सूर्यमाला

__असंपादनक्षम__

 सूर्यमाला

सूर्यमाला

सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणार्‍या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे १६५ ज्ञात नैसर्गिक उपग्रह, ५ बटु ग्रह (प्लूटोसकट), तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो. सर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील विभाग करण्यात येतात - सूर्य, ४ अंतर्गत ग्रह, लघुग्रहांचा पट्टा, ४ बाह्य राक्षसी वायू ग्रह व कायपरचा पट्टा. कायपरच्या पट्ट्यापुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी ऊर्टचा मेघ आढळतात. सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनसनेपच्यून. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती नैसर्गिक उपग्रह आहेत. तर बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. पाच बटु ग्रह म्हणजे प्लुटो, लघुग्रहांच्या पट्ट्यातील सेरेस, कायपरच्या पट्ट्यातील एरिस, हौमिआमाकीमाकी. या पाच पैकी तीन बटु ग्रहांभोवती नैसर्गिक उपग्रह आहेत.

संक्षिप्त सूची

सूर्य - बुध - शुक्र - पृथ्वी - मंगळ - गुरू - शनी - युरेनस - नेपच्यून.

 विशेष लेख

प्लूटो हा सूर्यमालेतील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा बटु ग्रह आहे (एरिस नंतर) तसेच सूर्याला प्रदक्षिणा मारणार्‍या खगोलीय वस्तूंमधील दहाव्या क्रमांकाची खगोलीय वस्तू आहे. सुरुवातीला प्लूटोला ग्रह मानण्यात येत असे पण आता तो कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी खगोलीय वस्तू म्हणून वर्गीकृत होतो. प्लूटोचे अधिकृत नाव १३४३४० प्लूटो असे आहे.

कायपरच्या पट्ट्यातील इतर सदस्यांप्रमाणे प्लूटो हा मुख्यत्वे दगड व बर्फ यांच्यापासून बनला आहे तसेच तुलनेने छोटा आहे (वस्तुमानात पृथ्वीच्या चंद्राच्या अंदाजे एक पंचमांश व आकारमानात त्याच्या अंदाजे एक तृतियांश). याची भ्रमणकक्षा अती-लंबवर्तुळाकार असून त्यामुळे काही वेळा हा ग्रह सूर्यापासून नेपच्यूनपेक्षा जवळ येतो. प्लूटो व त्याचा सर्वात मोठा उपग्रह खारॉन यांना अनेकदा जुळे ग्रह मानण्यात येते. प्लूटोला अजून दोन छोटे उपग्रह आहेत - निक्सहायड्रा - ज्यांचा शोध २००५ मध्ये लागला.

प्लूटोचा शोध १९३० साली लागला व तेव्हापासून २००६ पर्यंत प्लूटोला सूर्यमालेतील नववा ग्रह समजण्यात येत असे. पण २०व्या शतकाच्या शेवटीशेवटी तसेच २१व्या शतकाच्या सुरुवातीला प्लूटोसारख्या अनेक खगोलीय वस्तूंचा शोध लागला. यातील नोंद घेण्याप्रत वस्तू म्हणजे विखुरलेल्या चकतीमधील एरिस, ज्याचे वस्तुमान प्लूटोपेक्षा २७% जास्त आहे.या वर्गीकरणानंतर प्लूटोला लघुग्रहांच्या यादीत टाकण्यात आले व त्याला १३४३४० हा क्रमांक देण्यात आला. मात्र अनेक शास्त्रज्ञांच्या मते प्लूटोला परत ग्रहांच्या वर्गात टाकण्यात यावे.


पुढे वाचा...

 इतर माहिती

शुक्र
  • सूर्यमालेतील सर्व ग्रह घडाळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरतात.

    बदला
  • Tags:

    🔥 Trending searches on Wiki मराठी:

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसअभिव्यक्तीनांदेड लोकसभा मतदारसंघभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हवंचित बहुजन आघाडीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीगर्भाशयपोलीस पाटीलसमासपरभणी लोकसभा मतदारसंघचार धामसिंधुताई सपकाळशुभेच्छानिलेश लंकेघुबडपृथ्वीसातारा लोकसभा मतदारसंघपथनाट्यययाति (कादंबरी)बंगालची फाळणी (१९०५)चोखामेळामहात्मा गांधीममता कुलकर्णीमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागमहाराष्ट्र शासनमिठाचा सत्याग्रहदुसरे महायुद्धकुंभ रासदिंडोरी लोकसभा मतदारसंघकर्करोगमोबाईल फोनमराठी भाषेमधील वृत्तपत्रेअश्वगंधाअलिप्ततावादी चळवळहृदयऋतुराज गायकवाडभारतीय आडनावेकुटुंबनियोजनओवास्त्रीवादी साहित्यमराठा घराणी व राज्येवस्तू व सेवा कर (भारत)ब्रिक्सजिल्हाधिकारीबाराखडीटोपणनावानुसार मराठी लेखकराजकारणआणीबाणी (भारत)शिव जयंतीसोलापूर जिल्हाकाळूबाईविमाशांता शेळकेविठ्ठल रामजी शिंदेविजयसिंह मोहिते-पाटीललोकसभाराखीव मतदारसंघगांडूळ खतघोरपड२०१४ लोकसभा निवडणुकाऊसपानिपतची तिसरी लढाईअभंगबडनेरा विधानसभा मतदारसंघनाथ संप्रदायअष्टांगिक मार्गअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघभारतीय रेल्वेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९संगीत नाटकनाशिकअजिंठा लेणीभगतसिंगजिंतूर विधानसभा मतदारसंघउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ🡆 More