हरियाल

हरियाल (शास्त्रीय नाव: Treron phoenicoptera) हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा 'राज्यपक्षी' आहे.

याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. हा पक्षी दुर्मिळ झाला आहे. याचे शास्त्रीय नाव आहे ‘ट्रेरॉन फोनिकॉप्टेरा’.

हरियाल
पिवळ्या पायाची हरोळी
हरियाल
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: एव्हीज
वर्ग: कोलंबिफॉर्मेस
कुळ: कोलंबिडे
जातकुळी: Treron
जीव: T. phoenicoptera
शास्त्रीय नाव
T. phoenicoptera
ट्रेरॉन फोनिकॉप्टेरा
हरियाल
हरियाल पक्ष्याचे चित्र

वर्णन

हा कबुतरासारखा पक्षी आहे. तो पोपटासारखा हिरवागार असतो. त्याच्या शरीरावर जांभळ्या निळ्या रंगाचे मिश्रण असते. मान, छाती, पोट, पिवळे असते. पंख हिरवट राखी रंगाचे असतात. त्यांचे पाय व चोच पिवळी असते. खांद्यावर एक निळ्या रंगाचा ठिपका असतो. हरेलचे पाय व नख्या पोपटासारखे वेगळे असतात. त्याला पोटासारखे उलटे टांगून फळे खाता येतात.

आढळस्थान

हरेलचे थवे पावसाळी प्रदेशात दाट जंगलात असतात. तो मलबार, ओरिसा, विंध्य प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या प्रातांत आढळतो. हिमालयातही तो आढळतो. पण त्याला तिकडे कोकीळा म्हणतात. अंदमान निकोबार बेटात त्याची वेगळी जात आहे. पावसाळ्यात कोकणात पाऊस झाला म्हणजे ते देशावर येतात. त्या सुमारास देशावरील वड पिकतात. उलटे टांगून ते वडाची फळे खातात. दाट पानांच्या फांद्यावर बसले कि ते दिसत नाहीत. उडाले कि एकदम उडतात व जवळच्या झाडावर जाऊन बसतात. ते लांब शीळ घालतात. एक छोटा हरियलही आहे, त्याची छाती राखी रंगाची असते. पूर्व हिमालयाच्या ७००० फूट उंचीच्या जंगलात ते राहतात.

शिकार

या पक्षाची शिकार देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. गोड आदिवासी त्यांना हरियल म्हणतात. याचे मांस पांढरे असते व मांसाहारी लोकांना ते रुचकर लागते.

समज/अपसमज

हरेलबाबत एक उपसमज आहे. ते इतर पक्षी तळ्यातील, डबक्यातील, नदीतील पाणी पितात, तसे पीत नाहीत. तर पानांवर सकाळी सकाळी पडलेले दव चाटतात व त्याने तहान भागवतात. पण हे खरे नाही. काही जंगलात वाघाची टेहळणी करताना एक हरेलची जोडी तळ्याच्या काठावर उतरली व एकेकाने इतर पक्षी पितात तस पाणी प्यायलेले सर्वेक्षणात पहिले गेले आहे. समक्षच हे पाहिल्याने अपसमजाला आता जागा नाही.

शरीररचना

पाचू-कवडा नावाचे जे कबूतर आहे त्याच्या अंगावरील पाचूसारखी हिरवी झाक व पिवळ्या, निळ्या, जांभळ्या अशा कितीतरी रंगांच्या छटा हरियालाच्या अंगावर असतात.

संकीर्ण

हरियाल हा कबुतरासारखाच घुमतो. कधीकधी चिर्र... चिर्र... आवाज करत फिरतो. नर आणि मादी हरियल यांच्यात बाह्यतः फरक दिसत नाही. हा पक्षी आनंद सागर , शेगाव ,जिल्हा बुलढाणा येथे पण आढळतो.हा पक्षी यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा अभयारण्यात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर आढळतो.

आढळ

गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर जातीची झाडे. हे पक्षी नेहमी थव्यानेच उडतात. पक्षीनिरीक्षणांच्या वेळी हरियाल सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसल्याच्या नोंदी सापडतात. म्हणून या पक्ष्याला विहारासाठी सकाळ आवडत असावी असे दिसते.

वीण

विणीचा हंगाम मार्च ते जून महिने या कालावधीत असतो. या काळात उंच झाडावरच्या काड्यांनी बनलेल्या घरट्यांत हे पक्षी अंडी घालतात.

क्षेत्र

मध्यवर्ती भारतापासून ते उत्तरेकडील सर्व राज्यांत याचा वावर आहे. हा पक्षी महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, राजस्थान, पंजाबआसाम येथील अभयारण्यांतून दिसून येतो. तसेच पाकिस्तान आणि श्रीलंका येथेही हरियाल सापडतो.

धोका

वृक्षतोडीमुळे हरियाल पक्षी आपली मूळची वास्तव्याची ठिकाणे सोडून नवीन जागा शोधताना दिसतात. यांना अस्तित्वाचा धोका उत्पन्न झाला आहे. या पक्ष्यांची संख्या वाढवायची असेल तर त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांची जोपासना करणे आवश्यक आहे.

संदर्भ

Tags:

हरियाल वर्णनहरियाल आढळस्थानहरियाल शिकारहरियाल समजअपसमजहरियाल शरीररचनाहरियाल संकीर्णहरियाल आढळहरियाल वीणहरियाल क्षेत्रहरियाल धोकाहरियाल संदर्भहरियालमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाळपद्मसिंह बाजीराव पाटीलभाषालंकारमहात्मा गांधीजागतिक पुस्तक दिवसमावळ लोकसभा मतदारसंघभूकंपाच्या लहरीसोळा सोमवार व्रतयकृतभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेअहिल्याबाई होळकरअश्विनी एकबोटेबचत गटसंदिपान भुमरेजागतिक पर्यावरण दिनमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमराठी व्याकरणबासरीनक्षत्रनागपूरवणवाकृष्णकाळूबाईसमीक्षाकुत्राजिल्हाधिकारीभारतीय रेल्वेगजानन महाराजकादंबरीहरितक्रांतीभारताचे पंतप्रधानथोरले बाजीराव पेशवेभूगोलकोल्हापूर जिल्हासुभाषचंद्र बोसजलसिंचन पद्धतीपरभणी जिल्हापाणीस्त्री सक्षमीकरणधनुष्य व बाणगणपती स्तोत्रेबाळशास्त्री जांभेकरहिंदू लग्नकर्नाटकए.पी.जे. अब्दुल कलाममण्यारभारतीय अंतराळ संशोधन संस्थाचार वाणीकुळीथशाळायशवंतराव चव्हाणकन्या रासवसंतराव दादा पाटीलफणसविल्यम शेक्सपिअरभारतीय संविधानाची उद्देशिकाइंग्लंडद्वीपकल्पभारतीय संसदलातूर लोकसभा मतदारसंघतणावभारतरत्‍नमिठाचा सत्याग्रहशांता शेळकेप्रेरणासातारा लोकसभा मतदारसंघसमाजशास्त्रगोदावरी नदीअमित शाहअहवालशाश्वत विकासभारताची संविधान सभाकाळभैरवनारळकळसूबाई शिखरगोवामहाराष्ट्र विधानसभागूगल🡆 More