न्हावी

न्हावी म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशवपन, केशकर्तन, श्मश्रू (दाढी) करणे, केशभूषा, केशसज्जा इत्यादीचा व्यवसाय करणारी व्यक्ती असते.

याला नापित, नाभिक, वारीक, म्हाली (महाला), हजाम असेही शब्द आहेत. कंगवा, कैची व वस्तरा ही न्हावी वापरत असणारी प्राथमिक साधने आहेत. केशकर्तनासाठी विजेवर किंवा बॅटरीवर चालणारी अनेक साधने सध्या उपलब्ध आहेत.

न्हावी
न्हावी

मुंबईस पहिला न्हावीखाना (हेअर कटिंग सलून) लोणकर व बडनेरकर यांनीं काढला असे म्हणतात. नंदन कालेलकर हा लंडनला जाऊन केस कापण्याचे आधुनिक तंत्र शिकून आधी मुंबईत आणि मग पुण्यात सलून काढणारा पहिला 'न्हावी' होय. गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रातही हे लोक लग्न जुळविण्यांत मध्यस्थ असतात. गावभर फिरून ते लग्नाची बोलावणी करतात. ज्या ठिकाणी जुनी शंकराची मंदिरे आहेत त्या ठिकाणी सनई-चौघडा, ढोल, तुतारी, नगारा वाजविण्याचे काम घडशी समाजातील कलावंतांकडे असते. मात्र, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हेच काम न्हावी करतात.

सनई-चौघड्याच्या आणि संबळीच्या आवाजात तुळजापूरच्या तुळजाभवानी या देवीपर्यंत नैवेद्य पोचविण्याची जबाबदारी ब्राह्मणांकडे असते. सनई-चौघडा न्हावी वाजवतात आणि गोंधळी संबळ. या सर्वांना कोल्हापूर संस्थानच्या वतीने मानधन सुरू असते. गणपतराव पिराजी वसईकर हे व्यवसायाने न्हावी होते. त्यांनी सनईवादनावर पुस्तकें लिहिली आहेत.

न्हावी हे पूर्वी शस्त्रक्रिया करून तुंबड्या लावीत. जावळ काढणे, जखमा साफ करणे, नारू रोगाचे उपचार करणे हीही कामे करतात. बऱ्याच ठिकाणी लग्नघरातील स्वयंपाकाची व्यवस्था लावणे हे काम न्हावी करतात.राजा महापद्मानंद नाभिक समाजाचे होते.

संत सेना न्हावी

प्रसिद्ध संत सेना महाराज हे न्हावी होते. त्यांचा प्रसिद्ध अभंग :

आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।

सेना न्हावी यांचे सुमारे ११० अभंग, गौळणी, वासुदेव, सासवड माहात्म्य, आळंदी माहात्म्य, त्रिंबकमाहात्म्य आदी रचना या संकेतस्थळावर आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा

शिवाजी महाराजांचा मावळा जिवा महाला व शिवा कशािद हे दोघेही बलुतेदार न्हावी घराण्यातील होते. छत्रपती शिवाजी महाराजानी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानास मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाने सय्यद बंडाला मारून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले.


संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

साडीभारताचा ध्वजचंद्रयान ३महाराष्ट्रातील खासदारांची यादीभारताच्या राष्ट्रपतींची यादीअहमदनगर लोकसभा मतदारसंघरामनवमीऋग्वेदखासदारनांदेड लोकसभा मतदारसंघअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीमहाराष्ट्र केसरीमराठी संतखडकपुस्तकगोरा कुंभारस्त्री सक्षमीकरणभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यादिशाराजगडअश्वत्थामालोकमान्य टिळकहनुमानमराठा साम्राज्यसविनय कायदेभंग चळवळकुलदैवतआचारसंहिताजागरण गोंधळमहाराष्ट्र गीतअण्णा हजारेसोलापूर लोकसभा मतदारसंघबहिणाबाई चौधरीमुंबई–नागपूर द्रुतगतीमार्गबुद्धिमत्तासुशीलकुमार शिंदेप्रेरणाहिंदू धर्मातील अंतिम विधीग्रामपंचायतटोपणनावानुसार मराठी लेखकगोपीनाथ मुंडेराधानगरी वन्यजीव अभयारण्यनारायण मेघाजी लोखंडेकरधनगरसांगली विधानसभा मतदारसंघभारतभारतातील जागतिक वारसा स्थानेशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीसूर्यनमस्कारनक्षलवादऋतूमिया खलिफाज्योतिबा मंदिरयोगकार्ल मार्क्सआर्य समाजव्यायामगौतम बुद्धकुंभ रासशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळपवनदीप राजनकल्याण लोकसभा मतदारसंघलोकगीतजगदीश खेबुडकरकथामूळव्याधराष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्वरमिठाचा सत्याग्रहझाडनागपूरस्त्रीवादशेतीसंदिपान भुमरेक्रिकेटछगन भुजबळबाराखडी🡆 More