लेण्याद्री गिरिजात्मज

लेण्याद्री बुद्ध लेणी ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगानी वेढलेले आहे.लेण्याद्री स्थान अष्टविनायक पैकि एक असलेल्या गिरिजात्मज लेण्याद्री गणपती साठी प्रसिद्ध आहे.

लेण्याद्री गिरिजात्मज

परिचय

त्यातील ८व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासारठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे. हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे. जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना ‘गणेश लेणी’ असे म्हणतात., हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदी वाहते. या ठिकाणाचा उल्लेख 'जीर्णापूर' व 'लेखन पर्वत' असा झाल्याचे आढळते. पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले and Punjabi.व याच रांगांच्या अतिशय परीपक्व व मजबुत बेसाल्ट खडकात अनेक बौद्ध कोरीव शैलगृह कोरलेली आढळतात. .

महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्राचीन बुद्ध लेणींना त्याकाळी अतिशय समर्पक अशी नावे देण्यात आली होती. ही नावे डोंगरांची किंवा शहराची, या लेणींच्या वैशिष्ट्याची किंवा या लेणींत राहत असलेल्या बौद्ध भिक्खुंच्या संघाची होती. जसे कि कण्हगिरी बुद्ध लेणी म्हणजे आत्ताची कान्हेरी बुद्ध लेणी (कान्हेरी डोंगर), तिरणहू म्हणजे त्रिरश्मी बुद्ध लेणी (त्रिरश्मी डोंगर)किंवा जखीणवाडी बुद्ध लेणी (जखीणवाडी हे कराड तालुक्यातील गावाचे नाव आहे). नंतरच्या काळात म्हणजे १७व्या शतकानंतर महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले व काही लेणींचे रूपांतर मंदिरात झाले तर काही अतिक्रमणाच्या प्रचंड विळख्यात अडकले आहेत आणि त्यांना तशी "नवीन नावे" देण्यात आली आहेत.

जुन्नरमधे भारतातील सर्वात मोठा बुद्ध लेणीं समूह असून तिथे झालेले कोरीव कामाची संख्या ३२५ आहे! यात चैत्यगृह, विहार, पोढी व लेणी आहेत. यातील प्रमुख बुद्ध लेणीं समूह म्हणजे "लेण्याद्री बुद्ध लेणीं". येथीलविहारात मध्यभागी प्रशस्त मंडप असुन तीन बाजुला वेगवेगळ्या आकाराचे २० निवासकक्ष आहेत. या विहारात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्यांचा जीना आहे. जिन्याच्या शेवटी स्तंभ असलेल्या व्हरांड्यातील मधल्या दारातून विहार प्रवेश करता येतो. मध्ययुगातील १७व्या शतकातमागील भिंतीतील दोन निवासकक्ष एकत्र करून भिंतीत कोरलेल्या गणपतीचा आकार देण्यात आला तिथे “गिरिजात्मज” गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. हा गणपती अष्टविनायकांपैकी एक असुन “गिरीजात्मज “नावाने प्रसिद्ध आहे . (हे पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी व अभ्यासकांनी लिहून ठेवले आहे व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण देखील हे मान्य करते) व या लेणींचे नामांतर "लेण्याद्री" करण्यात आले. मात्र प्राचीन काळी जेव्हा येथे बुद्ध लेणीं कोरण्यात आली तेव्हा याचे काय नाव होते?

तिथेगुंफा क्र.१४ ही एक चैत्यगृह आहे. पण त्याचा मंडप आयताकार असुन छत सपाट आहे. चैतगृहाला व्हरांडा असून व्हरांड्यात एक शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख ‘कपिलाचा नातू व तपसाचा पुत्र असलेल्या आनंद’ या भक्ताने चैत्यगृसाठी दिलेल्या दानाविषयीचा आहे. या गुंफांचा काळ साधारण इ.स २ रे शतक आहे.

या लेणींचे मूळ नाव "कपिचित बुद्ध लेणीं" असे होते. त्याचे मूळ कारण म्हणजे या लेणींवर असलेल्या वानरांचा वावर होय! पाली भाषेत कपि म्हणजे वानर किंवा माकड. चित किंवा चिता म्हणजे एकत्रित राहणारे किंवा आवडणारे असा देखील होतो. म्हणजेच "जेथे वानर एकत्रित राहतात" किंवा "वानरांना आवडणारी जागा" म्हणजे कपिचित! आजही या डोंगरावर माकडांचा जथा राहत असतो. प्राचीन काळापासून येथे वानरांचा वावर असावा म्हणूनच त्याकाळी इथे लेणीं कोरणाऱ्यांनी किंवा येथे राहत असलेल्या भिक्खू संघाने या लेणीं समूहाला "कपिचित बुद्ध लेणीं" असे संबोधले होते. येथील शिलालेखात असा स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. शिलालेखात ‘कपिचित’ म्हणजेच माकडांचे आवडते ठिकाण या ठिकाणी ४० शैलगृह असून मुख्य ३० शैलगृह पूर्व-पश्चिम रांगेत दक्षिणेकडील जुन्नर शहराकडे तोंड करून आहेत. या 30 शैलगृहांपैकी गुंफा क्र. ६ व १४ हे चैत्यगृह म्हणजेच प्रार्थनास्थळ असून बाकीचे विहार म्हणजे भिक्षुकांची निवासस्थाने आहेत.या पैकी गुंफा क्र.७ हा सर्वात मोठा( प्रशस्त )विहार आहे. बाकिच्या इतर गुंफा(लेणी) विहार लहान असुन काही दोन ते तीन भागात विभागलेल्या दिसतात. या सर्वांचा कालखंड पहिले शतक ते तीसरे शतक असाच गणला गेला आहे. गुफा क्र. ६ हे या गटातील प्रमुख चैत्यगृह आहे. दर्शनी भागात स्तंभ असलेला व्हरंडा असून चापाकृती विधानातील प्रार्थनामंडप स्तंभाच्या दोन ओळींनी तीन भागात विभागलेला आहे. छत गजपृष्ठाकार आहे. गौतम बुद्धाचे प्रतीक असलेला स्तूप मंडपाच्या शेवटच्या भागात आहे. इ.सन २ र्या शतकातील एक शिलालेख व्हरांड्यातील आतल्या भिंतीवर द्वारकमानिवर कोरलेला आहे. या शिलालेखात ‘सुलसदत्त, ह्या कल्याण येथील सोनाराच्या मुलाने दिलेल्या दानाचा उल्लेख केला आहे. गुंफा क्र. ७ ही जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी गुंफा(विहार) आहे.

स्वरूप

लेण्याद्री गिरिजात्मज 
गिरीजात्मज गणपती (लेण्याद्री)
लेण्याद्री गिरिजात्मज 
कपिचित बुद्ध लेणी(लेण्याद्री)गुहा

पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये सभामंडप. बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे. सहाव्या लेण्यातील चैत्य विहार अजिंठा-वेरूळची लेणी येथील नवव्या लेण्याशी मिळताजुळता आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब इ.स. पूर्व ९० ते इ.स. ३०० या सातकर्णी कालखंडातील असल्याची नोंद आहे. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखड्यावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूडसदृश कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट सभामंडप हे साडेचार फूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे.

सातवे लेणे थोडे उंचावर असून, जुन्नर लेण्यातील सर्वांत प्रशस्त लेणे आहे. मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर या कुठल्याच गोष्टी नाहीत. खांबविरहित ५७ फूट लांब व ५२ फूट रुंद गुहा हेच बौद्ध सभामंडप आहे. या ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार.

पूर्व व पश्चिम बाजूंस २८ लेणी आहेत. एकाच मोठया आकाराच्या शिळेत ही लेणी कोरली आहेत. लेण्याद्री हे देवस्थान सात क्रमांकाच्या गुहेत असून बौद्ध भिक्खू साठीचे सभामंडप ५१ फूट रुंद व ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. बौद्ध भिक्खू साठी पाण्याच्या चार टाक्या असून त्यांना वर्षभर पाणी असते. पुणे येथील शिवाजीनगर एस.टी.बसस्थानकातून कपिचित बुद्ध लेणी येथे जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे.

चित्रदालन

संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे

  • "गिरिजात्मज गणेश स्थापना". Archived from the original on 2014-09-20. 2014-03-03 रोजी पाहिले.
अष्टविनायक लेण्याद्री गिरिजात्मज 
मोरेश्वरसिद्धिविनायकबल्लाळेश्वरवरदविनायकगिरिजात्मजचिंतामणीविघ्नहरमहागणपती

Tags:

लेण्याद्री गिरिजात्मज परिचयलेण्याद्री गिरिजात्मज स्वरूपलेण्याद्री गिरिजात्मज चित्रदालनलेण्याद्री गिरिजात्मज संदर्भ आणि नोंदीलेण्याद्री गिरिजात्मज बाह्यदुवेलेण्याद्री गिरिजात्मजअष्टविनायकजुन्नरपुणेसह्याद्री

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पंजाबराव देशमुखययाति (कादंबरी)अशोकस्तंभहनुमान चालीसासंगणकाचा इतिहासखो-खोजहांगीरपळसअहवाल लेखनयशवंत आंबेडकरधर्मो रक्षति रक्षितःराज्यपालमुहूर्तनाथ संप्रदायराज्यसभाभारूडमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारतरत्‍नविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीसमाज माध्यमेसुशीलकुमार शिंदेसंशोधनहोमी भाभाधुळे लोकसभा मतदारसंघऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघपुरंदर किल्लाबडनेरा विधानसभा मतदारसंघनगर परिषदकृत्रिम पाऊसमहेंद्र सिंह धोनीभारतीय तत्त्वज्ञानमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळएकविराबुद्धिबळताराबाई शिंदेनर्मदा नदीगुढीपाडवाअर्जुन पुरस्काररोहित शर्मासंगीतातील रागपु.ल. देशपांडेभारतीय रेल्वेउष्माघातभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीहोमरुल चळवळमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीरायगड जिल्हाभारतीय संविधानाची उद्देशिकामानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रविनोबा भावेयोगशनिवार वाडाजायकवाडी धरणकोळसाभारतातील शेती पद्धतीकृष्णसोळा सोमवार व्रतहडप्पा संस्कृतीवेदकुटुंबकबूतरअजिंठा-वेरुळची लेणीशिर्डी विधानसभा मतदारसंघहिंदू धर्मातील अंतिम विधीक्षय रोगचिकुनगुनियाकार्ल मार्क्सनागपूर लोकसभा मतदारसंघनेतृत्वऋग्वेदसावित्रीबाई फुलेबावीस प्रतिज्ञाऔंढा नागनाथ मंदिरअमरावती जिल्हास्त्री नसबंदी शस्त्रक्रियाफुलपाखरूराजगडराज ठाकरेमहाराष्ट्रातील खासदारांची यादी🡆 More