सहारा

सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे.

उत्तर आफ्रिका प्रदेशाचा जवळजवळ सर्व भाग सहाराने व्यापला आहे. सहाराचे एकूण क्षेत्रफळ ९० लाख वर्ग किमी इतके आहे. सहाराच्या पूर्वेला लाल समुद्र, उत्तरेला भूमध्य समुद्र व ॲटलास पर्वतरांग, पश्चिमेला अटलांटिक महासागर तर दक्षिणेला साहेल पट्टा आहे. सहाराच्या उत्तरेस माघरेब हा भौगोलिक प्रदेश स्थित आहे.

सहारा
सहारा वाळवंटाचे नासाच्या उपग्रहाने टिपलेले चित्र
सहारा
सहाराचा पश्चिम लिब्यातील एक भाग

सहारा वाळवंट साधारण ३० लाख वर्षांपुर्वी तयार झाले असावे असा अंदाज आहे. सहारा ह्या शब्दाचा अरबी भाषेमध्ये सर्वात भव्य वाळवंट असा अर्थ आहे.

प्राचीन काळी सहारा वाळवंट हे गवताळ होते. सहारा दर ४१००० वर्षांनी पृथ्वीच्या अक्षमुळे बदलते. पुढील बदल अजून १५००० वर्षांनी होणार आहे.

भूगोल

सहाराचे एकूण क्षेत्रफळ ९० लाख वर्ग किमी इतके आहे आणि अनेक उत्तर आफ्रिकन देशांचे बहुतांश भाग हे या वाळवंटाने व्यापले आहेत. आफ्रिकेच्या ३१% भागावर सहारा वाळवंट आहे. सहाराच्या उत्तरेला भूमध्य समुद्र असून तिथे उष्ण उन्हाळा व हलक्या प्रमाणात पाऊस पडतो. सहाराच्या दक्षिणेला सहेल नावाचा कोरडी विषुववृतिय सवाना प्रदेश आहे. सहारा वाळवंटाचे अनेक विभाग आहेत. उदा. तानेझरुफ्त,तेणेरे, लिबीयन वाळवंट,पूर्व वाळवंट. नूबीयन वाळवंट.

हवामान

सहारा हे जगातील सर्वात मोठे कमी उंचीवरील वाळवंट आहे. वातावरणातील उष्णता व त्याची स्थिरता पावसाला निश्रप्रभ बनवते.त्यामुळे येथील हवामान उष्ण व कोरडे बनवते. सर्वाधिक उष्ण भाग हा पूर्वेकडील लीबियन वाळवंटामध्ये येतो. हा भाग अटकामा वाळवंटाएवढा उष्ण मानला जातो.

भाषा आणि संस्कृती

सहारा वाळवंटात अनेक भाषा बोलल्या जातात. अरबी भाषा सगळ्यात जास्त प्रमाणात वापरली जाणारी भाषा आहे. येथे अनेक संस्कृती व वंशाचे लोक वास्तव्य करतात. अरब लोक जवळ जवळ सगळ्या सहारात राहतात. बर्बर लोक पश्चिम इजिप्तपासून मोरोक्को पर्यंत तसेच तुआरेग भागात आढळतात. बेजा लोक लाल समुद्राजवळच्या टेकाड प्रदेशात राहतात.

देश

सहारा वाळवंटाने साधारणपणे खालील देश व्यापले आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

सहारा भूगोलसहारा हवामानसहारा भाषा आणि संस्कृतीसहारा देशसहारा हे सुद्धा पहासहारा संदर्भसहाराअटलांटिक महासागरउत्तर आफ्रिकाभूमध्य समुद्रमाघरेबलाल समुद्रवाळवंटॲटलास पर्वतरांग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागदिवाळीपक्षांतरबंदी कायदा (भारत)ओमराजे निंबाळकरकुटुंबप्रल्हाद केशव अत्रेकाळूबाईविंचूचैत्रगौरीभारताच्या राष्ट्रपतींची यादीभगतसिंगगांडूळ खतसूर्यसोलापूरसदा सर्वदा योग तुझा घडावाधाराशिव जिल्हाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९रायगड जिल्हाबावीस प्रतिज्ञाअष्टांगिक मार्गनरेंद्र मोदीमराठाचेतासंस्थाआणीबाणी (भारत)उद्धव ठाकरेमाहिती अधिकारभारतरत्‍नकार्ल मार्क्सझाडमहाराष्ट्र गीतयेसूबाई भोसलेसीताकविताजयंत पाटीलपरभणी विधानसभा मतदारसंघअहवाल लेखनभारताची संविधान सभाधर्मनिरपेक्षतासोनेजिजाबाई शहाजी भोसलेमाद्रीरावेर लोकसभा मतदारसंघऔद्योगिक क्रांतीगालफुगीपाटीलउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघभूतसात बाराचा उताराडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारशेतकरीब्राझीलगोत्रमराठी संतजागतिक तापमानवाढकोकणशाहू महाराजभारतीय संस्कृतीपृथ्वीच्या अंतरंगाची रचनापेरु (फळ)श्रीमहाराष्ट्रवस्तू व सेवा कर (भारत)नितीन गडकरीआंतरराष्ट्रीय नाणेनिधीटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीरवींद्रनाथ टागोरमहाराष्ट्रातील किल्लेउद्योजककुत्रातुळजाभवानी मंदिरविधान परिषदक्रियाविशेषणव्हॉट्सॲपरामजया किशोरीसंख्याहिंद-आर्य भाषासमूह🡆 More