चवदार तळे

चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे.

येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावानेही ओळखले जाते. तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे सत्याग्रह केला. या लढ्याची आठवण तसेच ‘समतेचे प्रतीक’ म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे.

चवदार तळे
चवदार तळे
चवदार तळे
तवदार तळ्याचे पाणी प्राषण करतानाचे बाबासाहेबांचे शिल्प

चवदार तळे येथील सत्याग्रह

1925 मध्ये आंबेडकरांनी सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा अधिकार वापरण्यासाठी सत्याग्रह (अहिंसक प्रतिकार) सुरू करण्याचा निर्णय घेतला.कोकणातील महाड या गावाला या कार्यक्रमासाठी निवडले गेले कारण तिथे हिंदु जातिय लोकांचा पाठिंबा होता. यामध्ये मराठी चंद्रसेनिया कायस्थ प्रभु (सीकेपी) समुदायाचे कार्यकर्ते ए.व्ही.छित्रे, समाजसेवा मंडळाचे चित्पावन ब्राह्मण आणि जी.एन. सहस्रबुद्धे, महाड नगरपालिकेचे अध्यक्ष असलेले सीकेपी सुरेंद्रनाथ टिपणीस यांचाही सामावेश होता.

महाड नगरपालिकेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी सार्वजनिक जागा अस्पृश्यांसाठी खुली असल्याचे जाहीर केले आणि इ.स. १९२७ मध्ये आंबेडकरांना महाड येथे बैठक घेण्याचे आमंत्रण दिले. बैठकीनंतर ते चवदार तळ्यावर गेले. आंबेडकरांनी तलावातील पाणी प्यायले आणि हजारो अस्पृश्य लोकांनी त्यांचे अनुसरण केले.

समाजातील काही उच्च वर्णिय लोकांनी 'अस्पृश्य लोकांनी तळ्यातील पाणी घेऊन तळे प्रदूषित कले' असे मत मांडले. त्यानंतर तळे शुद्ध करण्यासाठी गोमूत्र आणि शेण वापरले गेले, ब्राह्मणांनी मंत्र पठण केले. त्यानंतर तळे उच्च जातीच्या पिण्यासाठी योग्य असल्याचे घोषित केले.

आंबेडकरांनी २६-२७ डिसेंबर रोजी महाड येथे दुसरी परिषद घेण्याचे ठरविले. पण काही उच्च वर्णियांनी ते तळे खासगी मालमत्ता सांगुन आंबेडकरांवर गुन्हा दाखल केला. प्रकरण न्यायालयात असल्याने त्यांचा सत्याग्रह चालू ठेवता आला नाही.

२५ डिसेंबर रोजी (मनुस्मृती दहन दिन), आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोब्धे यांनी निषेध म्हणून मनुस्मृती या हिंदू कायद्याच्या पुस्तकाचा दहन केले. डिसेंबर १९३७ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की अस्पृश्यांना तळयामधून पाणी वापरण्याचा अधिकार आहे.

प्रवास

महाडपर्यंत जाण्याकरिता एसटी बस उपलब्ध आहेत.

चित्रदालन

चवदार तळे 
चवदार तळे 
चवदार तळे 
चवदार तळे

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

चवदार तळे येथील सत्याग्रहचवदार तळे प्रवासचवदार तळे चित्रदालनचवदार तळे हे सुद्धा पहाचवदार तळे संदर्भचवदार तळे बाह्य दुवेचवदार तळेअस्पृश्यचवदार तळ्याचा सत्याग्रहडॉ. बाबासाहेब आंबेडकरमहाडरायगड जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघभरती व ओहोटीचेतापेशीभारताची संविधान सभामहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीसाहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (मराठी)सुजात आंबेडकरवाळापुरंदरचा तहकरमाळा विधानसभा मतदारसंघअण्णा भाऊ साठेगडचिरोली जिल्हासंभाजी भोसलेरस (सौंदर्यशास्त्र)संभाजी राजांची राजमुद्राकाळाराम मंदिरपक्षांतरबंदी कायदा (भारत)पुणे लोकसभा मतदारसंघस्थानिक स्वराज्य संस्थाशिर्डीअहवाल लेखनकोल्हापूर जिल्हापळससापपोक्सो कायदाकांशीरामसदा सर्वदा योग तुझा घडावाखाजगीकरणबाळ ठाकरेअग्रलेखमहाराष्ट्र लोकसेवा आयोगवनस्पतीसोळा संस्कारकुळीथरत्‍नागिरी जिल्हामेष रासहडप्पा संस्कृतीभारताच्या राष्ट्रपतींची यादीबौद्ध धर्मभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघवृषभ रासयोनीजगातील देशांची यादीमांगी–तुंगीजनमत चाचणीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळहनुमान जयंतीकांजिण्याबाजरीगोपाळ कृष्ण गोखलेसम्राट अशोक जयंतीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीचवदार तळेभारतातील राजकीय पक्षराकेश बापटघोरपडलोणार सरोवरबँकसातारा लोकसभा मतदारसंघऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघग्रामपंचायतमहारमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीलातूर जिल्हामाण विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील आरक्षणमुघल साम्राज्यमाळीदहशतवादअजिंठा लेणीगजानन दिगंबर माडगूळकरमौर्य साम्राज्यजैन धर्मवाचनसिकलसेलमहादेव गोविंद रानडेन्यायालयीन सक्रियता🡆 More