मध्यराशिमेघ: पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचे ढग

इंग्रजी नाव - Altocumulus Cloud

इंग्रजी खुण - Ac

मेघतळ पातळी मध्य

२००० ते ७००० मीटर

आढळ जगभर सर्वत्र
काळ संपूर्ण वर्षभर
मध्यराशिमेघ: पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचे ढग
पुण्याच्या आकाशातील मध्यराशीमेघ

हे मध्य पातळीवर आढळणारे पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचे ढग  मुख्यतः सूक्ष्म जलबिंदूचे बनलेले असून छोट्या छोट्या ढगांच्या पुंजक्यांच्या आकारात दिसतात. तंतुराशीमेघांपेक्षा ह्या ढगांचे मेघ घटक  मोठे दिसतात. हे ढग नेहमी अनेक रेषांच्या किंवा लहरींच्या समूहात पाहायला मिळतात. दुपारी आकाशात हे ढग असल्यास त्यांची सावली खाली पडू शकते. काही वेळा ह्या ढगांची व्याप्ती संपूर्ण आकाशभरही असू शकते पण ह्या ढगांमुळे सूर्याभोवती वलय मात्र पाहायला मिळत नाही. कधीकधी ढगांच्या कडा  कमी जाडीच्या आणि तंतुमय असल्यास ह्या कडातून प्रकाश किरणांचे विकिरण होऊन ह्या कडांना वेगवेगळे रंग मिळालेले दिसतात. ह्या ढगातून सूर्यकिरण खालवर पोहोचत नसल्यामुळे ह्या ढगांचे तळ नेहमी काळसर दिसतात.

दिवसा खूप तापलेला पृथ्वीचा पृष्ठभाग रात्री उष्णता उत्सर्जित करतो. त्यामुळे त्याच्या संपर्कातील आर्द्रतायुक्त हवा वरवर जाऊन थंड होते आणि त्यामुळे त्यातील जलबिंदूचे हे ढग रात्रीतून तयार होतात. मात्र दिवस उजाडल्यावर त्यावर सूर्याचे किरण पडल्याने  त्यातील उष्णतेने जलबिंदूची वाफ होऊन असे ढग नाहीसे होतात.

शिखरी मध्यराशीमेघ [Altocumulus Castellanus ] ह्या प्रकारचे ढग तयार होणं हे अस्थिर हवेचं आणि त्यामुळे येऊ घातलेल्या गडगडाटी वादळाचं चिन्ह मानलं जातं.

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचे उपराष्ट्रपतीरेडिओजॉकीखान अब्दुल गफारखानकेवडालोकमतवचन (व्याकरण)रेशीमचीनअंबाजोगाईपवन ऊर्जावाहतुकीचे सर्वसाधारण नियमशिवाजी महाराजांचा जीवनक्रमशिल्पकलामेंदूमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीभारतीय संसदसम्राट हर्षवर्धनवंदे भारत एक्सप्रेसशमीअहमदनगरभारतीय पंचवार्षिक योजनावाणिज्यलहुजी राघोजी साळवेविजयदुर्गमेळघाट व्याघ्र प्रकल्पखाशाबा जाधवगर्भाशयनाटोटोपणनावानुसार मराठी लेखकमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेस्वामी समर्थरतिचित्रणभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीभारतातील जातिव्यवस्थासम्राट अशोकमाधुरी दीक्षितअन्नप्राशनक्रियापदलोकसभेचा अध्यक्षहॉकीविठ्ठलपानिपतची पहिली लढाईगेंडामहाबळेश्वरस्वच्छताभारताचा ध्वजगजानन महाराजपरशुराम घाटदशावतारसंयुक्त राष्ट्रेआंग्कोर वाटपांडुरंग सदाशिव सानेसूर्यफूलहोमरुल चळवळलिंग गुणोत्तरएकनाथ शिंदेभारताचे नियंत्रक व महालेखापालआग्नेय दिशाराजाराम भोसलेऋग्वेदअकबरहनुमान चालीसाअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदहत्तीअजिंठा लेणीहरितक्रांतीभारताची संविधान सभाकुटुंबकुंभ रासभारताचा स्वातंत्र्यलढागणपतीभारतीय नियोजन आयोगरामनेतृत्वचिकूमलेरियामोगरा🡆 More