गिधाड

गिधाड मृतभक्षक वर्गातील पक्षी असून ते प्राण्यांच्या मृतदेहांवर जगतात.

गिधाडे अंटार्क्टिका आणि ओशनिया खंड वगळता सर्वत्र आढळतात.[ संदर्भ हवा ]

गिधाड
गिधाड
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: पक्षी
कुळे

गृध्राद्य(Accipitridae, एक्सिपिट्रीडी)
कॉंडोराद्य(Cathartidae, कॅथार्टिडी)

पिसे नसलेले केसरहित डोके हे बहुतांश गिधाडांचे वैशिष्ट्य आहे. रक्त वा इतर द्रवांनी ते अस्वच्छ होऊन, स्वच्छ करणे अवघड असल्याने असे असावे.

गिधाडे हे निसर्गातील सफाई कर्मचारी असतात. गिधाडे ही अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. वर नमूद केल्या प्रमाणे गिधाडांचे मुख्य खाद्य हे मृतदेहांचे मांस असते. उत्क्रांतीमध्ये त्यांच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. त्यांची ठेवण इतर शिकारी पक्ष्यांसारखी ( बाकदार चोच, टोकदार नखे इत्यादी ) जरी असली तरी त्यांना शिकार करण्याचे कौशल्य फारच कमी असते. त्यांच्या डोक्यावरची पिसे नसतात. डोक्यावर पिसे नसल्याने मृतदेहाच्या आतमध्ये डोकावून मांस खाणे सोपे जाते.[ संदर्भ हवा ]

गिधाडांचे सांघिक कौशल्य

गिधाडांच्या अनेक जाती आहेत. या सर्व जातींचे कार्य एकच म्हणजे मृतदेहांचा फडशा हे असले तरी ह्या सर्व जाती एकमे़कांच्या साह्याने काम करत असतात. ही सर्व गिधाडे मुख्यत्वे उंच आकाशात विहार करत असतात व साधारणपणे कळपात एकमेकांपासून अंतर ठेवून विहार करणे पसंत करतात. भिन्नभिन्न जातींची गिधाडेसुद्धा एकत्र विहार करतात.[ संदर्भ हवा ] प्रत्येक गिधाडाची नजर इतर गिधाडांवर असते. या गिधाडांमधील एक इजिप्शियन गिधाड नावाची जात आहे. ह्या जातीचे डोळे अत्यंत तीक्ष्ण असतात. अनेक किलोमीटर अंतरावरील शिकार किंवा खाद्य हे सहज हेरू शकतात. बहुतेक गिधाडांची याच गिधाडावर नजर असते. जेव्हा हे गिधाड खाद्य हेरते तेव्हा ते साहजिकच खाद्य जिथे असेल तिथे उतरते. त्याला उतरताना पाहून इतर गिधाडे पण उतरू लागतात व सगळ्या गिधाडांना खबर मिळ्ते, की खाद्य मिळाले आहे. खाद्यापाशी पोहोचल्यावर गिधाडे बराच वेळ वाट बघत असतात. ही सर्व गिधाडे राज गिधाड येण्याची वाट बघत असतात. मृतदेहांची कातडी बहुधा अत्यंत जाड झालेली असते व बहुतांशी गिधाडांना ती भेदणे आवाक्याबाहेरचे असते. राज गिधाडाने येऊन पहिले काम फत्ते केल्यावर मग बाकी गिधाडांचे काम चालू होते, व पाहता पाहता पूर्ण मृतदेहाचा अक्षरक्षः फडशा पडतो. मृतदेहाची हाडे सोडून इतर सर्व भाग पचवण्याची क्षमता गिधाडांमध्ये असते.[ संदर्भ हवा ]

गिधाडांच्या भारतात आढळणाऱ्या जाती[ संदर्भ हवा ]

  • पांढरपाठी गिधाड
  • राज गिधाड (लाल डोक्याचे गिधाड)
  • युरेशियन ग्रिफॉन गिधाड (करडे गिधाड); भाऊबंद - हिमालयीन ग्रिफॉन (करडे गिधाड): ही जात महाराष्ट्रात आढळत नाही.
  • पांढरे गिधाड (इजिप्शियन गिधाड)
  • काळे गिधाड (सिनेरियस गिधाड)
  • लांब चोचीचे गिधाड

भारतात न आढळणाऱ्या जाती[ संदर्भ हवा ]

  • कॅलिफोर्नियन कॉंडॉर
  • दाढीवाले गिधाड (लॅमरगिअर)
  • पातळ चोचीचे गिधाड
  • तुर्की गिधाड

भारतातील गिधाडांवरील संकट

भारतात एकेकाळी गेल्या १५ ते २० वर्षांपर्यंत गिधाडांची संख्या चांगली होती परंतु गेल्या काही वर्षात त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. ती इतकी कमी झाली आहे की आता गिधाडे भारतातून नामशेष होणार की काय अशी भीती पक्षी निरीक्षकांना व पक्षीप्रेमींना वाटते आहे. गिधाडांची कोणी शिकार करत नाही. भारतात पाळीव प्राण्यांची संख्या भरपूर असल्याने त्यांचेया खाद्य कमी पण झालेले नाही. त्यांच्या लोकसंख्येला मुख्य फटका बसला आहे ते औषधे व रसायनांमुळे. पाळीव प्राण्यांना डायक्लोफिनॅक नावाचे औषध देतात. औषध घेतलेले असे मेलेले प्राणी खाल्यामुळे गिधाडांमध्ये ते औषध जाते. त्यामुळे गिधाडांच्या शरीरात अनेक व्याघी होतात व ती मरतात.[ संदर्भ हवा ] गिधाडे सुंदर नाहीत आणि ते मृतदेह खात असल्याने सामान्य माणसाला त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना असते. परंतु निसर्गातील अत्यंत महत्त्वाचे काम ते करत आहेत. गिधाडे नसतील तर मृतदेह सडून रोगराई पसरण्याचा धोका असतो. गिधाडे ही नैसर्गिकरीत्या कचरा निर्मूलन करणारी एक महत्त्वाची प्रजाती आहे. भारतीय सरकारने या औषधांवर बंदी आणलेली आहे आहे परंतु ते प्रत्यक्षात मात्र आलेली नाही.[ संदर्भ हवा ]

भारतातील गिधाड संगोपन केंद्रे

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्टन ऑफ द बर्ड्‌स यांच्या सल्ल्यानुसार, हरियाणा-पश्चिम बंगाल-आसाम या राज्य सरकारांनी अनुक्रमे पिंजोर-बुक्सा-रानी या ठिकाणी गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रे चालू करून, जगात केवळ १ टक्का शिल्लक राहिलेल्या प्रजातींच्या पिल्लांचे संगोपन करण्यास सुरुवात केली.[ संदर्भ हवा ] डायक्लोफिनॅकचा अंशही नसलेले बकऱ्याचे मांस या पिल्लांना खाऊ घालण्यात येते. मे २०१३पर्यंत या संगोपन केंद्रांतील गिधाडांची संख्या २५० च्या वर गेली आहे.[ संदर्भ हवा ]

सांस्कृतिक संदर्भ

सीतेला रावणापासून वाचवायला आलेला जटायू हा एक गिधाड होता.[ संदर्भ हवा ]

प्राचीन इजिप्तच्या धर्मामध्ये नेख्बेत ही गिधाडाच्या रूपातील एक देवता होती.[ संदर्भ हवा ]

पेरू मधील नाझ्का पठारावर ज्या महाकाय आकृत्या आहेत, त्यामध्ये कॉंडॉरची आकृती आहे(कॉंडोराद्य कुळातील एक प्रकारचे गिधाड).[ संदर्भ हवा ]

साहित्यिक संदर्भ

कुसुमाग्रज अथवा वि.वा. शिरवाडकर यांच्या जा जरा पूर्वेकडे या कवितेत उल्लेख आहे: वाळवण्टी कोरता का एक श्वानाचे मढे ? जा गिधाडांनो, पुढे, जेथ युद्धाची धुमाळी गंज प्रेताचा पडे, जा जरा पूर्वेकडे !

चित्र दालन

संदर्भ

बाह्य दुवे

  • साचा:वाईल्ड लाइफ
  • "सकाळमधील ब्लॉग". Archived from the original on 2009-07-27. 2009-07-27 रोजी पाहिले.

Tags:

गिधाड ांचे सांघिक कौशल्यगिधाड ांच्या भारतात आढळणाऱ्या जाती[ संदर्भ हवा ]गिधाड भारतात न आढळणाऱ्या जाती[ संदर्भ हवा ]गिधाड भारतातील ांवरील संकटगिधाड भारतातील संगोपन केंद्रेगिधाड सांस्कृतिक संदर्भगिधाड साहित्यिक संदर्भगिधाड चित्र दालनगिधाड संदर्भगिधाड बाह्य दुवेगिधाडअंटार्क्टिकाओशनियाप्राणीमृतभक्षकविकिपीडिया:संदर्भ द्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मेष रासमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीमौर्य साम्राज्यपाणपोईनकाशागायकांदाभारतीय संस्कृतीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघपूर्व दिशाउभयान्वयी अव्ययभांडवलभारताचे सर्वोच्च न्यायालयभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीज्योतिबासाडेतीन शुभ मुहूर्तडॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूचीवृत्तप्रणिती शिंदेवायू प्रदूषणआकाशवाणीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळतबलाकोल्हापूरबुध ग्रहजलचक्रपेशवेक्रियाविशेषणपहिले महायुद्धपेरु (फळ)ईमेलनैसर्गिक पर्यावरणमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीअंशकालीन कर्मचारीमोगरानाशिक लोकसभा मतदारसंघमहाभारतपसायदानसंत तुकारामकांजिण्यालोकसभा सदस्यशेतकरी कामगार पक्षअंदमान आणि निकोबार बेटेअर्जुन वृक्षसूर्यग्रहणवासुदेव बळवंत फडकेएकविरागौतम बुद्धनदीनर्मदा नदीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीराम मंदिर (अयोध्या)व.पु. काळेरक्तपुणेसोलापूर लोकसभा मतदारसंघजागतिकीकरणशीत युद्धसंत सेना महाराजराणी लक्ष्मीबाईगोदावरी नदीताराबाईनवरी मिळे हिटलरलाहिंदू धर्मवि.वा. शिरवाडकरकाळभैरवकमळघनकचराअजिंठा-वेरुळची लेणीमानसशास्त्रगोवरभारतीय लष्करपारू (मालिका)इतिहासमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळकडधान्यलाल किल्लाबसवेश्वर🡆 More