औषध

औषध (अनेकवचन: औषधे ; इंग्लिश: Pharmaceutical drug/ Medication, फार्मास्यूटिकल ड्रग / मेडिकेशन) म्हणजे स्थूलमानाने वैद्यकीय निदान, तोडगा, उपचार व रोगप्रतिबंधक म्हणून वापरावयाचा रासायनिक पदार्थ होय.

यामध्ये माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी वापरली जाणारी आतून घेण्याची व बाहेरून लावण्याची सर्व औषधे येतात. औषधे ही वैद्यकशास्त्राच्या महत्त्वपूर्ण संसाधनांपैकी एक आहेत. सर्व प्रकारच्या वैद्यकीय चिकित्सा पद्धतींमध्ये यांचा उपयोग झालेला आढळतो.

औषध

औषधाचे आपल्या शरीरावर निरनिराळे परिणाम होतात. इतर औषधांचे किंवा पदार्थांचे विषारी परिणाम कमी किंवा नाहीसे करण्यासाठी सुद्धा औषधे वापरली जातात. वेगवेगळ्या रोगांचे निदान करण्यासाठी काही औषधे वापरली जातात. औषधांचे महत्त्वाचे उपयोग थोडक्यात खालीलप्रमाणे सांगता येतील.

१. उपचारात्मक औषधे

२. रोगनिदान करण्यासाठी वापरली जाणारी औषधे

३. रोग बरा करण्यासाठी वापरली जाणारी औषधे

४. शरीरातील घटकांची तूट भरून काढण्यासाठी दिली जाणारी औषधे

५. प्रतिबंधात्मक औषधे

औषधांचे वर्गीकरण: औषधांचे वर्गीकरण करण्याच्या अनेक तऱ्हा आहेत: त्यांच्या रासायनिक गुणधर्मानुसार , औषध घेण्याच्या वहनमार्गानुसार, औषधाचा प्रभाव दिसणाऱ्या शरीरसंस्थेनुसार, औषधयोजनेचे परिणाम इत्यादी अनेकविध तऱ्हांनी औषधांची वर्गवारी करता येऊ शकते.

औषध घेण्याच्या वहनमार्गानुसार वर्गीकरण :

औषधांचे ती घेण्याच्या वहनमार्गानुसार अनेक प्रकार आहेत.

अ. तोंडावाटे घेण्याची औषधे : सगळ्यात जास्त वापरला जाणारा हा प्रकार आहे. हा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. परंतु काही वेळा ; जसे रोगी शुद्धीवर नसल्यास, त्याला जुलाब होत असतील तर किंवा औषध पोटातील आम्लामध्ये विघटीत होत असेल तर हा मार्ग वापरता येत नाही.औषधाची गोळी ही गोल, लंबगोल, चौकोनी अशा वेगवेगळ्या आकारांत आणि रंगांमध्ये उपलब्ध असते. ही सहसा पाण्याबरोबर गिळली जाते. परंतु, चघळण्याची , आधी विरघळवून घ्यायची असेही प्रकार आहेत.

ब. डोळ्यावाटे घेण्याची औषधे: सहसा डोळ्याच्याच विकारांसाठी असतात व त्यातील बव्हंश औषधांमध्ये निर्जंतुकीकरण करणारे औषधही असते.

क.शीरेवाटे घेण्याची औषधे:

ड.त्वचेला लावण्याची औषधे

इ . श्वसनमार्गे घेण्याची औषधे

ई. नाकावाटे घेण्याची औषधे

उ . कानावाटे घेण्याची औषधे

ऊ. गुदद्वारामार्गे आणि योनीमार्गे घेण्याची औषधे


औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी त्याचा नियंत्रित वापर होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी योग्य औषधे, योग्य रुग्णास, योग्य मात्रेत दिल्यानंतर ती योग्य मार्गाने, योग्य कालावधीसाठी वापरणे अपेक्षित असते.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  • "औषधे". २६ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
  • "औषधांचे वर्गीकरण". Archived from the original on 2016-03-25. २६ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.

Tags:

इंग्लिश भाषारासायनिक पदार्थवैद्यकशास्त्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वि.वा. शिरवाडकरमाकडमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४स्त्री सक्षमीकरणरिंकू राजगुरूअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९व्यवस्थापनताराबाईसाडीकुंभ रासरोहित शर्माभारूडमहावीर जयंतीमहाराष्ट्रातील किल्लेकादंबरीहर हर महादेव (२०२२ चित्रपट)करवंदआर.डी. शर्मामहाराष्ट्राचे राज्यपालतेलबियापारू (मालिका)हवामान बदलसंत जनाबाईब्राझीलचाफायकृतइंदिरा गांधीकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघसदा सर्वदा योग तुझा घडावाकासारभारताचे उपराष्ट्रपतीसंवादनेट (परीक्षा)दूधलॉरेन्स बिश्नोईलहुजी राघोजी साळवेसूर्यनमस्कारअहवाल लेखनकुळीथप्रतापगडरत्‍नागिरी जिल्हाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकधाराशिव जिल्हासात बाराचा उताराइतिहासाच्या अभ्यासाची साधनेसिंधुदुर्गविदर्भमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसुशीलकुमार शिंदेफकिरा२०१९ लोकसभा निवडणुकाअश्वत्थामाभारतीय प्रजासत्ताक दिनस्वतंत्र मजूर पक्षवर्तुळसंयुक्त महाराष्ट्र चळवळगर्भाशयगुप्त साम्राज्ययेसूबाई भोसलेलोकसभा सदस्यभारताचा स्वातंत्र्यलढाप्रकाश आंबेडकरमहाराष्ट्र पोलीसभारतातील जातिव्यवस्थातोरणागौतम बुद्धनाथ संप्रदायराहुल गांधीसायाळफुटबॉलसुषमा अंधारेत्र्यंबकेश्वरविवाहहृदयबुलढाणा लोकसभा मतदारसंघरमाबाई आंबेडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढासंख्या🡆 More