शीत युद्ध: अमेरिका आणि रशिया मधील युद्ध

शीतयुद्ध (१९४५ - १९९१) हा शब्द विसाव्या शतकातील लोकशाहीवादी पश्चिमात्य राष्ट्रांचा गट व सोव्हियत संघाच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट राष्ट्रांचा गट ह्यांदरम्यानच्या राजकीय व आर्थिक संघर्षाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो.

ह्या दोन गटांदरम्यान वास्तविक युद्ध कधीही झाले नाही तरी शीतयुद्धामधील मोठ्या काळासाठी जगातील ह्या महासत्तांमध्ये राजकीय व लष्करी तणावाचे वातावरण होते.

शीतयुद्ध
शीतयुद्ध नकाशा १९५९
साम्यवाद
शीत युद्ध: राजकीय, विचार प्रणाली, आर्थिक

मॅनिफेस्टो
मार्क्स · लेनिन

कम्युनिस्ट पक्ष
भाकप · माकप

देशात
सोवियत संघ
चीन
क्युबा
व्हियेतनाम
उत्तर कोरिया
लाओस

राजकीय

आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर राजकीय प्रभाव ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न हा पहिला पैलू होता. सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली पूर्व जर्मनी,पोलंड,चेकोस्लोव्हाकिया,हंगेरी, रुमानिया,बल्गेरिया आणि आल्बेनिया हे देश होते,तर नेदरलँड्स,डेन्मार्क, बेल्जियम,पश्चिम जर्मनी, फ्रान्स,इटली,स्पेन, ग्रीस आणि युनायटेड किंग्डम हे अमेरिकेच्या प्रभावाखाली होते.अमेरिका व सोव्हिएत रशिया दरम्यान संघर्ष होऊ नये म्हणून फिनलंडवर तटस्थता लादली होती.

विचार प्रणाली

सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी व्यवस्था स्वीकारली व साम्यवादी सरकारे स्थापन केली.पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेच्या प्रभावाखाली भांडवलशाही व्यवस्था स्वीकारली व लोकशाही सरकारे स्थापन केली गेली.

आर्थिक

साम्यवादी सरकारे असलेल्या पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी अर्थव्यवस्था स्वीकारली.याचाच अर्थ तिथे सरकारी उद्योगधद्यांना महत्त्वाचे स्थान असणार होते,तर लोकशाही व्यवस्था असलेल्या पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था अंमलात आणली.या राष्ट्रांमध्ये खासगी उद्योगधंद्यांना महत्त्व असणार होते.

सुरक्षा

राष्ट्रांची सुरक्षा राखण्यासाठी युरोपमध्ये लष्करी गट तयार केले गेले.पश्चिम युरोपला सोव्हिएत रशिया व पूर्व युरोप पासून असलेल्या धोक्यांनपासून संरक्षण करण्यासाठी १९४९ मध्ये उत्तर अटलांटिक लष्करी गटाची (The North Atlantic Treaty organization - NATO) निर्मिती केली गेली.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेची संयुक्त संस्थाने व सोव्हियत संघामधील वाढते मतभेद हे शीतयुद्धाचे मोठे कारण मानले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हियत संघाने पूर्व व मध्य युरोपातील अनेक राष्ट्रांवर कब्जा केला व तेथे कम्युनिस्ट राजवटी स्थापन केल्या तसेच ह्या सर्व राष्ट्रांचा ईस्टर्न ब्लॉक हा समूह तयार केला. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड किंग्डम व फ्रान्स ह्या व्यवस्थापश्चिमी व खुल्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी साम्यवादी चळवळ हाणुन पाडण्याचे प्रयत्न केले.

१९९१ मधील घडलेल्या सोव्हियत संघाच्या विघटनाबरोबरच शीतयुद्धाची देखील समाप्ती झाली.

Tags:

शीत युद्ध राजकीयशीत युद्ध विचार प्रणालीशीत युद्ध आर्थिकशीत युद्ध सुरक्षाशीत युद्धसोव्हियत संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मांजरनिवडणूकपांडुरंग सदाशिव सानेविधान परिषदजय श्री रामसम्राट अशोक जयंतीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याजीवनसत्त्वप्रणिती शिंदेभारतीय संविधानाची उद्देशिकापाटीलआनंद शिंदेप्रेममहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीराजा राममोहन रॉयभरती व ओहोटीशनिवार वाडासात बाराचा उतारामलेरियाकोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)सावित्रीबाई फुलेक्लिओपात्राअथर्ववेदहिंदू लग्नप्रज्ञा विवर्धन स्तोत्रओमराजे निंबाळकरप्रल्हाद केशव अत्रेरावसराकेश बापटनामदेवताज महालकानिफनाथ समाधी स्थळ मढीनवनीत राणाभारतीय आडनावेयुधिष्ठिरतरसघनसावंगी विधानसभा मतदारसंघभीमा नदीपंकजा मुंडेबाळूमामाच्या नावानं चांगभलंराजगडमराठी भाषा गौरव दिनभारतीय संस्कृतीआरोग्यजळगाव लोकसभा मतदारसंघसदा सर्वदा योग तुझा घडावानृत्यजागतिक व्यापार संघटनाआंबातेजस ठाकरेगांडूळ खतयशवंत आंबेडकरसंस्कृतीचाफारक्तगटभारतजायकवाडी धरणपश्चिम दिशाअहमदनगर लोकसभा मतदारसंघकादंबरीअल्बर्ट आइन्स्टाइनदुष्काळमहाराष्ट्र विधान परिषदसुशीलकुमार शिंदेकर्ण (महाभारत)व्यवस्थापनसातव्या मुलीची सातवी मुलगीस्वामी विवेकानंदपद्मसिंह बाजीराव पाटीलएकनाथ शिंदेविंचूजागतिक पुस्तक दिवसहोमरुल चळवळज्वारीखडकनितीन गडकरी🡆 More