आनंद यादव: भारतीय मराठी लेखक

आनंद यादव (जन्म : कागल, ३० नोव्हेंबर १९३५; - पुणे, २७ नोव्हेंबर २०१६) हे मराठी लेखक होते.

काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.

आनंद यादव
जन्म नाव आनंद रतन यादव
जन्म ३० नोव्हेंबर १९३५
कागल ,कोल्हापूर, महाराष्ट्र
मृत्यू २७ नोव्हेंबर २०१६
पुणे
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती झोंबी

जीवन

आनंद यादव यांनी कोल्हापूरपुणे येथून आपले शिक्षण पूर्ण केले‌. आकाशवाणीवर त्यांनी काही काळ नोकरी केली. पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून नियुक्ती झाल्यावर तेथेच मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. लेखनातूनही निवृत्ती घेण्याचा इरादा त्यांनी २९ एप्रिल २०१३ रोजी बोलून दाखविला होता.

यादव हे मराठीतील महत्त्वाचे ग्रामीण कांदबरीकार होते.

आनंद यादवांच्या कन्या डाॅ. कीर्ती मुळीक ह्याही लेखिका आहेत.

पुरस्कार

त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी इ.स. १९९०मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

संतसूर्य तुकाराम

आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या संतसूर्य तुकाराम या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी हल्लाबोळ करून त्यांना २००९ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यापासून वंचित केले. कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतरदेखील वारकऱ्यांचे समाधान झाले नाही. अखेर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली.

वारकऱ्यांनी आनंद यादव यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली. आनंद यादव, पुस्तकाचे प्रकाशक व मुद्रक यांची पोलिसांनी जामिनावर सुटका केली. यादव मृत्यूपर्यंत जामिनावर होते.

प्रकाशित साहित्य

आनंद यादव यांनी सुमारे ४०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे प्रकाशित झालेले काही साहित्य पुढीलप्रमाणे-

काव्यसंग्रह

  • मळ्याची माती १९७८
  • मायलेकरं (दी‍र्घकविता) १९८१
  • हिरवे जग १९६०

कथासंग्रह

  • आदिताल १९८०
  • उखडलेली झाडे १९८६
  • खळाळ १९६७
  • झाडवाटा
  • घरजावई (विनोदी)१९७४
  • डवरणी) १९८२
  • भूमिकन्या (कथासंग्रह)
  • माळावरची मैना १९७६
  • शॆवटची लढाई (विनोदी कथासंग्रह)

व्यक्तिचित्रे

  • मातीखालची माती (१९६५)

ललित, वैचारिक लेख संग्रह/समीक्षा ग्रंथ

  • आत्मचरित्र मीमांसा
  • १९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह
  • ग्रामसंस्कृती
  • ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव
  • ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या
  • पाणभवरे (१९८२)
  • मराठी लघुनिबंधाचा इतिहास
  • मराठी साहित्य : समाज आणि संस्कृती
  • साहित्याची निर्मिति प्रक्रिया
  • साहित्यिक जडण - घडण
  • साहित्यिकाचा गाव
  • स्पर्शकमळे (१९७८)

कादंबऱ्या

  • एकलकोंडा १९८०
  • कलेचे कातडे
  • गोतावळा १९७१
  • नटरंग (पुस्तक) १९८०. या कादंबरीवर त्याच नावाचा मराठी चित्रपट निघाला.
  • माऊली १९८५
  • संतसूर्य तुकाराम

आत्मचरित्रात्मक

बालसाहित्य

  • उगवती मने
  • सैनिकहो तुमच्यासाठी

Tags:

आनंद यादव जीवनआनंद यादव पुरस्कारआनंद यादव संतसूर्य तुकारामआनंद यादव प्रकाशित साहित्यआनंद यादव काव्यसंग्रहआनंद यादव कथासंग्रहआनंद यादव व्यक्तिचित्रेआनंद यादव ललित, वैचारिक लेख संग्रहसमीक्षा ग्रंथआनंद यादव कादंबऱ्याआनंद यादव आत्मचरित्रात्मकआनंद यादव बालसाहित्यआनंद यादवकथाकागलकादंबरीग्रामीण साहित्य संमेलनमराठीललितलेखकसमरसता साहित्य संमेलनसमीक्षा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

धाराशिव जिल्हाआर.डी. शर्माभारताच्या सरन्यायाधीशांची यादीसुतकढेकूणचोखामेळास्वतंत्र मजूर पक्षधनगरसोलापूरमनुस्मृती दहन दिनशुद्धलेखनाचे नियममनुस्मृतीबँकअथर्ववेदघनसावंगी विधानसभा मतदारसंघआणीबाणी (भारत)दादासाहेब फाळके पुरस्कारतुळजाभवानीअमित शाहमानवी शरीरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाभारतातील राजकीय पक्षवाळाशाबरी विद्या व नवनांथसुषमा अंधारेरवींद्रनाथ टागोरगोदावरी नदीपंढरपूरभूतमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीयोनीसुभाषचंद्र बोसपानिपतची तिसरी लढाईनवरी मिळे हिटलरलाहॉकीपरभणी जिल्हाज्ञानेश्वरीलोकमतभारताचे राष्ट्रपतीबुलढाणा विधानसभा मतदारसंघशब्द सिद्धीरामनवमीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)आयुर्वेदसातारा लोकसभा मतदारसंघनागपूररामलातूर लोकसभा मतदारसंघकर्ण (महाभारत)भारतीय संस्कृतीगुप्त साम्राज्यराष्ट्रवादी काँग्रेस पक्षशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीपावनखिंडमराठा घराणी व राज्येमतदानदीपक सखाराम कुलकर्णीपारनेर विधानसभा मतदारसंघटरबूजकामसूत्रविराट कोहलीमूळव्याधसिंधुदुर्गमहेंद्र सिंह धोनीभोकरअजिंठा लेणीमण्याररतन टाटासर्वनामसांगली लोकसभा मतदारसंघअक्षय्य तृतीयासंत जनाबाईहृदयमाढा लोकसभा मतदारसंघपंचशीलमराठी साहित्य🡆 More