अमोल पालेकर: अभिनेता

अमोल कमलाकर पालेकर (२४ नोव्हेंबर, इ.स.

१९४४">इ.स. १९४४; मुंबई, ब्रिटिश भारत - हयात ) हे मराठी चित्रपटसृष्टीतीलहिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार आहेत.

अमोल पालेकर
अमोल पालेकर: वैयक्तिक जीवन, अमोल पालेकरांनी भूमिका केलेली  नाटके, अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेले किंवा निर्मिती केलेले चित्रपट
जन्म अमोल कमलाकर पालेकर
२४ नोव्हेंबर, इ.स. १९४४
मुंबई, ब्रिटिश भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन
कारकीर्दीचा काळ इ.स. १९७१ -आजपर्यंत
भाषा मातृभाषा: मराठी
अभिनय: मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट गोलमाल (हिंदी चित्रपट), रजनीगंधा
पुरस्कार फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार (इ.स. १९७९)
वडील कमलाकर पालेकर
आई सुहासिनी पालेकर
पत्नी संध्या गोखले
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

पालेकर यांनी सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मराठी प्रयोगात्मक नाटकात रंगभूमीवर पदार्पण केले आणि नंतर "अनिकेत" या नावाची स्वतःची नाट्यसंस्था १९७२ मध्ये सुरू केली. त्यांनी चित्रपटातील अभिनयाची सुरुवात इ.स. १९७१ सालच्या शांतता! कोर्ट चालू आहे या सत्यदेव दुबे दिग्दर्शित मराठी चित्रपटातून केली. या चित्रपटापसून नवीन मराठी चित्रपट चळवळ सुरू झाली असे समजले जाते. इ.स. १९७४ मध्ये अमोल पालेकर यांनी बासू चॅटर्जी यांच्या रजनीगंधा आणि छोटीसी बात या कमी खर्चात केलेल्या पण गाजलेल्या चित्रपटांत काम केले. यातूनच आणखी विनोदी चित्रपटांतून त्यांना "मध्यमवर्गीय" माणसाच्या भूमिका मिळत गेल्या. नरम गरम, गोलमाल हे असे चित्रपट आहेत.

गोलमाल चित्रपटासाठी त्यांना इ.स. १९७९ मध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला. इ.स. १९८२ मध्ये त्यांनी ओलंगल या मल्याळम चित्रपटात रवीची भूमिका केली, नंतर हा चित्रपट हिंदीत मासूम नावाने करण्यात आला.

मराठी चित्रपट आक्रीत पासून अमोल पालेकर यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहेली हा चित्रपट इ.स. २००६ मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे अधिकृतरीत्या पाठविण्यात आला. पण तो अखेरच्या नामांकनांपर्यंत पोचला नाही.

मराठी बरोबरच कानडी, बंगाली, मल्याळम या भाषांतील अमोल पालेकर यांच्या चित्रपटांना समीक्षकांनी वाखाणले आहे. दिग्दर्शक म्हणून त्यानी स्त्रियांचे चित्रण अधिक संवेदनशीलपणे केले. भारतीय साहित्यातील अभिजात कथांवर त्याचे काही चित्रपट आधारलेले आहेत. अमोल पालेकर यांच्या चित्रपटांतून आधुनिक दृष्टिकोन असतो.

त्यांनी आपला आवाज टीच एड्स या समाजसेवी संस्थेने तयार केलेल्या एड्ससाठीच्या शैक्षणिक संगणकप्रणालीत वापरला आहे.

वैयक्तिक जीवन

अमोल पालेकर हे मुंबईतील कमलाकर आणि सुहासिनी पालेकर यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. त्यांचे वडील पोस्टात काम करत असत, आणि आई खाजगी कंपनीत काम करत होती. त्यांच्या निलू, रेखा आणि उन्नती या तीन बहिणी आहेत. अमोल पालेकर हे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सचे विद्यार्थी होते. त्यांच्या रेखाटनांचे आणि चित्रांचे मुंबईत प्रदर्शन करण्यात आले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी चित्रा यांच्यापासून विभक्त झाल्यावर त्यांनी संध्या गोखले यांच्याशी दुसरे लग्न केले आहे पालेकर स्वतःला देवाच्या बाबतीत अनभिज्ञ मानतात..

अमोल पालेकरांनी भूमिका केलेली नाटके

मराठी:

  • अवध्य
  • आपलं बुवा असं आहे
  • काळा वजीर पांढरा घोडा
  • गार्बो
  • गोची
  • पार्टी
  • पुनश्च हरि ॐ
  • मी राव जगदेव मार्तंड
  • मुखवटे
  • राशोमान
  • वासनाकांड

हिंदी :

  • आधे अधुरे
  • चूप कोर्ट चालू है
  • पगला घोडा
  • सुनो जनमेजय
  • हयवदन

अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेले किंवा निर्मिती केलेले चित्रपट

  • आक्रीत (मराठी)
  • थोडासा रूमानी हो जाय (हिंदी)
  • धूसर(मराठी)
  • ध्यासपर्व
  • पहेली (हिंदी)

मानसन्मान

पुरस्कार

रंगभूमीसाठी योगदान

अमोल पालेकर यांनी प्रायोगिक रंगभूमीसाठीच आपले बरेचसे योगदान दिले. व्यावसायिक रंगभूमीवर ते फारसे रमले नाहीत. त्यामुळे पालेकरांनी व्यावसायिक रंगभूमीवर फार कमी नाटके केली. आपलं बुवा असं आहे, मुखवटे, मी राव जगदेव मार्तंड ही त्यांची नाटके गाजली. दामू केंकरेंबरोबर काम करण्यासाठी आणि अनिकेत या त्यांच्या नाट्यसंस्थेला झालेले कर्ज फेडण्यासाठी पालेकरांनी आपलं बुवा असं आहे हे नाटक केले. मराठी रंगभूमीसाठी त्यांनी बादल सरकार महोत्सव, विजय तेंडुलकर महोत्सव यासारखे महोत्सवही भरवले.

चित्रपटसृष्टीतील योगदान

हिंदी चित्रपटांतील दमदार कारकीर्द

बासु चॅटर्जी यांच्या 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रजनीगंधा’ या चित्रपटाद्वारे अमोल पालेकर यांनी हिंदी मनोरंजन विश्वात प्रवेश केला. त्याचा ‘रजनीगंधा’ हा चित्रपट हिट ठरला आणि मग त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अभिनेता म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीला ‘चित्तचोर’, ‘घरौंदा’, ‘मेरी बीवीकी शादी’, ‘बातो-बातो में’, ‘गोलमाल’, ‘नरम-गरम’, ‘श्रीमान श्रीमती’ यासारखे अनेक संस्मरणीय चित्रपट दिले आहेत. बहुतेक चित्रपटांमध्ये ते मध्यमवर्गीय समाजातील नायकांचे प्रतिनिधित्व करताना दिसले.

दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून

  • ’वी आर ऑन..होऊन जाऊ द्या’ या नावाचा एक हलकाफुलका विनोदी मराठी चित्रपट अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. त्या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सतीश आळेकर, आनंद इंगळे, विजय केंकरे, वंदना गुप्ते, मनोज जोशी, सुहासिनी परांजपे, दिलीप प्रभावळकर, रमेश भाटकर, उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री आणि अशोक सराफ, निवेदिता सराफ, यांच्या सारखे २० प्रसिद्ध मराठी कलावंत काम करीत आहेत. पटकथा, सहदिग्दर्शन आणि निर्मिती पालेकरांच्या पत्नी संध्या गोखले यांची आहे.

अभिनेता म्हणून

वर्ष/साल चित्रपट भूमिका सह-कलाकार
इ.स. १९७४ रजनीगंधा संजय विद्या सिन्हा
इ.स. १९७५ छोटी सी बात अरुण विद्या सिन्हा, असराणी, अशोक कुमार
इ.स. १९७६ चितचोर विनोद झरीना वहाब
इ.स. १९७६ घरोंदा सुदीप झरीना वहाब
इ.स. १९७७ भूमिका केशव दळवी स्मिता पाटील, नसिरुद्दीन शाह, अनंत नाग
इ.स. १९७७ टॅक्सी टॅक्सी देव जाहिरा, रीना रॉय, अरुणा इराणी
इ.स. १९७८ दामाद रंजिता
इ.स. १९७९ बातों बातों में टोनी ब्रिगांझा टीना मुनीम, डेविड, असराणी
इ.स. १९७९ गोलमाल राम प्रसाद शर्मा /
लक्ष्मण प्रसाद शर्मा
बिंदिया गोस्वामी, उत्पल दत्त
इ.स. १९७९ दो लडके दोनों कडके हरी नवीन निश्चल
इ.स. १९७९ मेरी बीवी की शादी भगवंत कुमार बरतेंदू "भागू " रंजिता, अशोक सराफ
इ.स. १९८० 'ऑंचल किशन लाल राखी, राजेश खन्ना
इ.स. १९८० अपने पराये चंद्रनाथ शबाना आझमी, गिरीश कर्नाड, उत्पल दत्त
इ.स. १९८१ नरम गरम राम ईश्वर प्रसाद स्वरूप संपत, उत्पल दत्त, ए . के . हनगल
इ.स. १९८२ ओळंगळ (मल्याळी) रवी चाततान पूर्णिमा जयाराम, अदूर भासी
इ.स. १९८३ श्रीमान श्रीमती मधु गुप्ता संजीव कुमार, राखी, राकेश रोशन
इ.स. १९८३ रंग बिरंगी अजय शर्मा परवीन बाबी, फारूक शेख, दीप्ति नवल
इ.स. १९८४ तरंग राहुल स्मिता पाटील, श्रीराम लागू, गिरीश कर्नाड
इ.स. १९८४ आदमी और औरत माहुया रॉय चौधुरी , कल्याण चॅटर्जी
इ.स. १९८५ खामोश हिमसेल्फ नसिरुद्दीन शाह, शबाना आझमी
इ.स. १९८५ झुठी इन्स्पेक्टर कमाल नाथ रेखा, राज बब्बर
इ.स. १९८६ बात बन जाए येशवंतराव भोसले झीनत अमान, उत्पल दत्त
इ.स. १९९४ तीसरा कौन ? सी . के . कदम चंकी पांडे, सतीश शाह, राकेश बेदी
इ.स. २००१ अक्स द डिफेन्स मिनिस्टर अमिताभ बच्चन, रवीना टंडन, मनोज वाजपेयी
इ.स. २००९ समांतर (मराठी चित्रपट) केशव वझे शर्मिला टागोर, मकरंद देशपांडे

अन्य भाषेतील चित्रपट

  • मदर (बंगाली) (सहकलाकार - शर्मिला टागोर आणि दीपंकर डे )
  • कलंकिनी (बंगाली) (सहकलाकार - ममता शंकर, दिग्दर्शक - धीरेन गांगुली )
  • चेना अचेना (बंगाली) (सहकलाकार - तनुजा आणि सौमित्र चटर्जी )
  • कन्नेश्वर राम (कन्नड) (सहकलाकार - अनंत नाग आणि शबाना आझमी – दिग्दर्शक - एम .एस .साठ्यू )
  • पेपर बोट्स (कन्नड आणि इंग्रजी) (सहकलाकार-दीपा, दिग्दर्शक - पट्टाभिराम रेड्डी )
  • ओळंगळ (मल्याळम) (सहकलाकार - जयराम आणि अंबिका, दिग्दर्शक - बालू महेंद्र )

चित्रपटाच्या पडद्यावर गाजलेली गाणी(आवाज पार्श्वगायकाचा)

  • आजसे पहले आजसे ज्यादा
  • आनेवाला पल जानेवाला हैं
  • गोरी तेरा गॉंव बडा प्यारा
  • जब दीप जले आना
  • जानेमन, जानेमन
  • तुम्हें हो ना हो
  • तू जो मेरे सूर मे
  • दो दीवाने शहर में
  • रजनीगंधा फूल तुम्हारे
  • शाम रंग रंगा रे, हर पल मेरा रे
  • सपने में देखा सपना
  • सुनिये, कहिये

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

अमोल पालेकर वैयक्तिक जीवनअमोल पालेकर ांनी भूमिका केलेली नाटकेअमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेले किंवा निर्मिती केलेले चित्रपटअमोल पालेकर मानसन्मानअमोल पालेकर पुरस्कारअमोल पालेकर रंगभूमीसाठी योगदानअमोल पालेकर चित्रपटसृष्टीतील योगदानअमोल पालेकर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनअमोल पालेकर चित्रपटाच्या पडद्यावर गाजलेली गाणी(आवाज पार्श्वगायकाचा)अमोल पालेकर संदर्भअमोल पालेकर बाह्य दुवेअमोल पालेकरइ.स. १९४४ब्रिटिश भारतमराठी चित्रपटसृष्टीमुंबईहिंदी चित्रपटसृष्टी२४ नोव्हेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघहिंदू धर्मातील अंतिम विधीकर्ण (महाभारत)संवादिनीभारतीय संसदराष्ट्रवादी काँग्रेस पक्षअमरावती जिल्हाराज्यशास्त्रवर्णनात्मक भाषाशास्त्रराम सातपुतेबैलगाडा शर्यतशिवउंबरकृष्णमतदानपर्यटनशांता शेळकेमुंजराधानगरी वन्यजीव अभयारण्यवाचनलोकमान्य टिळकमहाराष्ट्र केसरीशेतीसावित्रीबाई फुलेभारताचा स्वातंत्र्यलढाजागतिक पुस्तक दिवसकोरेगावची लढाईकिरवंतजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)क्लिओपात्रापंचांगसमाजशास्त्रग्रामपंचायतपूर्व दिशाऊसभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीहरितगृह परिणामचैत्र पौर्णिमाजंगली महाराजकालभैरवाष्टकराजा राममोहन रॉयह्या गोजिरवाण्या घरातभारताची जनगणना २०११सकाळ (वृत्तपत्र)गालफुगीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्र विधानसभाभारतीय जनता पक्षकोल्हापूर जिल्हावर्धा लोकसभा मतदारसंघग्रंथालयजागतिक व्यापार संघटनाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९कोंडाजी फर्जंदमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमुंबई–नागपूर द्रुतगतीमार्गमहावीर जयंतीरेल डबा कारखानाए.पी.जे. अब्दुल कलामयकृतनक्षलवादसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेसंगणकाचा इतिहासमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)मुंजा (भूत)लोकसभाजवगुकेश डीमुख्यमंत्रीपाणीविजयसिंह मोहिते-पाटीलपन्हाळाबौद्ध धर्मचंद्रपूर लोकसभा मतदारसंघरावेर लोकसभा मतदारसंघजागतिकीकरणटोपणनावानुसार मराठी लेखक🡆 More