सुरगाणा

साचा:वाळूटझिरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्याचे गाव आहे.

वाळूटझिरा वाळूटझिरा हे गाव सुरगाणा तालुक्यातील भवानदगड ग्रामपंचायतीमधील पाचशे लोकवस्ती असलेले सुरगाणा पासून 12 कि.मी अंतरावर गाव आहे. ह्या गावाजवळ तान नदी उगम पावली आहे व पुढे ती गुजरात मधुन अरबी समुद्राला जाऊन मिळते. ह्या गावामध्ये कोकणा, वारली, महादेव कोळी ह्या आदिवासी जमातीचे लोक राहतात. वाळूटझिरा गावांचे एकूण तीन पाडे आहेत.त्यामध्ये तिवशेमाळ ,हेदिचापाडा, व वाळूटझिरा असे पाडे आहेत. वाळूटझिरा गावाच्या पूर्वेला अगदि रस्त्याच्या कडेला लागूनच शिव मंदिर आहे .व मंदिराच्या पूर्वेला 200 मी.अंतरावर आदिवासी निसर्ग देवता वाघदेव नागदेव आहे .याची पुजा दरवर्षी वाघबारस या दिवशी केली जाते . गावाच्या पूर्वेला व उत्तर दक्षिण बाजुला उंचच उंच डोंगर पसरलेला आहे व पश्चिमेला घनदाट जंगल आहे.जंगलामध्ये वाघ, तरस,माकड,खार ,रानमांजर ,ससा,मुंगुस ,सियार,इ.जंगली प्राणी आढळून येतात.तसेच नाग ,घोणस ,परड,विंचू,इ.सरपटणारे प्राणी आढळून येतात. येथील लग्न आदिवासी पंरपरेनुसार होतात.तसेच डोंगरमाऊली (भाया),हा गावित परिवातील उत्सव मोठ्या आनंदाने दर दहा वर्षानी साजरा केला जातो.तसेच तेरा,नागपंचमी (पचवी) ,पीत्री,मकर संक्रांत ,दिपावली,बैलपोळा ,होळी ,अक्षय तृतीया (अखाती) वाघबारस हे सण साजरा केले जातात.

      गावामध्ये 1ली ते 4 थी पर्यंत शाळा आहे.पुढील शिक्षणासाठी तालुकाच्या ठीकाणी जावे लागते.बरेसे विद्यार्थी हे आश्रम शाळेत शिक्षण घेतात.वाळूटझिरा गाव हे 100% आदिवासी गाव आहे.वाळूटझिरा गावाच्या पश्चिमेला 1 कि.मी.अंतरावर व तीवशेमाळच्या पूर्वेला 200 मी अंतरावर वाळूटझिरा नावाचे एक छोटेसे तलाव आहे.या तलावावरून गावांचे नाव वाळूटझिरा हे पडले.       1990 पुर्वी ह्या गावाजवळून सकाळी व संध्याकाळी फक्त एक बस सुरगाणा येथे जात होती .याच्या व्यतिरिक्त वाहतुकीचे एकही साधन नव्हते. सर्व लोक पायी प्रवास करीत होते.या गावाच्या 2 कि.मी.अंतरावर गुजरात मधील डांग जिल्ह्याची हद्द असल्याने गुजरात मधील बोली भाषेचा प्रभाव पडलेला आहे .95% लोक हे डांगी भाषा बोलणारे आहेत.येथील पावरी नृत्य,ठाकर्या नृत्य,तुर,काहळया आदिवासी नृत्य,मादोळ आदिवासी नृत्य, हे नृत्य प्रकार आढळून येतात.येथील तीनही पाडयाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. 

Tags:

नाशिक जिल्हाभारतमहाराष्ट्रसुरगाणा तालुका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विधान परिषदमहात्मा फुलेभारतातील मूलभूत हक्कस्थानिक स्वराज्य संस्थास्वामी समर्थनामदेवभारताच्या सरन्यायाधीशांची यादीसंवादअकोला जिल्हामहाराष्ट्राचा इतिहासभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघउभयान्वयी अव्ययकेळमंगळ ग्रहबलुतेदारजीभठरलं तर मग!मातीशिवनेरीशिवाजी महाराजांची राजमुद्राकृष्णदुष्काळफुफ्फुसकर्करोगमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)मुखपृष्ठऋतुराज गायकवाडभारताचे सर्वोच्च न्यायालयमहाराष्ट्र गीतवित्त आयोगज्ञानेश्वरीमहाबळेश्वरईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघश्रीनिवास रामानुजनविनोबा भावेरंगपंचमीसमाज माध्यमेसिंहगडसूर्यराजपत्रित अधिकारीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेहेमंत गोडसे१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धकोरफडमुलाखतमकरसंक्रांतछगन भुजबळपारू (मालिका)संयुक्त राष्ट्रेमाळीआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५कांजिण्यासंयुक्त महाराष्ट्र चळवळराष्ट्रवादबच्चू कडूमहासागरभारताचा स्वातंत्र्यलढानाटकयूट्यूबचंद्रनैसर्गिक पर्यावरणभूकंपअनुदिनीभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीगोवरहंबीरराव मोहितेएकनाथवातावरणप्रकाश आंबेडकरनितीन गडकरीतांदूळपरभणी लोकसभा मतदारसंघज्योतिर्लिंगकुळीथपोपटजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)🡆 More