्पर्धा

संधूने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली होती. तिने सुरुवातीला मिस चंदीगढ २०१७ आणि मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ सारखी विजेतेपदे जिंकली. सुरुवातीला, संधूने तिच्या पहिल्या स्पर्धेसाठी नोंदणी केली तेव्हा तिच्या वडिलांना याबद्दल सांगितले नाही. स्पर्धा जिंकल्यानंतर जेव्हा तिने आपल्या वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा त्यांना चांगलाच आनंद झाला. फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९ चे विजेतेपद पटकावल्यानंतर, संधूने फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला, जिथे तिने शेवटी टॉप १२ मध्ये स्थान मिळवले.

मिस दिवा २०२१

१६ ऑगस्ट २०२१ रोजी, संधूला मिस दिवा २०२१ च्या टॉप ५० सेमीफायनलपैकी एक म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी, टेलिव्हिजन मिस दिवा स्पर्धेत भाग घेणाऱ्या टॉप २० फायनलिस्टपैकी एक म्हणून तिची पुष्टी झाली. २२ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या प्राथमिक स्पर्धेदरम्यान, संधूने मिस ब्युटीफुल स्किन पुरस्कार जिंकला आणि मिस बीच बॉडी, मिस ब्युटीफुल स्माइल, मिस फोटोजेनिक आणि मिस टॅलेंटेडसाठी अंतिम फेरीत सहभागी झाले.

ग्रँड फिनालेदरम्यान मिस दिवा २०२१ स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेरीत संधूने टॉप १० सेमीफायनलमधील एक स्पर्धक म्हणून आपले मत पुढील प्रमाणे नोंदवले:

एक दुबळी मानसिक अवस्था असलेल्या एका तरुण मुलीपासून, जिने गुंडगिरीचा आणि लज्जास्पद शारीरिक छेडछाडीचा सामना केला तिच्या खऱ्या क्षमतेची जाणीव करून देणाऱ्या एका फिनिक्सप्रमाणे उदयास आलेल्या स्त्रीपासून. एकेकाळी स्वत:च्या क्षमतेवर शंका घेणाऱ्या व्यक्तीपासून तरुणांना प्रेरणा देण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या स्त्रीपर्यंत. आज, मी एक धाडसी, उत्साही आणि दयाळू स्त्री म्हणून विश्वासमोर अभिमानाने उभी आहे जी एका विशिष्ट उद्देशाने जीवन जगण्यासाठी आणि एक उल्लेखनीय वारसा मागे ठेवण्यासाठी सज्ज आहे.

स्पर्धेच्या पुढील फेरीत तिची निवड झाली. अंतिम प्रश्नोत्तर फेरीदरम्यान, पहिल्या ५ स्पर्धकांना बोलण्यासाठी वेगवेगळे विषय देण्यात आले, जे स्पर्धकांनी स्वतः ड्रॉद्वारे निवडले. संधू यांनी "ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज" निवडले होते, ज्यात तिने सांगितले:

एक दिवस जेव्हा आयुष्याचा प्रवास तुमच्या डोळ्यांसमोर येईल, तेव्हा ते पाहण्यालायक असेल याची खात्री करा. तथापि, हे असे जीवन नाही जे तुम्हाला पहायचे आहे, जिथे हवामान बदलत आहे आणि पर्यावरण मरत आहे. ही आम्हा मानवांनी निसर्गाच केलेली एक फसवणूक आहे जी

. मला विश्वास आहे की आपल्या बेजबाबदार वर्तनाला पूर्ववत करण्यासाठी आपल्याकडे अद्याप वेळ आहे. पृथ्वी ही आपल्या सर्वांच्या मध्ये सामाईक आहे आणि एक व्यक्ती म्हणून आपली छोटी कृती कोट्यवधींनी एकवटल्यास संपूर्ण जग बदलू शकते. आत्ताच प्रारंभ करा, आज रात्रीपासूनच, स्विच ऑफ करा ते अतिरिक्त दिवे जे वापरात नाहीत. धन्यवाद.

इव्हेंटच्या शेवटी, संधूला विजेते म्हणून गतवर्षीच्या विजेत्या 'ॲडलाइन कॅस्टेलिनोने' मुकूट दिला.

मिस युनिव्हर्स २०२१

मिस दिवा २०२१ म्हणून, संधूला मिस युनिव्हर्स 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार मिळाला. ही स्पर्धा इस्रायल मधील ऐलात शहरात १२ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात आली. संधूने सुरुवातीच्या ८० स्पर्धकांच्या गटातून अव्वल सोळामध्ये प्रवेश केला, नंतर ती विजेता म्हणून ताज मिळवण्याआधी टॉप टेन, टॉप फाइव्ह आणि टॉप तीनमध्ये पोहोचली. तिच्या विजयानंतर, ती मिस युनिव्हर्सचा ताज जिंकणारी तिसरी भारतीय महिला ठरली. Following her win, she became the third Indian woman to be crowned Miss Universe.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

Tags:

हरनाज संधू प्रारंभिक जीवनहरनाज संधू स्पर्धाहरनाज संधू संदर्भ आणि नोंदीहरनाज संधू बाह्य दुवेहरनाज संधूविश्व सुंदरी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

खडकांचे प्रकारदिवाळीस्वस्तिकबाळ ठाकरेमाढा विधानसभा मतदारसंघभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीखडकफुफ्फुसराजरत्न आंबेडकरमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीपानिपतची तिसरी लढाईनागरी सेवाकुळीथभारताच्या राष्ट्रपतींची यादीमहाराष्ट्र विधानसभारतन टाटाअंकिती बोसप्रदूषणवसाहतवादनवनीत राणारशियाचा इतिहासशिवसेनामराठी व्याकरणतेजस ठाकरेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपुरातत्त्वशास्त्रहनुमान चालीसाजालना जिल्हामांगनाशिक लोकसभा मतदारसंघपृथ्वीअजिंठा-वेरुळची लेणीआकाशवाणीहिंदू कोड बिलविंचूमोबाईल फोनलोकमतव्यंजनछत्रपती संभाजीनगरभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याबाराखडीकुबेरसोयराबाई भोसलेभारतीय संविधानाचे कलम ३७०महाराष्ट्र टाइम्सअकोला जिल्हाययाति (कादंबरी)लॉर्ड डलहौसीवाघमृत्युंजय (कादंबरी)ट्विटरभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेप्रेरणास्मिता शेवाळेकवितासांगली२०१४ लोकसभा निवडणुकाछावा (कादंबरी)घनकचरानामदेव ढसाळईशान्य दिशा२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाभारताचा भूगोलदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघसंयुक्त राष्ट्रेअशोक चव्हाणमाहिती अधिकारसमाजशास्त्रकेरळवाचनजैवविविधतासांगली जिल्हामहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेवि.वा. शिरवाडकरहिंगोली जिल्हादक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाविनयभंगताराबाई शिंदेझाड🡆 More