सोमनाथ शर्मा: परमवीर चक्राचे पाहिले मानकरी

मेजर सोमनाथ शर्मा (१९२३-१९४७) हे परमवीर चक्राचे पहिले मानकरी आहेत.

सोमनाथ शर्माच्या काश्मीर मधील उत्तम कामगिरीमुळे त्यांना ह्या पदकाने गौरविण्यात आले . त्यांना पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना श्रीनगर विमानतळावर वीर मरण आले ही घटना १९४७-४८ मधील भारत पाक युद्धाच्या वेळेस काश्मीर मध्ये घडली .ते चौथ्या कुमाऊन रेजिमेंट मध्ये.

सोमनाथ शर्मा: परमवीर चक्राचे  पाहिले मानकरी
सोमनाथ शर्मा


वैयक्तिक आयुष्य

सोमनाथ शर्मांचा जन्म ३१ जानेवारी १९२३ साली एका ब्राम्हण परिवारात भारतातील हिमाचल प्रदेशातील दाढ येथे झाला .त्यांचे वडील मेजर जनरल अमर नाथ शर्मा सैन्यातील वरच्या स्थरा वरचे अधिकारी होते. त्यांचे बंधू जनरल सुरेंद्र नाथ शर्मा, जनरल विश्व नाथ शर्मा आणि बहिण मेजर कमला तिवारी हे होते .त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण नैनिताल येथील शेरवूड महाविद्यालयात केले , नंतर त्यांनी रॉयल मिलिटरी अकादमी मध्ये प्रवेश घेतला .

बदगामची लढाई

३१ ऑक्टोबर, इ.स. १९४७ रोजी सोमनाथ शर्माची रवानगी श्रीनगरला झाली .त्यांच्या उजव्या हाताला हॉकी खेळताना दुखापत झाली असून सुद्धा ते युद्धासाठी श्रीनगरला गेले. ३ नोव्हेंबर १९४७ रोजी सोम नाथ शर्मांच्या तुकडीला काश्मीर खोऱ्यातील बदगाम येथे लढण्याचे आदेश देण्यात आले. तेथे त्यांच्या तुकडीस पाकिस्तानी सैन्याने वेढा घातला. शर्मांला कळून चुकले की पाकिस्तानी येथून पुढे सरकले तर श्रीनगरचा विमानतळ धोक्यात येईल.

शत्रूचा कडवा प्रतिकार करीत असताना एक तोफगोळा जवळच फुटल्याने शर्मांस वीर मरण आले. त्यांची शेवटची वाक्ये "शत्रू ५० यार्डात आलेला आहे. आमच्यापेक्षा अनेकपटीने संख्येत असून आम्ही भयानक गोळीबारास सामोरे जात आहोत. मी येथून एक इंचही मागे सरकणार नाही आणि अगदी शेवटचा जवान आणि शेवटची गोळी असेपर्यंत येथे आम्ही लढू." या दरम्यान १ बटालियन कुमाउँ रेजिमेंट बदगामला पोहोचली व त्यांनी शत्रूचा हल्ला परतवून लावला.

व या कार्यासाठी त्यांना परमवीर चक्र हा पुरस्कार देण्यात आला

संदर्भ

Tags:

परमवीर चक्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

घोरपडअमरावती विधानसभा मतदारसंघदूरदर्शन२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लामृत्युंजय (कादंबरी)भारतरत्‍नस्वच्छ भारत अभियानउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघबहावाताराबाईमहाराष्ट्र पोलीससुशीलकुमार शिंदेजागतिक लोकसंख्याऔंढा नागनाथ मंदिरधनगरअजिंठा-वेरुळची लेणीमानवी हक्कमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)रामजागरण गोंधळचंद्रपूर लोकसभा मतदारसंघपश्चिम दिशाभारताच्या राष्ट्रपतींची यादीप्रदूषणगांडूळ खतसमीक्षाएकविरासुषमा अंधारेमोबाईल फोनदहशतवादस्त्रीशिक्षणमुख्यमंत्रीए.पी.जे. अब्दुल कलामडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेभारतीय स्टेट बँकशिवाजी महाराजगुकेश डीज्ञानेश्वरक्षय रोगवर्धा लोकसभा मतदारसंघछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमहाराष्ट्रातील लोककलाव्हॉट्सॲपमराठी व्याकरणखंडोबारेणुकाअश्विनी एकबोटेजागतिक दिवसऊसनागपूरमराठी संतकेंद्रशासित प्रदेशक्रिकेटचे नियमपहिले महायुद्धमहाराष्ट्रातील राजकारणलोकसभाकीर्तनशहाजीराजे भोसलेस्त्रीवादी साहित्यगर्भाशयवल्लभभाई पटेलपाणीभारतीय प्रशासकीय सेवासायबर गुन्हावृषभ रासजेजुरीकोल्हापूर लोकसभा मतदारसंघकाळूबाईसांगलीममता कुलकर्णीगुरू ग्रहकोकणनाटकमहाराष्ट्र भूषण पुरस्कारउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघचंद्रगुप्त मौर्यशिर्डी लोकसभा मतदारसंघ🡆 More