मन्मथ स्वामी

संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज (१५६१-१६३१) हे लिंगायत हिंदुधर्माचे संत तसेच वीरशैव लिंगायत परंपरेतील शिवयोगी होते.

त्यांचा जन्म मराठवाड्यातील निनगुर म्हणजेच आजचे नेकनुर जि. बीड या गावी झाला. लिंगायत संतकवी नागनाथ मरळसिद्ध यांचे हे शिष्य. कपिलधार येथे मन्मथ स्वामींची समाधी आहे.

श्री मन्मथ स्वामी यांच्या वडिलांचे नाव शिवलिंग स्वामी आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. उभयपती - पत्नी अत्यन्त श्रद्धावान शिवभक्त होते.

काव्यभिरुची :-

बालपणापासून त्यांची ओढ मराठी काव्याकडे असल्यामुळे आपल्या युवा अवस्थेच्या आरंभापासूनच लोककाव्य निर्माण करण्याचा प्रयास आरंभला.त्यांच्या समकालीन व उत्तर कालीन अनेक कवींनी

बालपणी दंडुडफाचा धुंधकार। जिंकिले शाहीर नेणी किती॥

असा आदरपूर्वक त्यांच्या काव्य शैलीचा व बालपणातल्या काव्याभिरुचिचा उल्लेख केला आहे.

धार्मिक श्रद्धा :-

ज्या वारकरी संप्रदायाने आपल्या प्रचाराच्या बळावर वीरशैव लोकांना आपल्या संप्रदायात ओढून घेतले होते, अशांची मुक्ती त्यांच्याच पंढरपूर क्षेत्रात जाऊन केली.

अनेक उलट प्रश्नांना समर्पक उत्तर देत शेवटी,

        शिवावाचून आहे कोण ।         विठ्ठल मस्तकी शिव जाण॥


असे सांगून प्रत्यक्ष विठ्ठल मूर्तीच्या मस्तकावर असलेल्या शिवलिंगाचे दर्शन अनेक सदभक्तांना करून दिले व शिवाविषयी असलेला त्यांचा गैरसमज दूर केला.

मात्र तसे करताना कोणाही शिवभक्तांकडून विष्णू अथवा विठ्ठल  निंदा अथवा अवहेलना होवु नये याची त्यांनी दक्षता घेतली. 

म्हणूनच पंढरपूर क्षेत्री निवास करून राहिलेल्या महनीय संतांनी  "सबसंतोका राजा" अर्थात "संत शिरोमणी"  ही उपाधी बहाल केली.

आणि तेव्हापासून लोक मन्मथ  स्वामींना संत शिरोमणी मन्मथ स्वामी म्हणून संबोधू लागले.

ग्रंथरचना :-

स्वयंप्रकाश, ज्ञानबोध, गुरुगीता , शिवगीता , श्रीपरमरहस्य आदि त्यांची ग्रंथरचना होय.

"श्रीपरमरहस्य" :-

संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. वीरशैव लिंगायत मत परंपरेतील हा एक पवित्र तसेच महत्त्वाचा ग्रंथ आहे. यात मन्मथ माऊलीनी वीरशैव - लिंगायत मत परंपरेत शिवाचार, शिवसंस्कृती,शिवधर्म याबद्द्ल विस्तृत विवेचन केलेले आहे. वीरशैव - लिंगायत समाजातील अनुयायी या ग्रंथाचे नियमित पारायण करतात.

परमरहस्य ग्रंथ ग्रंथराज थोर |

मन्मथ स्वामींच्या काव्य रचना : -

  • अनुभवानंद (२४६ ओव्यांचे अपूर्ण काव्य)
  • स्वयंप्रकाश(७३९ ओव्यांचा ग्रंथ)
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.

Tags:

मन्मथ स्वामी काव्यभिरुची :-मन्मथ स्वामी धार्मिक श्रद्धा :-मन्मथ स्वामी ग्रंथरचना :-मन्मथ स्वामी श्रीपरमरहस्य :-मन्मथ स्वामी ंच्या काव्य रचना : -मन्मथ स्वामीकपिलधारमराठवाडा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठा आरक्षणब्राझीलची राज्येऔद्योगिक क्रांतीजाहिरातमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीचीननितंबआलेखाचे प्रकाररामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीमहादेव जानकरघुबडगोदावरी नदीवंचित बहुजन आघाडीभारूडनातीकाळाराम मंदिर सत्याग्रहपोक्सो कायदाभारतीय पंचवार्षिक योजनाकर्करोगमलेरियालोकसभामहाराष्ट्र विधानसभानक्षलवादवेरूळ लेणीकुष्ठरोगलिंगायत धर्मखंडोबामराठाविधानसभा आणि विधान परिषदकुणबीस्वामी समर्थशिवम दुबेविमाशिवाजी महाराजांचा जीवनक्रमबौद्ध धर्मात पौर्णिमेचे महत्त्वलोणार सरोवरढेकूणवित्त आयोगप्राण्यांचे आवाजसातव्या मुलीची सातवी मुलगीजुमदेवजी ठुब्रीकरमाहितीपर्यटनराकेश बापटभारतीय संसदभारताची अर्थव्यवस्थाकाळूबाईजहांगीरगोविंद विनायक करंदीकरजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)महिलांसाठीचे कायदेकुपोषणबैलगाडा शर्यतलोकगीतॲडॉल्फ हिटलरहवामानजागतिक महिला दिनभारतीय राष्ट्रीय काँग्रेसकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघभाषाबीड लोकसभा मतदारसंघसेवालाल महाराजविरामचिन्हेसामाजिक समूहसातारा विधानसभा मतदारसंघभारताच्या राष्ट्रपतींची यादीबाळशास्त्री जांभेकरविजयसिंह मोहिते-पाटीलजगातील देशांची यादीपरभणी विधानसभा मतदारसंघठाणे लोकसभा मतदारसंघसुतकमूळव्याधसाखरओशोनिबंधउत्पादन (अर्थशास्त्र)भारताचे सर्वोच्च न्यायालयडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके🡆 More