स्वमग्नता

स्वमग्नता हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो.

याचे पूर्ण नाव सायकोन्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असे आहे. इंग्रजीत त्याला ‘ऑटिझम’ म्हणतात. ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. स्वमग्नता वा ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही. याचा शोध लिओ केनर यांनी सन १९४३ मध्ये लावला. अशी व्यक्ती आपल्याच विश्‍वात आणि विचारात रममाण असतात. अशा व्यक्ती संवेदनांचे अर्थ लावू शकत नाहीत. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देता येत नाही. स्वमग्नता हे विकाराचे एक लक्षण आहे. परंतु हे एक लक्षण म्हणजे पूर्ण विकार असे म्हणता येणार नाही म्हणून ही गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे असे म्हणतात. कारण ऑटिज़्म होण्याचे काही एक कारण नाही. संशोधनानुसार ऑटिज़्म होण्याचे अनेक कारणे असू शकतात जसे की-

स्वमग्नता
वारंवार वस्तू स्टॅक करणे किंवा रांगेत ठेवणे सामान्यतः ऑटिझमशी संबंधित आहे.

मस्तिष्कच्या कार्यवाहीत असामान्यता होने, मस्तिष्कच्या रसायन मध्ये असामान्यता, जन्मा आधी बाळाचे विकास व्यवस्थित न होने इत्यादी. आत्मविमोहचे आनुवंशिक आधार

अन्य प्रस्तावित कारणांमध्ये, बालपणीचे टीकाकरण पण हे विवादास्पद आहे आणि याचे काही वैज्ञानिक दाखले पण नाहीत. सध्याच्या समीक्षणात अनुमान आहे की प्रति 1000 लोकांमागे २ मामले आत्मविमोहचे असतात जेव्हा की ही संख्या ASD साठी 6/1000च्या जवळपास आहे. सुमारे ASDचे पुरुष:महिला अनुपात 4,3:1 आहे. 1980 पासुन आत्मविमोहच्या केसेस मध्ये नाटकीय रित्या वृद्धि झाली आहे.

लक्षणे

या मध्ये खालील लक्षणे दिसतात.

  • समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे न बघणे, नजरेला नजर न देणे.
  • दुसऱ्याकडे बघून स्मितहास्य न करणे.
  • भाषेचा विकास अतिशय विलंबाने वा अजिबात न होणे.
  • समोरच्याने बोललेलेच पुन्हा बोलणे.
  • स्वतःतच मग्न असणे.
  • संवादासाठी बोट दाखवणे, खाणाखुणा वापरणे, मान हलवून होकार-नकार देणे यांचा अभाव असणे.
  • दुसऱ्यांचे अनुकरण करता न येणे.
  • डोळ्यांची, हातांची विचित्र हालचाल करणे.
  • संपूर्ण वस्तूऐवजी तिच्या एखाद्या भागाकडेच बघत राहणे. (उदा. गाडीची फिरती चाके...)
  • फिरत्या वस्तूंकडे (पंखा, चाके) एकटक पाहात बसणे किंवा वस्तू फिरवणे.
  • काल्पनिक खेळांत न रमणे.
  • मी व तू या सर्वनामांचा चुकीचा वापर करणे. (उदा. तू कुठे चाललास? उत्तर - तू घरी चालला.)
  • अन्य व्यक्तींचे विचार, माहिती, भावना वेगळ्या असू शकतात हे माहीत नसणे.
  • मैत्री करता न येणे.
  • एकट्यानेच तोच- तोच खेळ खेळत राहणे.
  • परिस्थितीत बदल झाल्यास अस्वस्थ होणे.
  • एखादी गोष्ट पसंत नसल्यास रडून गोंधळ घालणे.
  • एकाच गोष्टीत नको इतका रस दिसतो.
  • सामान्य ज्ञान कमालीचे तोकडे असणे.
  • अतिक्रियाशील वा अतिमंद असणे.
  • प्रकाश, आवाज, स्पर्श, वास व चव यांबाबत कमालीचे संवेदनशील असणे.
  • भिंतींवर, कपाटांवर डोके- कपाळ घासण्यासारख्या कृती करणे.
  • वस्तूंचा वास घेणे, चाटणे.
  • वेदना झाल्यास तसा प्रतिसाद न देणे.
  • परिचित व्यक्तीनेही जवळ घेतल्यास, मिठी मारल्यास विरोध दर्शवणे.

वरील पैकी केवळ दोन-चार लक्षणे असल्यास ऑटिझम आहे असे म्हणता येणार नाही. तसेच ही सर्व लक्षणे प्रत्येक मुलात आढळतातच असेही नाही. मात्र, यापैकी अनेक लक्षणे दिसू शकतात.

ऑटिझमचे वर्गीकरण

  1. स्टीरिओटाईप
  2. कंपल्सिव्ह
  3. रिच्युअलिस्टीक
  4. रिस्ट्रीक्टेड

निदान

मनोविकारतज्ञ किंवा बालरोग तज्ज्ञाचा सल्ला यासाठी घेतला पाहिजे.

जागरूकता

२ एप्रिल हा जागतिक स्वमग्नता जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो.

बाह्य दुवे

Tags:

स्वमग्नता लक्षणेस्वमग्नता ऑटिझमचे वर्गीकरणस्वमग्नता निदानस्वमग्नता जागरूकतास्वमग्नता बाह्य दुवेस्वमग्नतामनोविकार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नागपूरतिरुपती बालाजीशीत युद्धसविता आंबेडकरचंद्रमौर्य साम्राज्यपृथ्वीपाथरी विधानसभा मतदारसंघकरवंदवर्णरायगड लोकसभा मतदारसंघप्रल्हाद केशव अत्रेॐ नमः शिवायमहाराष्ट्रसंभाजी भोसलेविंचूदेवेंद्र फडणवीसदीपक सखाराम कुलकर्णीसिंधुदुर्गवंजारीमूलद्रव्यमुंजनाटकबहावाशिवाजी महाराजांचा जीवनक्रमसर्वनामनांदेडभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीप्राथमिक आरोग्य केंद्रज्योतिषसेवालाल महाराजयकृतसंगीतप्रज्ञा विवर्धन स्तोत्रगोंधळपार्वतीगंगा नदीविधानसभाअर्थशास्त्रगोत्रचैत्रगौरीआनंदवनभारतीय राष्ट्रीय काँग्रेसआणीबाणी (भारत)अन्नप्राशनमहारशेतीसमर्थ रामदास स्वामीसुजात आंबेडकरकृष्णवारली चित्रकलासोळा संस्कारतुळजापूरव्हॉट्सॲपमनुस्मृतीसूर्यनमस्कारक्रिकबझअर्जुन पुरस्काररोहित शर्मामाती प्रदूषणमासाभारताच्या राष्ट्रपतींची यादीकळंब वृक्षसांगली लोकसभा मतदारसंघभारतातील समाजसुधारकशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तपावनखिंडताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पआचारसंहितायोगासनऋतुराज गायकवाडहरितक्रांतीप्राजक्ता माळीहनुमान जयंतीगजानन दिगंबर माडगूळकरराम🡆 More