महाशिवरात्री

महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे, जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शिवाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.

हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो. हा सण शिव आणि पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो, आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतो.

महाशिवरात्री
ध्यानस्थ बसलेल्या शिवाची मूर्ती

हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो जीवनात आणि जगामध्ये "अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे" स्मरण आहे. या दिवशी शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना, उपवास, नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो. भाविक रात्रभर जागरण करतात. ते एखाद्या शिवमंदिराला भेट देतात किंवा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जातात. या सणाची उत्पत्ती ५ व्या शतकात झाली असे मानले जाते.

काश्मीर शैव धर्मात, काश्मीर प्रदेशातील शिवभक्तांद्वारे या सणाला हर-रात्री किंवा हेरथ किंवा हेरथ म्हणतात.

प्राचीनता आणि महत्त्व

महाशिवरात्री 
महाशिवरात्रीनिमित्त चक्क्याची विशेष पूजा

संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे.

आख्यायिका

  • एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण तिथे आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरीण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो.त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच म्हणू लागली- "मला मार पण इतराना सोडून दे." हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे तो पावन झाला. हा व्याध आजही आकाशात दिसून येतो असे मानले जाते.
महाशिवरात्री 
कोटेश्वर महादेव मंदिर महाशिवरात्री पूजा

पूजापद्धती

महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात.. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.

  • उपवास-

महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवास करतात. काही भक्त दूध आणि फळे असा आहार घेतात. प्रसादासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते शंकराला अर्पण केले जातात. खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी तयार केले जातात.

शिवरात्रीच्या रात्री काही प्रांतात भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात. दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धतीही प्रचलित आहे. याला थंडाई असे म्हटले जाते.

महाशिवरात्री पूजेसाठी आवश्यक अशी सामग्री दुकानांमध्ये भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाते. भस्म, रुद्राक्ष, रुद्राक्षमाला, त्रिशूल, शंकराच्या मूर्ती, शिवलिंगे, डमरू अशा विविध गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध असतात. बेलाची पाने, पांढरी फुले, हार यांचीही विक्री या दिवशी केला जाते.

भारताच्या विविध राज्यात

दक्षिण भारतात आदल्या दिवशी एकभुक्त व्रत केले जाते. म्हणजे आदल्या दिवशी एक भोजन केले जाते. रात्री पवित्र जागी झोप घेतली जाते. नदीत स्नान करून शंकराचे दर्शन घेतले जाते. शिवाला कमल अर्पण करून तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. ऋग्वेदातील सूक्ते म्हटली जातात. तुळशीची पाने आणि पायसाचा (खिरीचा) नैवेद्य आणि यजुर्वेदाचे पठण, बेलाची पाने आणि तीळ घातलेला भाताचा नैवेद्य आणि सामवेदाचे पठण, निळी कमळे वाहून साध्या अन्नाचा नैवेद्य आणि अथर्ववेदाचे पठण केले जाते.

काश्मीरमध्ये महाशिवरात्री दरम्यान होणारी बर्फवृष्टी ही पवित्र मानली जाते. शंकराचार्य टेकडी येथील मंदिरात भक्त दिवसभर दर्शनासाठी जातात. विशेष यात्रेचे आयोजन केले जाते. पूजेचे पदार्थ, अक्रोड, कमळाची फुले यांची विक्री करणारी दुकाने मंदिर परिसरात थाटली जातात.

आसाम राज्यातील शुक्रेश्वर मंदिर, उमानंद मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीला भाविक दर्शनासाठी भेट देतात. यात्रेचे आयोजन करण्यात येते.

ओरिसा राज्यात भाविक शिवरात्रीचा उपवास करतात आणि शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतात.

उत्तर प्रदेशातील वटेश्वर मंदिरात शिवरात्री निमित्त भाविक राजस्थान, मध्य प्रदेश येथून पाण्याची कावड घेऊन पोहोचतात आणि शिवाला अभिषेक करतात. मध्य हिमालयात या दिवशी यात्रा भरते.

यात्रा

महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभरात विविध तीर्थक्षेत्रे, तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानी विशेष यात्रा भरतात.

२०२४ साली रीवा येथून अयोध्या येथे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने एक भव्य नगारा पाठविण्याचे नियोजन केले गेले आहे. उत्सवकाळात अशा प्रकारच्या विशेष उपक्रमांचे आयोजन हे महाशिवरात्र यात्रेचे वैशिष्ट्य मानले जाते.

महाशिवरात्री 
महाशिवरात्री यात्रा

चित्रदालन

महाशिवरात्रीच्या दिवशी भरणाऱ्या महाराष्ट्रातील यात्रा

  • श्री धान्येश्वर मंदिर, धानेप, ता. वेल्हे, जि. पुणे
  • श्री अगस्ती मंदिर, ता: अकोले, जिल्हा : अहमदनगर
  • अंबरनाथ जिल्हा ठाणे, येथील पुरातन शिव मंदिर.
  • आरमोरी तालुक्याच्या मुख्यालयाजवळच्या पहाडीवरील महादेवगड मंदिर येथे
  • औरंगाबादपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या वेरूळ लेण्यांच्या जवळचे गरुडेश्वर मंदिर येथे.
  • आष्टीनजीकच्या चपराळा येथील हनुमान मंदिर प्रशांतधाम परिसरातील यात्रा
  • औंढा नागनाथ येथील यात्रा
  • कोल्हापूरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कणेरी येथील यात्रा
  • खडकेश्वर, (औरंगाबाद)
  • गडचांदूर (चंद्रपूर जिल्हा)
  • गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्‍यातील खोब्रामेंढा येथील मंदिर परिसरातील यात्रा
  • गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील मंदिर परिसरातील यात्रा
  • घारापुरी लेण्यांजवळ (मुंबई) येथील यात्रा
  • घृष्णेश्वर, दौलताबाद-मराठवाडा
  • चामोर्शी तालुक्‍यातील मार्कंडादेव येथील मार्कंडेश्‍वर मंदिर परिसरातील यात्रा
  • ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा रेल्वे स्टेशनानजीकचे गंगा गोरजेश्वर देवस्थान परिसरातील यात्रा
  • देवगडजवळची कुणकेश्वरची यात्रा
  • परळी वैजनाथ, बीड जिल्हा
  • पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावात असलेल्या नागनाथ मंदिर परिसरात. हे गाव वाडा तालुक्यातील खनिवलीपासून दोन कि.मी.अंतरावर आहे.
  • बनेश्वर (पुणे जिल्ह्यातील नसरापूर) येथे.
  • भीमाशंकरची यात्रा
  • राजापूर शहरानजीक असलेल्या मौजे धोपेश्वर गावातील धूतपापेश्वर देवस्थानाच्या परिसरातली यात्रा.
  • वैरागडचे भंडारेश्‍वर मंदिर परिसरातील यात्रा
  • शिवणी-डोंगरगावजवळील चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्‍याच्या आवळगाव येथील सुप्रसिद्ध गुरूबाबा देवस्थान परिसरातील यात्रा
  • सांगली जिल्हा कवठे महांकाळ येथे
  • सातारा जिल्ह्यातील लिंब गोवे येथील कोटेश्‍वर मंदिराच्या परिसरात
  • श्री सिद्धेश्वर रत्नेश्र्वर देवस्थान (लातूर) येथील यात्रा
  • प्रतापगड (जि. गोंदिया) येथील यात्रा
  • गायमुख येथील यात्रा
  • शिवनी बांध (ता. साकोली जि. भंडारा)

-सांगली जिल्ह्यातील करगणी येथे लखमेश्र्वर उर्फ श्रीराम देवस्थान हे प्राचीन मंदिर आहे. करगणी येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते.

संदर्भ

बाह्यदुवे

Tags:

महाशिवरात्री प्राचीनता आणि महत्त्वमहाशिवरात्री आख्यायिकामहाशिवरात्री पूजापद्धतीमहाशिवरात्री भारताच्या विविध राज्यातमहाशिवरात्री यात्रामहाशिवरात्री चित्रदालनमहाशिवरात्री च्या दिवशी भरणाऱ्या महाराष्ट्रातील यात्रामहाशिवरात्री संदर्भमहाशिवरात्री बाह्यदुवेमहाशिवरात्रीतांडवनृत्यपार्वतीफाल्गुनशिवहिंदू दिनदर्शिकाहिंदू सण आणि उत्सव

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हळदकादंबरीनामब्राझीलची राज्येजातिव्यवस्थेचे निर्मूलनबदकए.पी.जे. अब्दुल कलामफूलसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीअश्वगंधागूगलविधान परिषदमहाराष्ट्रातील लोककलाज्योतिबा मंदिरहोमी भाभाराज्यशास्त्रकविताखंडोबाज्ञानेश्वरग्रामपंचायतनिसर्गद्राक्षलोकशाहीकन्या रासआवळाशिवनेरीउंटकोल्हापूरअजिंक्यताराबाराखडीभगतसिंगग्राहक संरक्षण कायदामहाराष्ट्राचे राज्यपालमहाराष्ट्र शासनटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीशब्दभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेबच्चू कडूजयगडनागपूर लोकसभा मतदारसंघशिवराम हरी राजगुरूयूट्यूबप्रणिती शिंदेआणीबाणी (भारत)दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघबाजरीमांजरभारतातील जिल्ह्यांची यादीमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीशाळाप्लूटो (बटु ग्रह)रॉयल चॅलेंजर्स बंगलोररस (सौंदर्यशास्त्र)पुणेहनुमान चालीसास्त्रीवादी साहित्यसंभाजी भोसलेजिल्हा परिषदफेसबुकअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीहार्दिक पंड्यारक्तपुणे जिल्हाबाळ ठाकरेविदर्भभारत छोडो आंदोलनमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीसुशीलकुमार शिंदेनैसर्गिक पर्यावरणदत्तात्रेयभारतातील सण व उत्सवशहामृगधुळे लोकसभा मतदारसंघस्वच्छ भारत अभियानगोपाळ कृष्ण गोखलेईस्टर🡆 More