रथसप्तमी

रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो.

या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते. आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी,माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत.

चित्र:Shri Surya Bhagvan bazaar art, c.1940's.jpg
सूर्यदेव
रथसप्तमी
सूर्य मंदिर कोणार्क

स्वरूप

हिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे.भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते. या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतो.. लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य देतो. अशा पूजने समृद्धी प्राप्त होते असा संकेत रूढ आहे. सात घोडे (उच्चैःश्रवा) आणि सारथी अरुण (गरूडाचा मोठा भाऊ) यांसह सूर्याची पूजा करताना सूर्याची सोन्याची प्रतिमा रथात ठेवतात.तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढतात. या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आटवतात व सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात. या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व असल्याने या दिवशी उपवासही केला जातो. महाराष्ट्रात मकरसंक्रातीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदीकुंकवाचे दैनंदिन समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात. रथसप्तमी ही वसंत पंचमीनंतर दोन/तीन दिवसांनी येते.

या दिवशी दिलेले दान विशेष लाभदायी मानले जाते.

भारताच्या विविध प्रांतांत

कोणार्क येथील सूर्य मंदिरात या दिवशी सूर्य नारायणाचा जन्मोत्सव साजरा होतो. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर आणि प्रशासन यांच्यातर्फे व्यवस्था उपलब्ध करून दिल्या जातात.

  • दक्षिण भारत- वसंत ऋतूच्या आगमनाचा हा सण दक्षिण भारतातही उत्साहाने साजरा केला जातो. संस्कृतीच्या दृष्टीनेही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्यपूजन केले जाते.

मलियप्पा मंदिरात रथयात्रा आयोजित केली जाते. विविध वाहने तयार केली जातात आणि त्यातून देवांची मिरवणूक या दिवशी काढली जाते. या पुण्य पर्वासाठी तीर्थक्षेत्री भाविक गोळा होतात.

दक्षिण भारतात समुद्राच्या किनारी असलेल्या गावांमध्ये या दिवशी "ब्रह्मोत्सव " साजरा होतो. रथयात्रा काढली जाते.

तिरुपती येथील बालाजी मंदिरात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी तिरुपती येथे सूर्य जयंती उत्सव साजरा करण्याची पद्धती अनेक शतके सुरू आहे असे मानले जाते. बिहार, झारखंड, ओरिसा अशा भारतातील विविध प्रांतांत हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो.

वैदिक देवता

रथसप्तमी 
सूर्य रथाचे काल्पनिक चित्र

सूर्याची उपासना ही वैदिक साहित्यात दिसून येते. गायत्री मंत्र म्हणजेच सविता ( सूर्य) या देवतेचा गायत्री छंदातील मंत्र आहे. सूर्य उपासनेचे प्राचीन संदर्भ आपल्याला अशाप्रकारे वैदिक साहित्यात दिसून येतात.

अन्य महत्त्व

याच दिवशी नर्मदा जयंती असते.यानिमित्ताने अमरकंटक येथे मोठी यात्रा भरते.


हे ही पहा

मकरसंक्रांत

सूर्य

संदर्भ


Tags:

रथसप्तमी स्वरूपरथसप्तमी भारताच्या विविध प्रांतांतरथसप्तमी वैदिक देवतारथसप्तमी अन्य महत्त्वरथसप्तमी हे ही पहारथसप्तमी संदर्भरथसप्तमीमाघ शुद्ध सप्तमी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोल्हापूरसातारा जिल्हासोनारनीती आयोगस्त्री नसबंदी शस्त्रक्रियारक्तलोकसंख्या घनताप्रतापगडपारनेर विधानसभा मतदारसंघराजकीय पक्ष२०२४ मधील भारतातील निवडणुकावल्लभभाई पटेलदिशास्वामी विवेकानंदभारतातील जातिव्यवस्थाशिवाजी महाराजवृत्तपत्रपु.ल. देशपांडेसमीक्षातुकडोजी महाराजरामसेतूचाफेकर बंधूअशोकाचे शिलालेखनवनीत राणाम्हणीओमराजे निंबाळकरहवामानपश्चिम दिशाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीबौद्ध धर्मभरती व ओहोटीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनासंशोधनयोनीहिंदू धर्मातील अंतिम विधीघनकचराअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघमावळ लोकसभा मतदारसंघहणमंतराव रामदास गायकवाडवीणाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारकळसूबाई शिखरउष्माघातअल्बर्ट आइन्स्टाइननागपूरशरद पवारसांगली लोकसभा मतदारसंघमोगरासमुपदेशनशालिनी पाटीलमहाराष्ट्राचा इतिहासप्राजक्ता माळीजगदीश खेबुडकरछत्रपती संभाजीनगरपुणे जिल्हाहार्दिक पंड्याश्रीकांत शिंदेसात बाराचा उतारापुष्यमित्र शुंगमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीगांडूळ खतगडचिरोली जिल्हामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीभारताच्या राष्ट्रपतींची यादीजवसराज्यपालमानवी शरीरबुलढाणा जिल्हावातावरणभौगोलिक माहिती प्रणालीमहावीर जयंतीसाहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (मराठी)किरवंतशेतकरी कामगार पक्षमण्यारउंटबँकमुंज🡆 More