सुषमा स्वराज: भारतीय राजकारणी

सुषमा स्वराज कौशल (जन्म : अंबाला, १४ फेब्रुवारी १९५२; - नवी दिल्ली, ६ ऑगस्ट २०१९) ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील व भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या होत्या.

त्या २६ मे २०१४ पासून ते २०१९पर्यंत भारताच्या परराष्ट्र मंत्री होत्या; इंदिरा गांधीनंतर हे पद घेणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या. त्या संसदेच्या सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या होत्या. १९७७ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी त्या भारताच्या उत्तरेकडील राज्य असणाऱ्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या.  त्यांनी १३ ऑक्टोबर १९९८ पासून ३ डिसेंबर १९९८ पर्यंत दिल्लीच्या ५ व्या मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या दिल्ली राज्यातील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ सालातील निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्या इ.स. २००० - २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे सांभाळली. त्या डिसेंबर इ.स. २००९ ते मे २०१४ दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या.

सुषमा स्वराज
सुषमा स्वराज: प्रारंभिक जीवन आणि शिक्षण, कारकीर्द, पुरस्कार

कार्यकाळ
२६ मे २०१४ – ३० मे २०१९
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील सलमान खुर्शीद
पुढील सुब्रह्मण्यम जयशंकर

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
१३ मे २००९ – २६ मे २०१४
मागील रामपाल सिंह
मतदारसंघ विदिशा

लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या
कार्यकाळ
२१ डिसेंबर २००९ – २६ मे २०१४
मागील लालकृष्ण अडवाणी
पुढील ठरायचे आहे

कार्यकाळ
१३ ऑक्टोबर १९९८ – ३ डिसेंबर १९९८
मागील साहिब सिंह वर्मा
पुढील शीला दीक्षित

जन्म १४ फेब्रुवारी, १९५२ (1952-02-14) (वय: ७२)
नवी दिल्ली
मृत्यू ६ ऑगस्ट २०१९
नवी दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती स्वराज कौशल (१९७५)
अपत्ये बासुरी
गुरुकुल पंजाब विद्यापीठ
व्यवसाय वकील
धंदा राजकारणी
धर्म हिंदू

२०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या दुसऱ्यांदा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून ४,००,००० पेक्षा अधिक मतांच्या फरकाने जिंकून आल्या होत्या. २६ मे २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये ते परराष्ट्र मंत्री बनल्या. अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक वॉल स्ट्रीट जर्नलने स्वराज यांना भारताच्या 'आवडत्या राजकारणी' म्हणून निवडले.


AIIMS, नवी दिल्ली येथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, 6 ऑगस्ट 2019 रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने स्वराज यांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये त्यांना सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातील मरणोत्तर पद्मविभूषण, हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

सुषमा स्वराज किंवा चिंकू स्वराज (पूर्वाश्रमीच्या शर्मा) यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरियाणातील अंबाला कॅन्टोन्मेंट येथे हरदेव शर्मा आणि श्रीमती लक्ष्मी देवी यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख सदस्य होते. त्यांचे आई-वडील पाकिस्तानातील लाहोरच्या धरमपूर भागातून भारतात स्थायिक झाले आहेत. स्वराज यांचे शिक्षण अंबाला छावणीतील सनातन धर्म महाविद्यालयात झाले असून त्यांनी संस्कृत व राज्यशास्त्र हे विषय घेऊन पदवी प्राप्त केली. त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे कायद्याचा अभ्यास केला.

कारकीर्द

१९७३ मध्ये, स्वराज यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

पुरस्कार

इ.स. २०२०चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.

मृत्यू

६ ऑगस्ट २०१९ रोजी सुषमा स्वराज यांना संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आले, तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

संदर्भ

Tags:

सुषमा स्वराज प्रारंभिक जीवन आणि शिक्षणसुषमा स्वराज कारकीर्दसुषमा स्वराज पुरस्कारसुषमा स्वराज मृत्यूसुषमा स्वराज संदर्भसुषमा स्वराजअंबालाअटलबिहारी वाजपेयीइ.स. १९९६इ.स. १९९८इ.स. २००९इंदिरा गांधीडिसेंबरदक्षिण दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)दिल्लीनवी दिल्लीभारताचे परराष्ट्रमंत्रीभारताचे सर्वोच्च न्यायालयभारतीय जनता पक्षमध्य प्रदेशमुख्यमंत्रीलोकसभाविदिशा (लोकसभा मतदारसंघ)विधानसभासंसद भवनहरियाणा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उदयभान राठोडभारतातील सण व उत्सवमहारभारतीय संविधानाचे कलम ३७०बीड लोकसभा मतदारसंघयशवंतराव चव्हाणज्ञानेश्वरीरत्‍नागिरी जिल्हाशिवसेनालता मंगेशकर पुरस्कारशिवाजी महाराजांचा जीवनक्रमज्योतिर्लिंगशिर्डी लोकसभा मतदारसंघसईबाई भोसलेमहाराष्ट्र विधानसभाचंद्रपूर लोकसभा मतदारसंघक्रियापदगालफुगीकिरवंतसूर्य वंश (श्रीरामाची वंशावळी‌)महाराष्ट्राचा इतिहासमराठी व्याकरणहापूस आंबाभारतीय रेल्वेवाळाखाजगीकरणजिल्हाधिकारी२०२४ मधील भारतातील निवडणुकातापी नदीघोणसभारतातील जिल्ह्यांची यादीगुढीपाडवा३३ कोटी देवअमित शाहशाश्वत विकासपहिले महायुद्धइंदुरीकर महाराजराज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९जनमत चाचणीसातारा जिल्हाभारताचे सर्वोच्च न्यायालयसचिन तेंडुलकरफकिरारॉयल चॅलेंजर्स बंगलोरभीम जन्मभूमीरावेर लोकसभा मतदारसंघसदा सर्वदा योग तुझा घडावाभारतीय निवडणूक आयोगजवधुळे लोकसभा मतदारसंघकुषाण साम्राज्यभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीभूगोलतापमानमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागकुंभ रासअशोकाचे शिलालेखरक्तगटपाठ्यपुस्तकेभारत छोडो आंदोलनमुलाखतरशियासत्यजित तांबे पाटीलसातारा लोकसभा मतदारसंघनिवडणूकलोणार सरोवरटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीबुद्धिमत्ताहळददिवाळीकांशीरामराष्ट्रवादी काँग्रेस पक्षदिशाअजिंठा-वेरुळची लेणीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमराठा आरक्षणसिंधुदुर्गभारताचे उपराष्ट्रपती🡆 More