ओडिशा: भारतातील एक राज्य.

ओड़िशा (मराठी नामभेद: ओरिसा ; रोमन लिपी: Odisha) भारत देशाच्या २८ राज्यांपैकी एक राज्य आहे.

ओड़िशा भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या उत्तरेला असून त्याच्या दक्षिणेला व आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर, पूर्वेला व ईशान्य दिशेला पश्चिम बंगाल , उत्तरेला झारखंड, पश्चिमेला छत्तीसगढ, नैर्ऋत्येला तेलंगण आणि दक्षिणेला व नैर्ऋत्य दिशेस आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत. भुवनेश्वर ही ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. भुवनेश्वर आणि कटक ही जुळी शहरे आहेत. क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील ९व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. ओरिसाला ४८५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

ओड़िशा
ଓଡ଼ିଶା
भारताच्या नकाशावर ओड़िशाचे स्थान.
भारताच्या नकाशावर ओड़िशाचे स्थान.
भारताच्या नकाशावर ओड़िशाचे स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना १ एप्रिल इ.स. १९३६
राजधानी भुवनेश्वर
सर्वात मोठे शहर भुवनेश्वर आणि कटक
जिल्हे ३०
क्षेत्रफळ १,५५,७०७ चौ. किमी (६०,११९ चौ. मैल) (९ वा)
लोकसंख्या (२०११)
 - घनता
४,१९,४७,३५८ (११वा)
 - २७० /चौ. किमी (७०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
प्रशासन
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - विधीमंडळ (जागा)
 - उच्च न्यायालय

प्रो. गणेशलाल
नवीन पटनायक
ओडिशा विधानसभा (१४७)
ओडिशा उच्च न्यायालय
राज्यभाषा ओड़िया
आय.एस.ओ. कोड IN-OR
संकेतस्थळ: http://www.odisha.gov.in/

ओड़िशाची विविध नावे : उच्छल (बंगाली), उत्कल, उड्र देश, ओड्र, उडीशा, उडीसा, उड़़ीसा, ओडिसा, ओड़िशा, ओडिशा, ओढिया, ओदिशा, Odisha, Orissa

पुरी, ओड़िशा येथील जगन्नाथ मंदिर, कोणार्क येथील सूर्य मंदिर इत्यादी जगप्रसिद्ध सांस्कृतिक स्थाने असलेल्या ओडिशामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचे अनेक ठसे आढळतात. कोणार्कच्या सूर्यमंदिराजवळ पुराणामध्ये वर्णन केलेली चंद्रभागा नदी होती. आता तेथे चंद्रभागा पुळण आहे.

इतिहास व प्राचीनत्व

ऐतिहासिक काळात ओड़िशा कलिंग साम्राज्याचा भाग होता. इ.स.पूर्व २६१ मध्ये सम्राट अशोकने कलिंगवर आक्रमण केले. त्याची परिणती कलिंगच्या युद्धात झाली. ऋग्वेदात उल्लेख आलेल्या कक्षीवान ऋषी हा कलिंग देशाच्या राणीच्या दासीचा पुत्र होता. महाभारतात कलिंगाचे स्थान आर्यावर्ताच्या पूर्वेस असल्याचे सांगितले आहे. महाभारतातील अर्जुन कलिंगच्या तीर्थयात्रेला गेला होता. कर्णाने व कृष्णाने या प्रदेशावर स्वारी केली होती. परशुरामानेही कलिंग जिंकला होता. इतिहासावरून असे दिसते की मौर्य साम्राज्याच्या स्थापनेपूर्वी हे एक प्रबळ राज्य होते.

भूगोल

ओड़िशा हे भरपूर खनिज संपत्ती असलेले राज्य आहे. छोटा नागपूरचे पठार व पूर्व घाट या राज्यात एकत्र येतात आणि या दोहोंतील खडकांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ओडिशामध्ये मोठय़ा प्रमाणावर खनिजे मिळतात

चतुःसीमा

ओड़िशाच्या पूर्वेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस आंध्र प्रदेश, पश्चिमेस छत्तीसगढ तर उत्तरेस झारखंड ही राज्ये आहेत.

जिल्हे

यावरील विस्तृत लेख पहा - ओरिसामधील जिल्हे.

ओड़िशा राज्यात ३० जिल्हे नावे आहेत.

प्रमुख शहरे

क्रम नाव जिल्हा लोकसंख्या (२०११)
1 भुवनेश्वर खोर्दा जिल्हा 881,988
2 कटक कटक जिल्हा 658,986
3 रुरकेला सुंदरगढ जिल्हा 552,970
4 ब्रह्मपूर गंजम जिल्हा 355,823
5 संबलपूर संबलपुर जिल्हा 269,575
6 पुरी, ओड़िशा पुरी जिल्हा 201,026
7 बालेश्वर बालेश्वर जिल्हा 177,557
8 भद्रक भद्रक जिल्हा 129,152
9 बारीपाडा मयूरभंज जिल्हा 116,874
10 झारसुगुडा झारसुगुडा जिल्हा 97,730

औद्योगिकीकरण व सामाजिक विरोध

तत्कालीन ओड़िशातील (आताच्या झारखंड मधील) जमशेदपूर येथे पहिला स्वदेशी पोलाद कारखाना स्थापन झाला, आणि या भागातील खनिज संपत्तीमुळे या प्रदेशांचे मोठ्या प्रमाणात उद्योगीकरण झाले. मात्र गेल्या ६० वर्षांत विकास प्रकल्पांसाठी सुमारे ६ कोटी ग्रामस्थांनी आपली घरे, जमिनी गमावल्या. त्यापैकी वीस लक्ष ग्रामस्थ एकट्या ओडिशातील आहेत. विकास प्रकल्पांतून स्थानिकांना लाभ मिळत नसल्याचा अनुभव त्यांनी जवळपास सहा दशके घेतला आहे. त्यातून शहाणे झालेले स्थानिक आता येऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध करत आहेत.

Tags:

ओडिशा इतिहास व प्राचीनत्वओडिशा भूगोलओडिशा औद्योगिकीकरण व सामाजिक विरोधओडिशा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठाकरचंद्रपोक्सो कायदासंस्‍कृत भाषामहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)महाराष्ट्रातील किल्लेपोवाडाअहिल्याबाई होळकरमहाड सत्याग्रहभारतातील जागतिक वारसा स्थानेलता मंगेशकरप्रार्थना समाजमुलाखतभिवंडी लोकसभा मतदारसंघयकृतवायू प्रदूषणजागतिकीकरणनृत्यअष्टांगिक मार्गमराठी भाषा दिनभारतातील शेती पद्धतीविराट कोहलीजिल्हाधिकारीमहाभियोगकीर्तनविजय शिवतारेमाहिती तंत्रज्ञानकळसूबाई शिखरभारतातील पर्यटनघुबडप्राजक्ता माळीसचिन तेंडुलकरजंगली महाराजमहाराष्ट्रातील आरक्षणनाशिकशब्दजय श्री रामहळदभारताच्या पंतप्रधानांची यादीनिबंधतुळजाभवानी मंदिरपर्यावरणशास्त्रमनुस्मृती दहन दिनमूकनायकवेदांगअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९पी.टी. उषापुणे जिल्हाबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरराजपत्रित अधिकारीकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघकोरफडरत्‍नागिरीभारताचे राष्ट्रपतीभारतातील समाजसुधारकअश्वत्थामाजळगाव लोकसभा मतदारसंघअमरावती विधानसभा मतदारसंघतरंगन्यायालयीन सक्रियताराजाराम भोसलेजेजुरीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हमहाराष्ट्राचा भूगोलभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याएकादशीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेकापूसमहाराष्ट्रातील खासदारांची यादीपानिपतची तिसरी लढाईमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीकालिदासस्त्रीवादरत्‍नागिरी जिल्हाबाबासाहेब आंबेडकर🡆 More