भीमा नदी

भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी असून या नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे झाला आहे.

या नदीची एकूण लांबी ८६० किमी आहे, एकूण लांबीपैकी महाराष्ट्रात ४५१ किमी क्षेत्र आहे. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ही नदी महाराष्ट्र राज्याच्या बाहेर कर्नाटकमध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ही नदी आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.

भीमा नदी
भीमा
उगम भीमाशंकर
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र, कर्नाटक
लांबी ८६० किमी (५३० मैल)
उगम स्थान उंची १,१०० मी (३,६०० फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४८,६३१
ह्या नदीस मिळते कृष्णा
उपनद्या कुंडली घोड, नीरा, सीना, इंद्रायणी, मुळा, वेळ मुठा
धरणे उजनी धरण

भीमा नदीची नीरा नदी ही उपनदी सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर-नीरा या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम पुणे जिल्ह्यातील वाळकी(रांजणगाव बेट) येथे होतो.

भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ ४६,००० चौरस कि.मी.आहे. महाराष्ट्राच्या पावसाळ्यात भीमेला अनेकदा पूर येतो. भीमा नदीवर एकूण बावीस लहान-मोठी धरणे आहेत.

चंद्रभागा

चंद्रभागा नदी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून वाहणारी नदी आहे. ही भीमा नदीच आहे. भीमा पंढरपुराजवळून वाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात. ही चंद्रभागा, अमरावती जिल्ह्यातली चंद्रभागा, हिमाचल प्रदेशातील चंद्रभागा आणि ओरिसातील चंद्रभागा या वेगळ्या नद्या आहेत. पंढरपूरमधून चंद्रभागा नदी पुढे सुस्ते, पळूज, बठाण गावाजवळून सोलापूर जिल्ह्यात जाते. सुस्ते गावातील शेतकरी शेती करता चंद्रभागेच्या पाण्याचा वापर करतात. सुस्ते गावातील देवी अंबाबाईचे मंदिर चंद्रभागेच्या तटावर आहे.

भीमा नदीच्या उपनद्या

उजव्या तीरावर मिळणाऱ्या नद्या

डाव्या तीरावर मिळणाऱ्या नद्या

भीमा नदीकाठची मंदिरे

  • सोरबाबा मंदिर तरटगांव भोसे ,
  • सिद्धटेक येथील अष्टविनायकांपैकी एक असलेले गणपतीचे मंदिर
  • सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर
  • कर्नाटकातल्या गाणगापूरचे दत्त मंदिर. हे गुलबर्गा जिल्ह्यात आहे.
  • श्री क्षेत्र घटर्गी भागम्मा, घटर्गी, गुलबर्गा जिल्हा, कर्नाटक
  • श्री क्षेत्र रासंगी बलभीमसेना मंदिर, जिवरगी तालुका, गुलबर्गा जिल्हा, कर्नाटक
  • श्री क्षेत्र हेरूर, (हुलकांतेश्वर मंदिर)
  • श्री क्षेत्र माचनूर सिद्धेश्वर मंदिर आहे हे मंदिर जुन्या काळातील आहे.
  • श्री क्षेत्र सन्नती येथे श्री चंद्रलापरमेश्वरी देवी मंदिर हे अती प्राचीन मंदिर भीमा नदीच्या तीरावर आहे. गुलबर्गा जिल्हा.
  • पेशावकालीन सोमेश्वर मंदिर चास कमान.

भीमा नदीकाठची गावे

तरटगांव (भोसे),दौंड, कोरेगांव भीमा , निमगाव-दावडी,शेलपिंपळगाव , कोंढार चिंचोली , पंढरपूर, राजगुरुनगर, अरळी, खरपुडी खुर्द , चास कमान

सांस्कृतिक आणि साहित्यातले उल्लेख

हेसुद्धा पहा

Tags:

भीमा नदी चंद्रभागाभीमा नदी च्या उपनद्याभीमा नदी काठची मंदिरेभीमा नदी काठची गावेभीमा नदी सांस्कृतिक आणि साहित्यातले उल्लेखभीमा नदी हेसुद्धा पहाभीमा नदीकर्नाटककृष्णा नदीभारतरायचूर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

इंदुरीकर महाराजतूळ राससंभाजी भोसलेसिंधुदुर्गरघुनाथराव पेशवेमहाराष्ट्रातील पर्यटनपरशुरामनिबंधएच.डी.एफ.सी. बँकधर्मशाळा (हिमाचल प्रदेश)ऋग्वेदमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)अभंगपृथ्वीएकादशीभाषालिंगायत धर्मथोरले बाजीराव पेशवेमहाराष्ट्र विधान परिषदज्वारीव्हॉट्सॲपकुत्रासंत तुकारामदिव्य मराठीशेळी पालनमहाराष्ट्रामधील जिल्हेपालघर लोकसभा मतदारसंघमनालीकांजिण्याशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)नैऋत्य मोसमी वारेगजानन दिगंबर माडगूळकरवसंतराव नाईकनवनीत राणालोकसभेचा अध्यक्षग्रामपंचायतजगातील देशांच्या राजधान्यांची यादीभीमसेन जोशीमहानुभाव पंथमराठा साम्राज्यरक्तपित्ताशयबुद्ध पौर्णिमामण्यारउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघकेरळकेशव महाराजमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्र गीतकिशोरवयजागतिक लोकसंख्यामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीवाचनसमर्थ रामदास स्वामीसमाज माध्यमेपारू (मालिका)सचिन तेंडुलकरसूर्यनमस्कारजास्वंदजम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश)माळशिरस विधानसभा मतदारसंघजागतिक तापमानवाढसुजात आंबेडकरगोदावरी नदीराजकीय पक्षयशवंतराव चव्हाणमराठामहाराष्ट्रातील किल्लेभारतातील राजकीय पक्षकेळज्योतिर्लिंगकोल्हापूर जिल्हाप्रियंका गांधीबीड विधानसभा मतदारसंघजय श्री रामभारतातील मूलभूत हक्कमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादी🡆 More