बोरिस येल्त्सिन

बोरिस निकोलायेविच येल्त्सिन फेब्रुवारी १ १९३१ एप्रिल २३ २००७ हे सोवियेत संघाच्या विघटनानंतर वेगळा देश झालेल्या रशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते.

१९३१">१९३१ एप्रिल २३ २००७ हे सोवियेत संघाच्या विघटनानंतर वेगळा देश झालेल्या रशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा दोन वेळचा राष्टाध्यक्ष पदाचा कार्यकाळ १० जुलै १९९१ ते ३१ डिसेंबर १९९९ असा होता.

बोरिस येल्त्सिन
बोरिस येल्त्सिन

१९३४ साली बोरिस केवळ तीन वर्षांचे असतांना त्यांचे वडील निकोलायेविच येल्त्सिन यांना सोवियेत संघाच्या विरुद्ध निदर्शने करण्याच्या गुन्ह्यासाठी तीन वर्षे कालावधीची शिक्षा झाली. आई क्लावदिया येल्त्सिनाने शिवणकाम करून आपले घर सांभाळले. बोरिसला लहानपणापासून शिक्षणासह विविध खेळांमध्ये आवड होती, वॉलीबॉल, बॉक्सींग आणि कुस्ती हे खेळ त्यांना जास्त आवडत, स्किइंग आणि जिम्नॅस्टीक्स मध्येही ते आवडीने भाग घेत.

१९५५ साली उरलच्या विश्वविद्यालयातून बोरिस येल्त्सिन यांनी बांधकाम क्षेत्रातील आपली पदवी संपादन केल्यावर एका कंपनीत काही काळ फोरमॅन म्हणून काम केले. या कंपनीतच त्यांना बढती मिळत गेली आणि ते १९६३ मध्ये ते मुख्य इंजिनियरच्या पदावर काम करू लागले. दरम्यान १९६१ पासून ते सोवियेत समाजवादी पक्षाचे कार्यकर्ता म्हणून कामे करू लागले. १९७५ साली त्यांना पार्टीच्या स्वर्दलोवस्क ओब्लास्ट विभागाचे अध्यक्ष पद बहाल करण्यात आले तर १९७६ साली त्यांना पार्टीच्या पॉलिटब्युरोचे सदस्य बनविण्यात आले. हळूहळू येल्त्सिन यांच्या सोवियेत सत्तेत ओळखी वाढू लागल्या, पार्टीतील महत्त्वाची पदे त्यांना मिळू लागली. १९८५ ते १९८७ या काळात येल्त्सिन मॉस्को शहराचे महापौर होते.

Tags:

इ.स. १९३१इ.स. २००७एप्रिल २३फेब्रुवारी १रशियासोवियेत संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बिबट्यापक्षीभाषालंकारबौद्ध धर्मकरधनु रासकाळूबाईकर्ण (महाभारत)बातमीएक होता कार्व्हरअर्थसंकल्पमहाराष्ट्रातील आरक्षणउद्धव ठाकरेरायगड जिल्हापवनदीप राजननितंबजंगली महाराजखो-खोमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीदलित एकांकिकापुन्हा कर्तव्य आहेअंजनेरीॲडॉल्फ हिटलरदूरदर्शनपरभणी लोकसभा मतदारसंघमहात्मा फुलेकावीळविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीगंगा नदीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)इतिहासयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघपन्हाळाविनयभंगदत्तात्रेयचीनमहिला अत्याचारपौर्णिमामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळभारतीय आडनावेभारताची अर्थव्यवस्थामहाराष्ट्र शासनजळगाव लोकसभा मतदारसंघत्र्यंबकेश्वरजहाल मतवादी चळवळमहाराष्ट्रराजगृहजागतिक व्यापार संघटनामूळ संख्यामहाराष्ट्रामधील जिल्हेपारनेर विधानसभा मतदारसंघपंकजा मुंडेप्रज्ञा विवर्धन स्तोत्रखासदारदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघतापमानझाडशाळाभारत छोडो आंदोलनतुकडोजी महाराजखडकवासला विधानसभा मतदारसंघसातारा विधानसभा मतदारसंघचिरंजीवीमराठासूर्यमिठाचा सत्याग्रहकासवग्राहक संरक्षण कायदाभारताचे पंतप्रधानकिशोरवयशाहू महाराजमांजरहवामान बदलजालियनवाला बाग हत्याकांडकुटुंबनियोजनसातवाहन साम्राज्यरमाबाई आंबेडकर🡆 More