महाराष्ट्रामधील जिल्हे: महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.

राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. क्षेत्रफळाचे दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हा सर्वात मोठा तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ही १०० टक्के शहरी जिल्हे असल्यामुळे त्या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही. महाराष्ट्रात ३६ जिल्हे असले तरी एकूण जिल्हा परिषद ३४ आहेत.

महाराष्ट्रामधील जिल्हे: इतिहास, प्रदेश आणि विभाग, जिल्ह्यांची यादी
महाराष्ट्रातील जिल्हे विभागानुसार

इतिहास

  • १८१८ मध्ये बॉम्बे स्टेट मध्ये महाराष्ट्रातील खान्देश, नासिक, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्‍नागिरी, अलिबाग आणि बॉम्बे हे १० जिल्हे होते
  • १९०६ मध्ये खान्देश जिल्ह्याचे विभाजन करून धुळे व जळगाव हे दोन जिल्हे बनविण्यात आले
  • राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ नुसार कच्छ, बडोदा ही संस्थाने व सौराष्ट्र राज्य हा गुजराती भाषिक प्रदेश, तसेच हैद्राबाद संस्थानमध्य प्रांत आणि वऱ्हाड ह्या भागातील मराठी भाषिक प्रदेश पूर्वीच्या मुंबई राज्याला जोडून द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली होती. १ मे १९६० रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन करून मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र तर गुजराती भाषिकांसाठी गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली.
  • महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रात १) ठाणे, २) कुलाबा, ३) रत्‍नागिरी, ४) बृहन्मुंबई, ५) नाशिक, ६) धुळे, ७) पुणे, ८) सांगली, ९) सातारा, १०) कोल्हापूर, ११) सोलापूर, १२) औरंगाबाद, १३) बीड, १४) धाराशिव, १५) परभणी, १६) नांदेड, १७) बुलढाणा, १८) अहिल्यादेवीनगर, १९) अकोला, २०) अमरावती, २१) नागपूर, २२) वर्धा, २३) यवतमाळ, २४) जळगाव, २५) भंडारा आणि २६) चांदा ही २६ जिल्हे होती. सन १९६४ मध्ये चांदा शहराचे नाव बदलून चंद्रपूर करण्यात आले.
  • १ मे १९८१ रोजी अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना रत्‍नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विभाजन करून जालना या दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.
  • बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना, १६ ऑगस्ट १९८२ ला धाराशिव जिल्ह्याचे विभाजन करून लातूर तर २६ ऑगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली या दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.
  • १ ऑक्टोबर १९९० रोजी शरद पवार मुख्यमंत्री असताना, मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर व मुंबई उपनगर ही जिल्हे तयार झाली.
  • १९९५ मध्ये राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यानंतर बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई असे करण्यात आले.
  • १ जुलै १९९८ रोजी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना, धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार व अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम या दोन नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  • १ मे १९९९ रोजी नारायण राणे मुख्यमंत्री असताना परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली व भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  • १ ऑगस्ट २०१४ रोजी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे झाले.

प्रदेश आणि विभाग

भौगोलिक प्रदेश

भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राचे पाच प्रदेशांमध्ये विभाजन केले जाते.

विभाग

महाराष्ट्र राज्याची सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. विभागानुसार जिल्ह्यांची यादी खाली दिली आहे.

अनुक्रम विभागाचे नाव मुख्यालय क्षेत्र जिल्ह्यांची संख्या जिल्हे सर्वात मोठे शहर
अमरावती विभाग अमरावती विदर्भ अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम अमरावती
छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर मराठवाडा छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी छत्रपती संभाजीनगर
कोकण विभाग मुंबई कोकण

मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग

मुंबई
नागपूर विभाग नागपूर विदर्भ

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

नागपूर
नाशिक विभाग नाशिक खान्देश

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर

नाशिक
पुणे विभाग पुणे पश्चिम महाराष्ट्र पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर पुणे

जिल्ह्यांची यादी

खालील तक्त्यामध्ये सर्व ३६ जिल्ह्यांचे क्षेत्रफळ व त्यांची लोकसंख्या व संबंधीत माहिती दिली आहे. लोकसंख्येची आकडेवारी २०११ च्या जनगणनेनुसार आहे. साक्षरता दर हा ० ते ६ या वयोगटातील लहान मुलांना वगळून आहे. म्हणजेच, साक्षरता दर = एकूण साक्षर / (एकूण लोकसंख्या - ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या)

क्र. नाव कोड स्थापना मुख्यालय क्षेत्रफळ (किमी) लोकसंख्या (२०११) राज्याच्या लोकसंख्येच्या (%) घनता (/किमी) शहरी लोकसंख्या(%) साक्षरता दर (%) लिंग गुणोत्तर तालुके अधिकृत संकेतस्थळ
अकोला AK मे १९६० अकोला ५,६७६ १८,१३,९०६ १.६१% ३२० ३९.६८% ८८.०५% ९४६ जिल्हा संकेतस्थळ
अमरावती AM मे १९६० अमरावती १२,२१० २८,८८,४४५ २.५७% २३७ ३५.९१% ८७.३८% ९५१ १४ जिल्हा संकेतस्थळ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर AH मे १९६० पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर १७,०४८ ४५,४३,१५९ ४.०४% २६६ २०.०९% ७९.०५% ९३९ १४ जिल्हा संकेतस्थळ
धाराशिव DS मे १९६० धाराशिव ७,५६९ १६,५७,५७६ १.४८% २१९ १६.९६% ७८.४४% ९२४ जिल्हा संकेतस्थळ
छत्रपती संभाजीनगर CS मे १९६० औरंगाबाद १०,१०७ ३७,०१,२८२ ३.२९% ३६६ ४३.७७% ७९.०२% ९२३ जिल्हा संकेतस्थळ
कोल्हापूर KO मे १९६० कोल्हापूर ७,६८५ ३८,७६,००१ ३.४५% ५०४ ३१.७३% ८१.५१% ९५७ १२ जिल्हा संकेतस्थळ
गडचिरोली GA २६ ऑगस्ट १९८२ गडचिरोली १४,४१२ १०,७२,९४२ ०.९५% ७४ ११.००% ७४.३६% ९८२ १२ जिल्हा संकेतस्थळ
गोंदिया GO मे १९९९ गोंदिया ५,२३४ १३,२२,५०७ १.१८% २५३ १७.०८% ८४.९५% ९९९ जिल्हा संकेतस्थळ
चंद्रपूर CH मे १९६० चंद्रपूर ११,४४३ २२,०४,३०७ १.९६% १९३ ३५.१८% ८०.०१% ९६१ १५ जिल्हा संकेतस्थळ
१० जळगाव JG मे १९६० जळगाव ११,७६५ ४२,२९,९१७ ३.७६% ३६० ३१.७४% ७८.२०% ९२५ १५ जिल्हा संकेतस्थळ
११ जालना JN मे १९८१ जालना ७,७१८ १९,५९,०४६ १.७४% २५४ १९.२७% ७१.५२% ९३७ जिल्हा संकेतस्थळ
१२ ठाणे TH मे १९६० ठाणे ४,२१४ ८०,७०,०३२ ७.१८% १९१५ ८६.१६% ८७.२३% ८७० जिल्हा संकेतस्थळ
१३ धुळे DH मे१९६० धुळे ७,१९५ २०,५०,८६२ १.८३% २८५ २७.८४% ७२.८०% ९४६ जिल्हा संकेतस्थळ
१४ नंदुरबार NB जुलै १९९८ नंदुरबार ५,९५५ १६,४८,२९५ १.४७% २७७ १६.७१% ६४.३८% ९७८ जिल्हा संकेतस्थळ
१५ नांदेड ND मे १९६० नांदेड १०,५२८ ३३,६१,२९२ २.९९% ३१९ २७.१९% ७५.४५% ९४३ १६ जिल्हा संकेतस्थळ
१६ नागपूर NG मे १९६० नागपूर ९,८९२ ४६,५३,५७० ४.१४% ४७० ६८.३१% ८८.३९% ९५१ १४ जिल्हा संकेतस्थळ
१७ नाशिक NS मे १९६० नाशिक १५,५३० ६१,०७,१८७ ५.४३% ३९३ ४२.५३% ८२.३१% ९३४ १५ जिल्हा संकेतस्थळ
१८ परभणी PB मे १९६० परभणी ६,२१४ १८,३६,०८६ १.६३% २९५ ३१.०३% ७३.३४% ९४७ जिल्हा संकेतस्थळ
१९ पालघर PL ऑगस्ट २०१४ पालघर ५,३४४ २९,९०,११६ २.६६% ५६० ५२.२१% ७७.०४% ९३६ जिल्हा संकेतस्थळ
२० पुणे PU मे १९६० पुणे १५,६४३ ९४,२९,४०८ ८.३९% ६०३ ६०.९९% ८६.१५% ९१५ १४ जिल्हा संकेतस्थळ
२१ बीड BI मे १९६० बीड १०,६९३ २५,८५,०४९ २.३०% २४२ १९.९०% ७६.९९% ९१६ ११ जिल्हा संकेतस्थळ
२२ बुलढाणा BU मे १९६० बुलढाणा ९,६६१ २५,८६,२५८ २.३०% २६८ २१.२२% ८३.४०% ९३४ १३ जिल्हा संकेतस्थळ
२३ भंडारा BH मे १९६० भंडारा ४,०८७ १२,००,३३४ १.०७% २९४ १९.४८% ८३.७६% ९८२ जिल्हा संकेतस्थळ
२४ मुंबई उपनगर MU ऑक्टोबर १९९० वांद्रे ४४६ ९३,५६,९६२ ८.३३% २०९८० १००.००% ८९.९१% ८६० जिल्हा संकेतस्थळ
२५ मुंबई शहर MC मे १९६० १५७ ३०,८५,४११ २.७५% १९६५२ १००.००% ८९.२१% ८३२ जिल्हा संकेतस्थळ
२६ यवतमाळ YTL मे १९६० यवतमाळ १३,५८२ २७,७२,३४८ २.४७% २०४ २१.५८% ८२.८२% ९५२ १६ जिल्हा संकेतस्थळ
२७ रत्‍नागिरी RT मे १९६० रत्‍नागिरी ८,२०८ १६,१५,०६९ १.४४% १९७ १६.३३% ८२.१८% ११२२ जिल्हा संकेतस्थळ
२८ रायगड RG मे १९६० अलिबाग ७,१५२ २६,३४,२०० २.३४% ३६८ ३६.८३% ८३.१४% ९५९ १५ जिल्हा संकेतस्थळ
२९ लातूर LA १६ ऑगस्ट १९८२ लातूर ७,१५७ २४,५४,१९६ २.१८% ३४३ २५.४७% ७७.२६% ९२८ १० जिल्हा संकेतस्थळ
३० वर्धा WR मे १९६० वर्धा ६,३०९ १३,००,७७४ १.१६% २०६ ३२.५४% ८६.९९% ९४६ जिल्हा संकेतस्थळ
३१ वाशिम WS जुलै १९९८ वाशिम ४,८९८ ११,९७,१६० १.०७% २४४ १७.६६% ८३.२५% ९३० जिल्हा संकेतस्थळ
३२ सांगली SN मे १९६० सांगली ८,५७२ २८,२२,१४३ २.५१% ३२९ २५.४९% ८१.४८% ९६६ १० जिल्हा संकेतस्थळ
३३ सातारा ST मे १९६० सातारा १०,४८० ३०,०३,७४१ २.६७% २८७ १८.९९% ८२.८७% ९८८ ११ जिल्हा संकेतस्थळ
३४ सिंधुदुर्ग SI मे १९८१ सिंधुदुर्गनगरी (ओरस बुद्रूक) ५,२०७ ८,४९,६५१ ०.७६% १६३ १२.५९% ८५.५६% १०३६ जिल्हा संकेतस्थळ
३५ सोलापूर SO मे १९६० सोलापूर १४,८९५ ४३,१७,७५६ ३.८४% २९० ३२.४०% ७७.०२% ९३८ ११ जिल्हा संकेतस्थळ
३६ हिंगोली HI मे १९९९ हिंगोली ४,८२७ ११,७७,३४५ १.०५% २४४ १५.१८% ७८.१७% ९४२ जिल्हा संकेतस्थळ
- महाराष्ट्र - - मुंबई ३,०७,७१३ ११,२३,७४,३३३ १००% ३६५ ४५.२२% ८२.३४% ९२९ ३५८ -

हे देखील पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

महाराष्ट्रामधील जिल्हे इतिहासमहाराष्ट्रामधील जिल्हे प्रदेश आणि विभागमहाराष्ट्रामधील जिल्हे जिल्ह्यांची यादीमहाराष्ट्रामधील जिल्हे हे देखील पहामहाराष्ट्रामधील जिल्हे संदर्भमहाराष्ट्रामधील जिल्हे बाह्य दुवेमहाराष्ट्रामधील जिल्हेअमरावती विभागकोकणकोकण विभागखान्देशछत्रपती संभाजीनगर विभागजिल्हाजिल्हा परिषदनागपूर विभागनाशिक विभागपश्चिम महाराष्ट्रपुणे विभागपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हामराठवाडामहाराष्ट्रमुंबई शहरविदर्भ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विशेषणआलेजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढनवरी मिळे हिटलरलाजलप्रदूषणमाती प्रदूषणशुभेच्छामंगेश पाडगांवकरहोळीउंटराजा राममोहन रॉयराजरत्न आंबेडकरकेंद्रीय लोकसेवा आयोगविदर्भकोळी समाजआकाशवाणीशिवराम हरी राजगुरूचंद्रयान ३संख्यासुजात आंबेडकरनृत्यहिरडावनस्पतीरावेर लोकसभा मतदारसंघपाऊसजागतिक महिला दिनवाघमानवी हक्कमराठी व्याकरणकिरण बेदीदादाभाई नौरोजीक्रियापदव.पु. काळेमतदानगोवाविधानसभाहनुमान चालीसाबच्चू कडूउद्धव ठाकरेविराट कोहलीसुधा मूर्तीमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)दत्तात्रेयनर्मदा नदीभरतनाट्यम्खेळमराठी भाषेमधील वृत्तपत्रेबाबा आमटेअटलबिहारी वाजपेयीसूत्रसंचालनवृषणरायगड लोकसभा मतदारसंघसायबर गुन्हाभौगोलिक माहिती प्रणालीजिल्हा परिषदराणी लक्ष्मीबाईशब्द सिद्धीसंगणक विज्ञानडाळिंबराजा रविवर्माअंदमान आणि निकोबार बेटेसंदेशवहनवंचित बहुजन आघाडीजायकवाडी धरणसोनम वांगचुकतरसमहाराष्ट्र लोकसेवा आयोगआंतरराष्ट्रीय नाणेनिधीमानवी शरीरजागतिक लोकसंख्याराजाराम भोसलेमुंबईमहाराष्ट्र विधान परिषदरामटेक लोकसभा मतदारसंघकुक्कुट पालनदुष्काळभारतामधील प्रमुख बंदरेप्रकाश आंबेडकर🡆 More