सुलोचना लाटकर

हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना (लाटकर).

त्यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. सन १९४३ला त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री/ घरंदाज आई म्हणून काम केले. भालजी पेंढारकरांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्या चित्रपटात आल्या तेव्हा त्यांची भाषा शुद्ध नव्हती. त्यांच्या बोलण्याची थट्टा व्हायची. भालजी पेंढारकर यांनी त्यांची भाषा सुधारावी म्हणून एक संस्कृत मासिक त्यांच्याकरता लावले. ते वाचणे हे चांगलेच क्लिष्ट काम होते. पण त्याबद्दल तक्रारीचा चकार शब्द न काढता सुलोचनाबाई चिकाटीने त्या भाषादिव्यातून गेल्या. त्यांची थट्टा व नक्कल करणारे महाभाग ‘पारिजातक’च्या चित्रीकरणाच्या वेळी सुलोचनाबाई संस्कृतप्रचुर संवाद अस्खलितपणे बोलताना पाहून थक्क झाले.

सुलोचना लाटकर
सुलोचना लाटकर
सुलोचना लाटकर
सन २०१० मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराचे वेळी सुलोचना लाटकर
जन्म ३० जुलै १९२८
मृत्यू ४ जून, २०२३ (वय ९४)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
पुरस्कार 'चित्रभूषण' व 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित
टिपा
हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री

भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचनाबाईंची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. सोज्वळ, शांत आणि घरंदाज भूमिका त्यांनी पडद्यावर जिवंत केल्या. शेकडो मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अशा भूमिका केल्या. शिवाय यांनी अन्य भूमिकाही केल्या आहेत.

१९४३ला हिंदी चित्रपट सृष्टीत सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर यांच्या बरोबर अभिनयाची सुरुवात करून पुढे राजकपूर, शम्मीकपूर, शशीकपूर या कपूर घराण्याच्या दुसऱ्या पिढीबरोबर आणि नंतर, कपूर घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या रणधीर कपूर, ऋषी कपूर, गीता बाली, बबिता, नीतू सिंग यांच्या बरोबरही त्यांनी हिंदी चित्रपटातील काळ गाजवला. २५०हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.

निवडक चित्रपट

वर्ष मथळा अभिनय भाषा
१९५७ अब दिल्ली दूर नही बेला हिंदी
१९६८ आदमी (१९६८) शेखरची आई हिंदी
१९७० कटी पतंग दिनानाथ यांची पत्नी हिंदी
१९८६ काला धंदा गोरे लोग हिंदी
१९७० जॉनी मेरा नाम सोहन व मोहनची आई हिंदी
१९५९ दिल देके देखो जमुना हिंदी
१९६६ देवर शकुंतला एम सिंग हिंदी
१९६३ बंदिनी हिंदी
१९६४ मराठा तितुका मेळवावा जीजाबाई मराठी
१९७० मैं सुंदर हुं सुंदरची आई हिंदी
१९६८ संघर्ष शंकरची पत्नी हिंदी
१९६१ संपूर्ण रामायण कैकेयी हिंदी
१९६८ सरस्वतीचंद्र (चित्रपट) कुमुदची आई हिंदी
१९५९ सांगत्ये ऐका सखारामची पत्नी मराठी
१९६५ साधी माणसे मराठी

अन्य चित्रपट

  • एकटी
  • गुलामी (हिंदी)
  • धाकटी जाऊ
  • पायदळी पडलेली फुले
  • पारिजातक
  • माझं घर, माझी माणसं
  • मीठभाकर
  • मुक्ती (हिंदी)
  • मोलकरीण
  • वहिनींच्या बांगड्या
  • सुजाता (हिंदी)

उल्लेखनीय

महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा २००९चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च पुरस्कार अभिनेत्री सुलोचना यांना दिला गेला.


संदर्भ

Tags:

सुलोचना लाटकर निवडक चित्रपटसुलोचना लाटकर अन्य चित्रपटसुलोचना लाटकर उल्लेखनीयसुलोचना लाटकर संदर्भसुलोचना लाटकरभालजी पेंढारकर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संगणकाचा इतिहासबोधिसत्वमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीरस (सौंदर्यशास्त्र)बाळासाहेब विखे पाटीलशिर्डी लोकसभा मतदारसंघराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)खुला प्रवर्गझी मराठीमेष रासछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरवंदगोवरमहाराष्ट्र गीतधनादेशवाघबहिणाबाई चौधरीकुळीथसांगली लोकसभा मतदारसंघबैलगाडा शर्यतमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील धरणांची यादीव्हॉट्सॲपसाखरपुडाम्युच्युअल फंडकृष्णदहशतवादऋतूअन्नप्राशनसंवादिनीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीईशान्य दिशाहोमरुल चळवळजागतिक पर्यावरण दिनधवल क्रांतीज्ञानेश्वरीबाराखडीपाठ्यपुस्तकेययाति (कादंबरी)व्यंजनकायदारामटेक लोकसभा मतदारसंघमानवी शरीरबडनेरा विधानसभा मतदारसंघजगदीश खेबुडकरजी.ए. कुलकर्णीमहाराष्ट्रसविता आंबेडकरबाबासाहेब आंबेडकरस्वच्छ भारत अभियानकन्या रासमहिलांसाठीचे कायदेविंचूपरभणी विधानसभा मतदारसंघअभंगसंशोधनटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीपृथ्वीआईअश्वत्थामादीपक सखाराम कुलकर्णीविष्णुसज्जनगडधनगरनियोजनसोळा सोमवार व्रतराजरत्न आंबेडकरजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)संदिपान भुमरेगजानन दिगंबर माडगूळकरसातारा लोकसभा मतदारसंघप्राथमिक आरोग्य केंद्रखो-खोसुषमा अंधारेअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)जय श्री रामसातारा🡆 More