स्वाइन इन्फ्लुएन्झा

हा एक लेख स्वाईन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाईन फ्लू/स्वाईन फ्ल्यू असेही म्हटले जाते.

स्वाइन इन्फ्लुएन्झा
स्वाइन फ्लू रोगाची लक्षणे (याचे मराठीकरणात साहाय्य करा

आजाराची कारणे

स्वाईन इन्फ्लूएन्झा किंवा स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा ह्या रोगाचा एक प्रकार आहे ; हा सामान्यतः डुकरामध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. डुकरांमध्ये सतत वावरणाऱ्या माणसाला ह्या विषाणूची बाधा होऊ शकते. स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे, ार्थात तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसारित होऊ शकतो.

डुकराचे शिजवलेले मांस खाण्याचा या रोगाशी संबध नाही. त्या प्रमाणेच भारतात २००९ मधील स्वाइन इन्फ्लूएन्झाची साथसुद्धा भारतातील डुकरांमुळे आलेली नव्हती, तर ती अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील डुकरांपासून सुरू झालेली होती.

संसर्ग

स्वाईन फ्लू या रोगाचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे होतो. याचा संसर्ग माणसाद्वारे सुद्धा होतो. रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम वा त्याची थुंकी यांमधून या विषाणूंचा प्रसार होतो. स्वाईन फ्लूचे विषाणू हे हवेत साधारणतः 8 तास जीवंत राहतात.

आजाराची लक्षणे

ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची काही लक्षणे आहेत. टॅमी फ्ल्यू हे औषध एच-१ एन-१ च्या विषाणूच्या संसर्गावर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. या औषधाचा भारत सरकारकडे पुरेसा साठा असतो. तथापि, या औषधांचा वापर या विषाणूंचा संसर्ग झाल्याचे नक्की झाल्यावरच होणे आवश्यक आहे. या औषधास विषाणूंकडून प्रतिरोध निर्माण होऊ नये यासाठी शासन ही काळजी घेत असते.

टॅमी फ्ल्यू या गोळ्यांशिवाय , एन ९५, मास्क आणि सर्जिकल मास्क वगैरे वैयक्तिक संरक्षक साधनांचा पुरेसा साठा भारत सारकारकडे असतो. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तसेच बंदरांवर येणाऱ्या परदेशी प्रवाशांची तपासणी वैद्यकीय पथकांच्या साहाय्याने करण्यात येते. २०१४ साली हा आजार महाराष्ट्रातही आला असून पुणे-मुंबईमध्ये आणि नाशिक जिल्ह्यामधील चांदवड, निफाड व मनमाड येथेही या रोगाचे रुग्ण सापडले आहेत.

आजार कसा टाळावा ?

१. हात नेहमी साबण-पाण्याने धुवावेत.

२. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे.

३. स्वाईन फ्ल्यू रुग्णापासून किमान एक हात तरी दूर राहावे.

४. खोकताना- शिंकताना तोंडाला रुमाल लावावा.

५. भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी.

६. पौष्टिक आहार घ्यावा.

७. हस्तांदोलन करण्याचे अथवा आलिंगन देण्याचे, व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे.

८. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.

९. आजारी असल्यास शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवावा व घरीच विश्रांती घ्यावी.

१०. आहारात पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यावेत. . ११. तोंडावर मास्क लावावा.

उपचारानंतर दहा दिवसांत रुग्ण बरा होऊ शकतो.

रोग निदान, विषाणू तपासणी

स्वाईन फ्ल्यूचे प्राथमिक निदान लक्षणांवर आधारित आहे. निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा लागतो.रुग्णाच्या विषाणू तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), पुणेराष्ट्रीय संचारी रोग संस्था ("नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस'-एनआयसीडी), दिल्ली येथे प्रयोगशाळा तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे.

उपचार

कोणत्याही खासगी वैद्यकांना, खासगी डॉक्टरांना अथवा खासगी रुग्णालयांची स्वाईन फ्लूवर उपचार करण्याची क्षमता नसून, त्यांना तशी परवानगीही नाही. या रोगाचे उपचार राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष अथवा मान्यताप्राप्त शासकीय रुग्णालयातच उपलब्ध असतात, आणि तसे ते शासकीय रुग्णालयातूनच घेणे बंधनकारक आहे.जर एखादी व्यक्ती या रोगाने आजारी असेल, विषाणू प्रतिबंधक औषधे त्याचे आजार काही प्रमाणात कमी करू शकतात व त्यामुळे रोग्यास लवकर बरे वाटू शकते. लवकरात लवकर (लक्षणे दिसून आल्यावर दोन दिवसात) उपचार सुरू केल्यास, औषधांचा खूप फायदा होतो. विषाणू प्रतिबंधक लस घेण्याखेरीज घरात अथवा इस्पितळात पूरक देखभाल केल्यास ताप कमी होऊ शकतो तसेच यातना कमी होऊ शकतात. त्याप्रमाणेच, माध्यमिक संक्रमण व इतर आरोग्यविषयक समस्या ओळखू येतात.

प्रतिबंधक लस

या रोगाच्या विविध प्रकारांना प्रतिबंध करणाऱ्या विविध लसी उपलब्ध आहेत.
१५ सप्टेंबर २००९ला अमेरिकन एफडीए ने स्वाइन फ्ल्यूसाठी पहिली लस प्रामाणित केली.
ती घेतली की १० दिवसांत शरीरामध्ये प्रतिबंधक रसायने तयार होतात.
अध्ययनातून असे लक्षात आले की, या लसी परिणामकारक तसेच सुरक्षितही आहेत.स्कॉटलंडमध्ये (२५डिसेंबर२००९ पूर्वी) लस घेतलेल्या २,४८,००० लोकांचे सर्वेक्षण केल्यावर असे लक्षात आले की, ९५% लोकांवर तिचा परिणाम झाला आहे.

बाहेरील दुवे

PuneriSpeaks-मराठी

Tags:

स्वाइन इन्फ्लुएन्झा आजाराची कारणेस्वाइन इन्फ्लुएन्झा संसर्गस्वाइन इन्फ्लुएन्झा आजाराची लक्षणेस्वाइन इन्फ्लुएन्झा आजार कसा टाळावा ?स्वाइन इन्फ्लुएन्झा रोग निदान, विषाणू तपासणीस्वाइन इन्फ्लुएन्झा बाहेरील दुवेस्वाइन इन्फ्लुएन्झा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वणवानेतृत्वबाळशास्त्री जांभेकरचंद्रयान ३संयुक्त महाराष्ट्र चळवळयोनीमधुमेहमहाराष्ट्रातील पर्यटनयेसूबाई भोसलेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रपोवाडाआनंद शिंदेश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीराज्यपालशिवाजी महाराजांचा जीवनक्रमहिमालयस्त्री सक्षमीकरणहोमी भाभावसंतराव नाईकएकनाथनरसोबाची वाडीचक्रधरस्वामीमटकामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीकांजिण्यागोपाळ गणेश आगरकरगोंधळपुणे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीसूर्यमालाजास्वंदभूकंपाच्या लहरीतिरुपती बालाजीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेपुरंदर किल्लाॐ नमः शिवायसचिन तेंडुलकरशिखर शिंगणापूरवि.वा. शिरवाडकरविवाहअन्नप्राशनकल्याण (शहर)विठ्ठलचिकुनगुनियामांगधवल क्रांतीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेचंद्रपूर लोकसभा मतदारसंघसोनारमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीकादंबरीखरबूजनाचणीभगवानबाबानवग्रह स्तोत्रयशवंतराव चव्हाणहापूस आंबाहनुमान जयंती२०१९ लोकसभा निवडणुकादुसरे महायुद्धनवरत्‍नेसोनेछगन भुजबळबाराखडीईमेलवारली चित्रकलादशावतारप्रीमियर लीगनवनीत राणाबारामती विधानसभा मतदारसंघभौगोलिक माहिती प्रणालीराजगडबीड विधानसभा मतदारसंघमराठा आरक्षणमहाबळेश्वरगोरा कुंभारनारायण मेघाजी लोखंडेअमृता शेरगिल🡆 More