उगादी

उगादी (तेलुगु: ఉగాది (उगादि), कन्नड: ಯುಗಾದಿ (युगादि)) हा आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाण राज्यात साजरा होणारा नववर्ष सण आहे.

हिंदू चांद्र कालगणनेशी संबंधित हा सण सामान्यतः मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा म्हणतात.

प्राचीनता

मध्ययुगीन ग्रंथांमधे या सणाचे उल्लेख सापडतात. या दिवशी मंदिरांना देणगी देण्याचे किंवा सामाजिक उपक्रमांना दान देण्याचे संदर्भ सापडतात.

शब्दाचा अर्थ

उगादी या शद्बात युग असा शब्द आहे. युग म्हणजे नवे युग किंवा शक किंवा कालखंड. नव्या वर्षाची सुरुवात असा याचा अर्थ आहे.

उत्सवाचे स्वरूप

उगादी 
उगादी पूजा तयारी आणि पचडीचा नैवेद्य

आठवडाभर आधी या सणाची पूर्वतयारी सुरू होते. घराची आणि अंगणाची स्वच्छता केली जाते.नववर्ष स्वागतासाठी दरवाजावर तोरण बांधतात. दारापुढे रांगोळी काढतात.सृष्टी निर्माण करणा-या ब्रह्मदेवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते.नवीन कपड्यांची खरेदी, भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. सकाळी अभ्यंगस्नान करतात. गरीबांना दान देतात..स्वयंपाकात पचडी (कोशिंबीर) करतात. काहीजण मंदिरात जाऊन देवदर्शन घेतात. पचडी या पदार्थात गोड, आंबट, तिखट अशा सर्व चवींचे एकत्रित मिश्रण असते. चिंच, कडुनिंबाची पाने, गूळ, मीठ, कैरी घालून हा पदार्थ तयार केला जातो. येणाऱ्याया कडू गोड आठवणींचे स्मरण रहावे ही यामागील प्रतिकात्मकता आहे असे मानले जाते. कर्नाटकात नवीन वर्षाचे पंचांगश्रवण करण्याची पद्धती आहे.

शुभेच्छा

युगादी हब्बडा शुभाष्यगलु(ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು)होस वर्षदा शुभाष्यगलु( ಹೊಸ ವರ್ಷದ ಶುಭಾಶಯಗಳು) अशा कर्नाटकात शुभेच्छा देतात. तेलग मधे नूतन संवत्सर शुभाकांक्षलु (నూతన సంవత్సర శుభాకాంక్షలు)अशा शुभेच्छा देतात. [ संदर्भ हवा ]

विशेष पदार्थ

या सणाच्या निमित्ताने आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधे भक्षालू पुरणपोळीसारखा पदार्थ करतात. तो तुपाबरोबर खातात. कर्नाटकात बोब्बाटू नावाचा विशेष पदार्थ करतात. पुरणपोळीशी साम्य असणारा हा पदार्थ दूध,तूप किंवा नारळाच्या दुधासह खातात.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

उगादी प्राचीनताउगादी शब्दाचा अर्थउगादी उत्सवाचे स्वरूपउगादी शुभेच्छाउगादी विशेष पदार्थउगादी हे सुद्धा पहाउगादी संदर्भउगादीआंध्र प्रदेशएप्रिलकर्नाटकगुढीपाडवातेलंगणामार्च

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवसेनानामदेवमराठी भाषाप्रीमियर लीगनाशिक लोकसभा मतदारसंघहार्दिक पंड्यासंदिपान भुमरेराजपत्रित अधिकारीभारतातील जिल्ह्यांची यादीऔद्योगिक क्रांतीकृष्णा नदीमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील लोककलाहिंदू लग्नमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सातवाहन साम्राज्यराशीपुस्तकचोखामेळातानाजी मालुसरेबीड विधानसभा मतदारसंघसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमहाराष्ट्रखंडोबासंयुक्त महाराष्ट्र चळवळनिलेश लंकेपुणेकावीळयूट्यूबज्ञानेश्वरथोरले बाजीराव पेशवेबसवेश्वरतुकडोजी महाराजबुलढाणा लोकसभा मतदारसंघविनोबा भावेरामायणह्या गोजिरवाण्या घरातस्वामी समर्थआंतरराष्ट्रीय नाणेनिधीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीलावणीसामाजिक कार्यभारतीय संविधानाचे कलम ३७०फकिराआकाशवाणीवल्लभभाई पटेलपु.ल. देशपांडेछावा (कादंबरी)रामरक्षाभारतातील जागतिक वारसा स्थानेमहाराष्ट्रातील राजकारणप्रहार जनशक्ती पक्षलोकसभापारू (मालिका)समाजशास्त्रजळगाव लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीसम्राट अशोकसर्वनामहातकणंगले लोकसभा मतदारसंघरक्षा खडसेपळसरायगड जिल्हानेतृत्वतिवसा विधानसभा मतदारसंघकापूसपांढर्‍या रक्त पेशीमहादेव जानकरअजिंक्य रहाणेमृत्युंजय (कादंबरी)अर्जुन पुरस्कारखासदारविरामचिन्हेहळदविनयभंगक्रांतिकारकविंचू🡆 More