सर्दी

सामान्य सर्दी, ज्याला फक्त सर्दी म्हणून ओळखले जाते, तो वरच्या श्वसनमार्गाचा एक विषाणूजन्य संसर्गजन्य रोग आहे.

हा प्रामुख्याने नाकांवर परिणाम करतो. नाकातून पाणी वहाणे यास सर्दी म्हणतात. तिची अनेक कारणे असू शकतात. त्यांपैकी इन्फेक्शन आणि ॲलर्जी अशी दोन प्रमुख आहेत. सर्दीमुळे घसा, सायनस आणि स्वरयंत्रावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. विषाणूच्या संपर्काने आल्यानंतर दोन दिवसात सर्दीची चिन्हे आणि लक्षणे दिसू लागतात. यात खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे, शिंका येणे, डोकेदुखी आणि ताप यांचा समावेश असू शकतो. लोक सर्दीतून बहुधा सात ते दहा दिवसांत बरे होतात परंतु काही लक्षणे तीन आठवड्यांपर्यंत टिकू शकतात. कधीकधी त्या इतर लक्षणांमुळे न्यूमोनिया होऊ शकतो.

सर्दी
इतर नावे सर्दी, पडसे, तीव्र व्हायरल नासोफरीन्जायटिस, नासोफरीन्जायटिस, व्हायरल नासिका, नासिकाशोथ, तीव्र कोरायझा
सर्दीचा विषाणू
मानवी सर्दीच्या विषाणूच्या आण्विक पृष्ठभागाची प्रातिनिधिक आकृती
लक्षणे खोकला, घसा खवखवणे, वाहणारे नाक, ताप
गुंतागुंत ओटिटिस मीडिया, सायनुसायटिस
सामान्य प्रारंभ ~२ दिवसांच्या संगतीमुळे
कालावधी १-३ आठवडे
कारणे विषाणू (व्हायरल)
विभेदक निदान असोशी नासिकाशोथ, ब्राँकायटिस, पेर्ट्यूसिस, सायनुसायटिस
प्रतिबंध हात धुणे, चेहऱ्यावर मुखवटा घालणे
उपचार रोगसूचक उपचार, झिंक
औषधोपचार एनएसएआयडी
वारंवारता दर वर्षी २-४ वेळा(प्रौढ); दर वर्षी ६-८ वेळा(लहान मुले)

जवळपास २००पेक्षा जास्त विषाणूंचे उपप्रकार सामान्य सर्दी होण्यास कारणीभूत असतात, त्यातील रायनोवायरस सामान्यत: आढळतो. हा विषाणू संक्रमित लोकांच्या जवळ गेल्यास हवेतून पसरतो किंवा अप्रत्यक्षपणे वातावरणातील वस्तूंशी संपर्क साधून, त्यानंतर तोंड किंवा नाकावाटे पसरतो. सामान्यत: जोखीच्या जागा उदा० लहान मुलांची रुग्णालये, गर्दीची ठिकाणी गेल्यानेही सर्दी होऊ शकते, तसेच चांगली झोप न आल्याने किंवा मानसिक तणावामुळेही सर्दी होऊ शकते. सर्दीचे परिणाम हे मुख्यत्वे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे तयार होतात, विषाणूंनी पेशी नष्ट केल्यामुळे नाही. याउलट, इन्फ्लूएन्झामुळे झालेली सर्दी साध्या सर्दी सारखेच लक्षण दर्शविते, परंतु ती लक्षणे बहुधा जास्त तीव्र असतात. याव्यतिरिक्त, वाहत्या नाकामुळे इन्फ्लुएन्झा असण्याची शक्यता कमी होते.

सामान्य सर्दीसाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. सर्दी न होऊ देण्यासाठीचे उपाय म्हणजे हात धुणे, हात न धुता डोळे, नाक किंवा तोंड स्पर्श न करणे आणि आजारी लोकांपासून दूर रहाणे हे आहेत. काही पुराव्यांनुसार फेस मास्क वापरून सर्दीपासून दूर रहाता येते. सर्दीच्या झाल्यावर उपचार नाही, परंतु लक्षणांवर उपचार केले जाऊ शकतात. लक्षणांची सुरुवात झाल्यानंतर लगेचच जस्त (झिंक)चा वापर केल्यास लक्षणांचा कालावधी आणि तीव्रता कमी करू शकतो. इबूप्रोफेन सारख्या नॉनस्टेरॉइडल एंटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (एनएसएआयडी) वेदना कमी करण्यास मदत करू शकतात. सर्दीसाठी प्रतिजैविकांचा (ॲंटीबायोटिक्स) वापर करू नये. आणि खोकल्याच्या औषधांचा फायदा झाल्याचा पुरावा उपल्ब्ध नाही.

सामान्य सर्दी हा मानवांमध्ये सर्वात वारंवार होणारा संसर्गजन्य रोग आहे. सरासरी प्रौढ व्यक्तीला वर्षाला दोन ते तीन वेळेस सर्दी होते, तर लहान मुलांस सहा ते आठ वेळ होण्याची शक्यता असते. हिवाळ्यामध्ये या रोगाचे लागण अधिक प्रमाणात होते. सर्दी हा रोग मानवी इतिहासात पुरातन काळापासून आढळतो.

संदर्भ

Tags:

न्यूमोनिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वासुदेव बळवंत फडकेकुपोषणपोहरादेवीकुणबीउदयनराजे भोसलेसर्पगंधाबारामती लोकसभा मतदारसंघदिल्ली कॅपिटल्सजीवनसत्त्वसंवादरणजित नाईक-निंबाळकरहनुमान चालीसावाल्मिकी ऋषीमुघल साम्राज्यदिशामानवी भूगोलअश्वगंधाएकांकिकामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाज्योतिर्लिंगविकिपीडियातुळजाभवानी मंदिरलोकमान्य टिळकनक्षलवादमुलाखतनंदुरबार लोकसभा मतदारसंघअभंगमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीप्रकाश आंबेडकरअमरावती जिल्हाविराट कोहलीरामसेतूहस्तमैथुनमहाराष्ट्र भूषण पुरस्कारगोलमेज परिषदवसंतराव दादा पाटीलअतिसारनागपूरमहाराष्ट्र नवनिर्माण सेनातणावमराठी भाषेमधील वृत्तपत्रेअयोध्यासाहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (मराठी)शहाजीराजे भोसलेआनंदराज आंबेडकरअकोला जिल्हाकबूतरगोकर्णीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाराखडीभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मफकिरागालफुगीआणीबाणी (भारत)शबरीसंयुक्त राष्ट्रेभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीविमाबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरजनमत चाचणीसरपंचनामदेवभारताची अर्थव्यवस्थामूलद्रव्यपुन्हा कर्तव्य आहेमुखपृष्ठशिवनेरीन्यूझ१८ लोकमतविहीरपुष्यमित्र शुंगइतिहासाच्या अभ्यासाची साधनेविठ्ठल मंदिर (पंढरपूर)राष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)भारतातील सण व उत्सवपिंपळस्वामी विवेकानंदस्वस्तिकबिबट्या🡆 More